शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
4
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
7
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
8
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
9
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
10
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
11
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
12
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
13
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
14
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
15
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
16
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
17
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
18
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
19
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
20
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
Daily Top 2Weekly Top 5

जळगावात स्वच्छतेचा बोजवारा, साफसफाई होत नसल्याने नगरसेवकाचेच महापालिकेत आत्मक्लेष आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2020 12:17 IST

कचऱ्याचा प्रश्न मार्गी लागेपर्यंत आंदोलन सुरू राहणार

जळगाव : गेल्या दहा दिवसांपासून सफाई कर्मचाऱ्यांनी कामबंद केल्यामुळे शहरात कचºयाचा गंभीर प्रश्न निर्माण होऊन ठिकठिकाणी अस्वच्छता पसरली आहे. वारंवार सांगूनही स्वच्छता होत नसल्याने शिवसेनेचे नगरसेवक बंटी जोशी यांनी मनपाच्या आठव्या मजल्यावर आरोग्य विभागात आत्मक्लेष आंदोलन सुरू केले. स्वच्छतेसाठी नगरसेवकांना आंदोलन करावे लागत असतील तर सर्वसामान्यांचे काय? असा सवाल या निमित्ताने उपस्थित होत आहे.मनपाने शहरातील साफसफाई आणि कचरा संकलनासाठी वॉटरग्रेस कंपनीला एकमुस्त मक्ता दिला आहे. मात्र वेतन मिळत नसल्याने गेल्या दहा दिवसांपासून सफाई व कचरासंकलनाचे काम बंद केले आहे. त्यामुळे शहरात स्वच्छतेचा बोजवारा उडाला आहे. शहरात सर्वत्र स्वच्छतेची विदारक परिस्थिती झाली आहे. ठिकठिकाणी कचरा साचला असून कचराकुंड्यादेखील ‘ओव्हरफ्लो’ झाल्या आहेत. नागरिक स्वच्छतेसाठी नगरसेवकांना वेठीस धरत आहेत. तरीही प्रशासन दुर्लक्ष करीत आहे. शहरात अस्वच्छता असून नागरिकांकडून प्रशासनावर नाराजी व्यक्त होवू लागली आहे. त्यामुळे शहरातील स्वच्छतेकडे लक्ष वेधण्यासाठी शिवसेनेचे नगरसेवक बंटी जोशी यांनी मनपात आत्मक्लेष आंदोलनाचा पवित्रा घेत त्यांनी आंदोलन सुरू केले आहे.शहरातील स्वच्छतेकडे लक्ष वेधण्यासाठी सकाळी जोशी हे मनपाच्या आठव्या मजल्यावरील आरोग्य विभागात आल्यानंतर त्यांनी कार्यालयाच्या बाहेर बसून हे आंदोलन सुरु केले. नगरसेवकच आंदोलन करीत असल्याने उपायुक्त मिनिनाथ दंडवते आणि आरोग्य अधिकारी डॉ.विकास पाटील यांची चांगलीच तारांबळ उडाली. यावेळी अधिकाºयांनी नगरसेवक जोशी यांना आंदोलन मागे घेण्याची विनंती केली. मात्र बंटी जोशी यांनी आंदोलनाच्या भूमिकेवर ठाम राहिले.प्रश्न सुटेपर्यंत आंदोलनशहरात स्वच्छतेचा प्रश्न गंभीर झाला असून प्रशासनाच्या गलथान कारभारामुळे ही परिस्थिती उद््भवली आहे. वारंवार सांगूनही कोणी ऐकत नाही. प्रभाग क्रमांक १२मध्येही स्वच्छतेचा बिकट प्रश्न आहे. त्यामुळे प्रशासनाचा हा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आणण्यासाठी आणि स्वच्छतेचा प्रश्न जोपर्यंत सुटत नाही तोपर्यंत दररोज आंदोलन करणार असल्याचे बंटी जोशी यांनी सांगितले.

टॅग्स :Jalgaonजळगाव