शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

पार्किंगचा व्यावसायिक वापर; पाच दुकाने सील, मनपा आयुक्तांची कारवाई

By सुनील पाटील | Updated: January 4, 2024 18:09 IST

अधिकाऱ्यांचे मोबाईल घेतले ताब्यात

सुनील पाटील, लोकमत न्यूज नेटवर्क, जळगाव: पार्किंगच्या जागेत व्यावसायिक वापर करणाऱ्या व्यावसायिकांचे मुख्य रस्त्यावरील पाच दुकाने महानगरपालिकेने गुरुवारी दुपारी सील केले. कारवाईत बाधा तसेच हस्तक्षेप होऊ नये यासाठी कारवाईपूर्वी आयुक्त डॉ.विद्या गायकवाड यांनी पथकातील पाचही अधिकाऱ्यांचे मोबाईल ताब्यात घेतले होते. बेसमेंटचा वापर पार्कींगसाठी न करता व्यवसायासाठी करणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी सातत्याने तक्रारी होत होत्या, त्याच मुहूर्त अखेर गुरुवारी लाभला. दरम्यान, या कारवाईमुळे व्यापाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.

मुख्य रस्त्यावरील व्यावसायिकांनी पार्कींच्या जागेत दुकान, गोदाम सुरु केल्यामुळे ग्राहकांना भर रस्त्यावर वाहने लावावी लागत आहेत. कधी वाहतूक शाखेकडून वाहनांवर दंडात्मक कारवाई होते तर कधी वाहनच टोईंग करुन नेले जात होते, त्याशिवाय वाहतूक कोंडी नित्याचीच होती. पार्किंगची जागा बळकावलेल्या व्यावसायिकांवर कारवाई करावी म्हणून माजी उपमहापौर कुलभूषण पाटील यांनी गेल्या पंधरवाड्यात आयुक्त डॉ.विद्या गायकवाड यांच्याकडे तक्रार केली होती. त्याशिवाय सामाजिक कार्यकर्ते दीपक गुप्ता यांनीही आयुक्तांच्या दालनासमोर केक कापला होता. पार्किंग आणि वाहतूक कोंडी यामुळे सामान्य जळगावकरही वैतागला होता.

या दुकानांवर केली कारवाई

  • दुकान            -      मालक
  • शितल कलेक्शन : निलेश नाथांनी
  • दीपक शूज : अजय ठाकूरदास ललवाणी
  • टायझर : रेखा रमेश वाणी
  • कोंब‌ : विमल जोशी
  • सेलिब्रेशन : रितेश कौरानी

 

पार्कींग आणि गोदाम असे दोन प्रकार यात आहेत. पहिल्या टप्प्यात पार्किंगचा व्यवसायिक वापर करणाऱ्यांवर कारवाई केली जात आहे. प्रत्येक रोडनिहाय अशा दुकानांची माहिती काढली जात आहे. नियमांचे उल्लघंन करणाऱ्या सर्वच दुकानांवर टप्प्याटप्प्याने कारवाई केली जाणार आहे. आज कारवाई केलेल्या दुकानदारांना नोटीस बजावण्यात आलेल्या होत्या, शिवाय सुनावणीही झालेली होती. सील केलेल्या दुकान मालकांनी पार्किंग सिद्ध करून दाखवावी, सुरक्षा रक्षक ठेवावा. तेव्हाच सील उघडू.- डॉ.विद्या गायकवाड, आयुक्त, महानगरपालिका

टॅग्स :Jalgaonजळगाव