जळगाव : शहरातील मुक्ताईनगरात बंद घर फोडून अज्ञात चोरट्यांनी १८ हजार ८०० रूपयांचा ऐवज लांबविला.बुधवारी साडेचार वाजेच्या सुमारास विजया पाटील व कुटुंबातील सदस्य घराला कुलूप लावून बाहेर गेले होते. त्या वेळी अज्ञात चोरट्यांनी दरवाजाचा कडीकोयंडा तोडून आत प्रवेश केला. लोखंडी कपाटाची तिजोरीतील पाच हजार रोख, २८०० रुपये किंमतीच्या चांदीच्या साखळया, एक हजार रुपये किंमतीचे चांदीचे जोडवे, १० हजार रुपये किंमतीची गळयातील हार असा एकूण १८ हजार ८०० रूपयांचा ऐवज लांबविला. या प्रकरणी जिल्हा पेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मुक्ताईनगरात बंद घरातून १९ हजारांचा ऐवज लांबविला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 6, 2019 11:46 IST