नोंदी न झाल्याने शेतकऱ्यांना पीक विमा व नुकसानीचा आर्थिक अनुदानाचा लाभ मिळत नाही. म्हणून शासनाने पुनर्विलोकन करून स्वयंचलित हवामान केंद्र वाढवावेत. प्रत्येक गावात ग्रामपंचायतींवर हे स्वयंचलित हवामान नोंद यंत्रणा बसविण्यात यावी. पावसाची नोंद, तापमान, वादळाचा वेग त्या त्या भागात या स्वयंचलित हवामान केंद्राच्या यंत्रात अचूक माहिती टिपता येईल. अचूक नोंद होऊन शेतकऱ्यांना पीक विम्यासह इतरही लाभ मिळण्यास फायद्याचे ठरू शकते, अशी मागणी भडगाव तालुक्यातील शेतकरी वर्गातून होत आहे.
येथे आहे केंद्र
सुरुवातीपासून भडगाव तालुक्यातील आमडदे, कोळगाव, कजगाव, भडगाव या चारही महसलल मंडळात ही यंत्रणा बसविण्यात आलेली आहे. यात भडगाव महसूल मंडळात चाळीसगाव रस्त्यालगत तालुका कृषी कार्यालयात, आमडदे महसूल मंडळात गिरड गावात, कोळगाव महसूल मंडळात कोळगाव गावात, कजगाव महसूल मंडळात भोरटेक शिवारात आदी चारही महसूल मंडळात स्वयंचलित हवामान केंद्राचे यंत्र बसविण्यात आलेले आहेत. प्रत्येक महसूल मंडळात स्वयंचलित हवामान केंद्राच्या यंत्रामध्ये वेळोवेळी पर्जन्यमान, तापमान, वादळाचा वेग व हवेतील आर्द्रता मोजली जाते. ही माहिती दर २ तासात पोर्टलवर अपडेट होते. नैसर्गिक आपत्ती आली. गारपीट झाली. अवेळी पाऊस पडल्यास शेती पिकांचे नुकसान झाल्यास शेतकऱ्याला केळीसह इतर फळपीक विमा आदी योजनेचा लाभ शेतकऱ्यांना मिळतो. विम्याची रक्कम मंजूर होते. दर महिन्याला या यंत्राची कंपनीमार्फत तपासणी करण्यात येते, अशी माहिती भडगाव तालुका कृषी अधिकारी बी. बी. गोरडे यांनी दिली.
स्वयंचलित हवामान केंद्र हे महसूल मंडळात एकाच ठिकाणी बसविलेले आहे. त्यामुळे दुसऱ्या परिसरात, शेत शिवारात वादळ वारा, तापमान, गारपीटचा पाऊस या नैसर्गिक आपत्तीमुळे शेती पिकांचे नुकसान होते. त्यावेळी हे सर्व चित्र काही वेळा या यंत्रात नोंदविले जात नाही. त्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होत असते.
फोटो — भडगाव तालुका कृषी कार्यालयात स्वयंचलित हवामान यंत्राची पाहणी करतांना तालुका कृषी अधिकारी बी. बी. गोरडे आदी.