पाचोरा : बंद घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी १५५ ग्रॅम सोन्याच्या दागिन्यांसह जवळपास साडेसहा लाखांचा ऐवज चोरुन नेला. यात पावणेदोन लाख रुपये रोख आहेत. ही घटना भडगाव रोडवर राधाकृष्ण रेसिडेन्सीमधील घरात घडली.
राधाकृष्ण रेसिडेन्सी भागातील रहिवासी असलेल्या मेडिकल व्यावसायिक मंगला वसंत सूर्यवंशी यांच्याकडे ही चोरी झाली. मंगला सूर्यवंशी यांचे पती सेवानिवृत्त सैनिक यांचे काही वर्षांपूर्वी आकस्मिक निधन झाले. त्या पाचोरा येथील बसस्टँड परिसरात भाच्याच्या मदतीने औषधी दुकान व्यवसाय सुरू केला. दि ११ रोजी त्या भाचा ज्ञानेश्वर पाटील याच्याबरोबर जळगाव येथे खरेदी करण्यासाठी गेल्या होत्या. घरी न येता भाच्याकडेच मुक्कामी राहिल्या. त्याचवेळी त्यांच्या घरातून चोरट्यांनी हात साफ केला. याबाबत अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.