शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

महापालिकेच्या रिक्त २ हजार जागांच्या भरतीचा मार्ग मोकळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2022 11:31 IST

गुरुवारी सायंकाळी मनपातील आकृतीबंधाच्या विषयावर पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी नगरविकास मंत्रालयातील अधिकारी, अस्थापना विभागातील अधिकारी यांची बैठक घेतली. या बैठकीत मनपाच्या आकृतीबंधाबाबत चर्चा झाली. 

जळगाव : महापालिकेतील ३२०० कर्मचाऱ्यांची संख्या आता १ हजारपर्यंत खाली आली असून, गेल्या अनेक वर्षांमध्ये महापालिकेतील २२०० कर्मचारी सेवानिवृत्त झाले आहेत. महापालिकेतील रिक्त जागांमुळे मनपा कर्मचाऱ्यांवर अतिरिक्त ताण पडत आहे. अनेक वर्षांपासून महापालिकेतील रिक्त जागा भरण्याबाबत आकृतीबंधाचा शासनाकडे पाठविण्यात आलेल्या प्रस्तावाला आता शासनाकडून लवकरच हिरवा कंदील मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे महापालिकेतील रिक्त असलेल्या २१३७ जागा भरण्यात येणार असल्याची माहिती महापौर जयश्री महाजन यांनी दिली आहे.

महापौर जयश्री महाजन यांच्यासह उपमहापौर कुलभूषण पाटील, मनपा विरोधी पक्षनेते सुनील महाजन, सभागृह नेते ललित कोल्हे हे गेल्या दोन दिवसांपासून मुंबईत ठाण मांडून आहेत. गुरुवारी सायंकाळी मनपातील आकृतीबंधाच्या विषयावर पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी नगरविकास मंत्रालयातील अधिकारी, अस्थापना विभागातील अधिकारी यांची बैठक घेतली. या बैठकीत मनपाच्या आकृतीबंधाबाबत चर्चा झाली. 

नगरविकास मंत्रालयाकडून मनपा प्रशासनाने पाठविलेल्या आकृतीबंधाच्या प्रस्तावात काही त्रुटी काढल्या होत्या. त्या त्रुटी दुरुस्त करून, सोमवारी नवीन प्रस्ताव पाठविण्याच्या सूचना नगरविकास मंत्रालयाकडून महापालिकेला देण्यात आल्याचीही माहिती महापौरांनी दिली. सोमवारी हा प्रस्ताव पाठविण्यात येणार असून, प्रस्ताव पाठविल्यानंतर आठवडाभराच्या आता आकृतीबंधाचा विषय मार्गी लावला जाईल असे आश्वासन नगरविकास मंत्रालयाकडून देण्यात आले आहे. त्यामुळे मनपात लवकरच २ हजार जागांची ‘जम्बो भरती’ होण्याची शक्यता आहे.

९६ कर्मचाऱ्यांना सेवेत घेण्याचाही मार्ग मोकळामहापालिकेतील ९६ न्यायालयीन कर्मचाऱ्यांना मनपाच्या सेवेत समाविष्ट करून घेण्याबाबत देखील या बैठकीत चर्चा झाली. त्यात या कर्मचाऱ्यांची शिक्षणाची अट शिथील करून, त्यांना महापालिकेच्या सेवेत घेण्याबाबतचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच महापालिकेतील अनुकंपाधारकांच्या विषयावर नगरविकास मंत्रालयाने महापालिकेवरच निर्णय घेण्याच्या सूचना दिल्या आहेत. अनुकंपाधारकांचा विषय हा स्थानिक पातळीवर घेण्याचा विषय असून, मंत्रालयापर्यंत आणण्याचा हा विषय नसल्याचेही नगरविकास मंत्रालयाकडून सांगण्यात आले आहे. त्यामुळे आकृतीबंध, अनुकंपाधारकांचा विषय व न्यायालयीन कर्मचाऱ्यांना कायम सेवेत घेण्याबाबतचे अनेक वर्षांपासूनचे प्रलंबित विषय आता मार्गी लागण्याची शक्यता आहे.

महापालिकेच्या दृष्टीने महत्त्वाचा विषय असलेला आकृतीबंधाचा विषय आता मार्गी लागणार आहे. पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी स्वत: या विषयात लक्ष घालून, गुरुवारी बैठक घेतली. तसेच मंत्रालयाकडून लवकरच निर्णय घेण्याबाबत सकारात्मकता दर्शविली आहे. आकृतीबंधासह, न्यायालयीन कर्मचाऱ्यांना कायम सेवेत घेणे व अनुकंपाधारकांच्या दृष्टीने देखील निर्णय होणार आहे.- जयश्री महाजन, महापौर

टॅग्स :JalgaonजळगावMuncipal Corporationनगर पालिका