शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
3
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
6
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
7
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
8
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
9
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
10
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
11
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
12
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
13
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
14
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
15
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
16
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
17
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
18
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
19
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
20
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
Daily Top 2Weekly Top 5

सुधारीत आराखड्याच्या मंजुरीनंतर पिंप्राळा उड्डाणपुलाच्या कामाचा शुभारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 10, 2020 12:25 IST

दिपक बोंडे : ...तर विद्युत खांब हटविल्यानंतर असोदा उड्डाणपुलाचे काम सुरू होणार

जळगाव : पिंप्राळा रेल्वे उड्डाणपुलासाठीचा सुधारित आराखडा मंजुरीसाठी पाठविण्यात आला आहे. याला मंजुरी मिळाल्यानंतरच या उड्डाणपुलाच्या कामाला सुरूवात होणार असल्याची माहिती ‘महारेल’ चे कार्यकारी अभियंता दीपक बोंडे यांनी ‘लोकमत’ला दिली. दुसरीकडे विद्युत खांब हटविल्यानंतर असोदा उड्डाणपुलाच्या कामालाही सुरूवात होणार आहे.रेल्वे मंत्रालयाने रेल्वेच्या सुरक्षिततेसाठी आगामी दोन वर्षांत सर्व ठिकाणचे रेल्वे गेट बंद करून त्या ठिकाणी उड्डाणपुल किंवा भुयारी मार्ग उभारण्याचे जाहीर केले आहे. भुसावळ विभागामध्ये १०० ठिकाणी रेल्वे गेट आहेत.टप्प्याटप्प्याने या ठिकाणी उड्डाणपूल किंवा भुयारी मार्ग बांधण्यात येत आहेत. यामध्ये जळगाव शहरात पिंप्राळा उड्डाणपुल व असोदा उड्डाणपुलाचा समावेश आहे. या ठिकाणी राज्य सरकार आणि रेल्वे मंत्रालय यांच्या संयुक्त विद्यमाने स्थापन करण्यात आलेल्या महाराष्ट्र रेल इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट (महारेल)तर्फे उड्डाणपुल बांधण्यात येत आहेत. या दोन्हींही ठिकाणी उड्डाणपुलाच्या कामासाठी ‘महारेल’तर्फे गती देण्यात आली असून, दोन्ही ठिकाणच्या कामाच्या निविदा प्रक्रियाही पुर्ण झाल्या असल्याचे सांगण्यात आले.मनपाने या ठिकाणी ‘आर्म’ उभारण्याचा प्रस्ताव दिल्यानंतर उड्डाणपुलाचा नवीन सुधारीत आराखडा पाठविला आहे. विशेष म्हणजे या नवीन आराखड्यावरच पुलासाठी नेमके कुठल्या भागातील अतिक्रमण अडथळा ठरणार आहे, हे स्पष्ट होणार आहे.मनपातर्फे भुयारी मार्गाऐवजी ‘आर्म’ चा प्रस्तावपिंप्राळा रेल्वे उड्डाणपुल भोईटेनगर व सुरत रेल्वेलाईन ओलांडून शिवाजीनगर भागात तसेच भोईटेनगरच्या पुढे भिकमचंद जैन नगरजवळ उतरणार आहे. यामुळे भोईटेनगरचा परिसर व रिंगरोडचा काही परिसर या उड्डाणपुलाच्या खाली येणार आहे. त्यामुळे रहिवाशांना ये-जा करण्यासाठी अडचण निर्माण होऊ नये, याकरिता महारेलतर्फे मनपाला आर्म किंवा भुयारी बोगदा तयार करून देण्याचा प्रस्ताव पाठविला होता. यावर महापालिकेने भुयारी मार्गाऐवजी ‘आर्म’ तयार करून देण्याचा प्रस्ताव ‘महारेल’कडे पाठविला आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीJalgaonजळगाव