शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

५१ लाखांच्या ‘बादल’ची निघाली सारंगखेड्याला स्वारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 9, 2019 20:27 IST

काही वर्षांपूर्वी सारंगखेड्याच्या यात्रेतून आणलेल्या घोड्याला कुटुंबातील सदस्याप्रमाणे सांभाळत सोनवणे कुटुंबाने आपला छंद जोपासला आहे. जीवापाड प्रेम लावून वाढविलेला ‘बादल’ नावाचा घोडा शहरात चर्चेचा विषय बनला आहे. विशेष म्हणजे हा बादल घोडा तब्बल ५१ लाख रुपये किंमतीचा आहे. या बादलची स्वारी आता सोमवारी सारंगखडा यात्रोत्सवासाठी निघाली आहे.

ठळक मुद्देभडगावात सध्या बादलचीच चर्चावर्षानुवर्षे जोपासला घोडेपालनाचा छंदसारंगखेड्याचा बाजार देशात प्रसिद्ध

अशोक परदेशीभडगाव, जि.जळगाव : काही वर्षांपूर्वी सारंगखेड्याच्या यात्रेतून आणलेल्या घोड्याला कुटुंबातील सदस्याप्रमाणे सांभाळत सोनवणे कुटुंबाने आपला छंद जोपासला आहे. जीवापाड प्रेम लावून वाढविलेला ‘बादल’ नावाचा घोडा शहरात चर्चेचा विषय बनला आहे. विशेष म्हणजे हा बादल घोडा तब्बल ५१ लाख रुपये किंमतीचा आहे. या बादलची स्वारी आता सोमवारी सारंगखडा यात्रोत्सवासाठी निघाली आहे.मुळचे बाळद येथील असलेले व सध्या भडगाव येथे वास्तव्यास असलेले अ‍ॅड.आप्पासाहेब सोनवणे आणि त्यांचे मोठे बंधू गंगाराम सोनवणे हे येथे बाळद रोडला राहतात. आप्पासाहेब वकिली तर गंगाराम सोनवणे हे लोहारी कामे करुन आपली उपजिविका भागवितात.यावर्षी त्यांच्याकडे असलेला बादल हा घोडा शहरात नव्हे तर परिसरात चर्चेचा विषय बनलेला आहे. अ‍ॅड.सोनवणे यांनी बादलला याच सारंगखेड्याच्या यात्रेतूनच गेल्या साडेतीन वर्षांपूर्वी आणला होता. पांढरा शुभ्र बादल हा मारवड जातीचा असून साडेपाच फुटावर उंच आहे. सोनवणे कुटुंबिय त्याच्या खुराकाचीही काळजी घेतात. न चुकता दररोज योग्य प्रमाणात खुराख देऊन रपेट मारतात.घोडा म्हटले की त्यात ५२ खोडी आल्या. परंतु या बादलमध्ये अशी एकही खोड नाही, असे सोनवणे यांनी सांगितले.यावर्षी बादल सारंगखेड्यात भरविण्यात येणाऱ्या चेतक फेस्टिवलमध्ये एक नंबर येणारच आणि म्हणून त्याची किंमत ५१ लाख रुपये मिळण्याची आशा सोनवणे यांना आहे.सन २०११ मध्ये भरविण्यात आलेल्या चेतक फेस्टिवलमध्येही त्यांच्या घोड्याला पहिला क्रमांक मिळाला होता, अशी माहिती सोनवणे यांनी दिली.सारंगखेड्याचा बाजार देशात प्रसिद्धया कुटुंबाची वर्षानुवर्षे (सारंगखेडा ता.शहादा, जि.धुळे) या गावाशी नाळ जोडली गेलेली आहे. दरवर्षी असलेल्या यात्रोत्सवाचे वैशिष्ट्य म्हणजे या ठिकाणी देशातील सगळ्यात मोठा घोड्यांचा बाजार भरविला जातो. याच बाजारातून घोड्याचे शिंगरू आणून त्याला स्वत:च्या मुलाप्रमाणे सांभाळ करून वाढविणे आणि एक-दोन वर्षांनंतर त्याला विकून पुन्हा दुसरे शिंगरू विकत घेणे हा त्यांचा छंद आहे. तो त्यांनी अनेक वर्षांपासून जोपासला देखील.

टॅग्स :Bhadgaon भडगावJalgaonजळगाव