शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
2
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
3
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
4
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
5
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
6
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
7
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
8
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
9
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
10
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
11
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
12
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
13
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
14
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
15
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
16
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
17
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
18
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
19
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
20
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक

जोंधनखेडा येथे विहीर अधिग्रहणाचा बनाव : रक्कम लाटल्याची तक्रार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2019 22:02 IST

मुक्ताईनगर तालुक्यातील जोंधनखेडा गावाला पाणीटंचाई निवारणार्थ हिवरे शिवारातील विहीर अधिग्रहीत करून जोंधनखेडा गावाला पाणीपुरवठा केल्याचा खोटा बनाव करून अधिग्रहणाच्या मोबदला सरपंच व ग्रामसेवकांनी संगनमत करून लाटल्याची तक्रार आहे

ठळक मुद्देचालू हातपंप दाबला पेव्हर ब्लॉकमध्येजोंधनखेडा विहीर अधिग्रहणाबाबत आलेली तक्रार गंभीर

मुक्ताईनगर, जि.जळगाव : तालुक्यातील जोंधनखेडा गावाला पाणीटंचाई निवारणार्थ हिवरे शिवारातील विहीर अधिग्रहीत करून जोंधनखेडा गावाला पाणीपुरवठा केल्याचा खोटा बनाव करून अधिग्रहणाच्या मोबदला सरपंच व ग्रामसेवकांनी संगनमत करून लाटल्याची तक्रार उपसरपंचासह दोन ग्रा.पं. सदस्यांनी तहसीलदार व पंचायत समिती सभापतींकडे केली आहे, तर दुसरीकडे जोंधनखेडा गावात रस्ता कॉंक्रिटीकरण विकास कामात एक मात्र सुरू असलेली विंधन विहीरदेखील बुजून टाकल्याचा धक्कादायक प्रकारची तक्रारही करण्यात आली आहे.जोंधनखेडा गावातील पाणीटंचाई निवारणार्थ हिवरे शिवारातील पुखराबाई दरबार तडवी यांच्या मालकीच्या शेतातील विहिरीला सरपंच व ग्रामसेवक यांनी संगनमत करून कागदपत्रांचा खेळ केला व प्रस्ताव तयार करून विहीर अधिग्रहीत केली. या विहिरीवरून जोंधनखेडा गावाला कोणतीही पाईपलाईन नसताना किंवा वाहन व टँकरची व्यवस्था नसताना सरपंच व ग्रामसेवक यांनी जून २०१९ मध्ये जमीनधारक मूळ मालकाऐवजी मूळ मालकाचा मुलगा फरीदाबाद तडवी यांच्या नावाने ३६ हजार रुपये निधी शासनाकडून विहिर अधिग्रहण करण्याच्या मोबदल्यात मिळवले. फरीद तडवी यास केवळ एक हजार रुपये देत उर्वरित ३५ हजाराची रक्कम सरपंच व ग्रामसेवक दोघांनी लाटली, अशी तक्रार पंचायत समिती सभापती शुभांगी बोलाने व तहसीलदार श्याम वाडकर यांच्याकडे करण्यात आली आहेचालू हातपंप दाबला पेव्हर ब्लॉकमध्येदरम्यान, गावात शाळेजवळील एक मात्र जिवंत विंधन विहीर (हातपंप) देखील रस्ता कॉंक्रिटीकरण व पेवर ब्लॉक विकास कामात दाबून टाकली आहे. यामुळे गावकऱ्यांचे पाण्यासाठी प्रचंड हाल होत आहे. संबंधित प्रकरणाची सखोल चौकशी होऊन कारवाई करण्यात यावी व गावाचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न तत्काळ सोडण्यात यावा, अशी मागणी तक्रारीत केली आहे.तक्रार अर्जावर जोंधनखेडा गावाचे उपसरपंच मैनाबाई गुलाब तडवी, ग्रामपंचायत सदस्य रेहाना रईस तडवी व जावेद पीरखा तडवी यांच्या स्वाक्षरी आहेत.टंचाईबाबत विहीर अधिग्रहण मोबदला ग्रामसेवक, तलाठी व सरपंच यांच्याकडील अहवालाशिवाय दिला जात नाही. जोंधनखेडा विहीर अधिग्रहणाबाबत आलेली तक्रार गंभीर आहे. याबाबत तातडीने चौकशी करण्यात येईल.- शुभांगी चंद्रकांत भोलाने, सभापती, पंचायत समिती, मुक्ताईनगर 

टॅग्स :water shortageपाणीकपातMuktainagarमुक्ताईनगर