शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
3
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
4
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
5
इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
6
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
7
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
8
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
9
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
10
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
11
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
12
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
13
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
14
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
15
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
16
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
17
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
18
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
19
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
20
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
Daily Top 2Weekly Top 5

जळगाव शहरात दहावीच्या विद्यार्थ्याने घेतला गळफास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2018 21:06 IST

शाळेतून घरी पोहचताच वैभव अशोक पाटील (वय १५, मुळ रा.अंजनविहिरे,ता.धरणगाव)या दहावीच्या विद्यार्थ्याने वरच्या मजल्यावर जाऊन ओढणीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना गुरुवारी दुपारी अडीच वाजता पिंप्राळ्यातील इंद्रनील सोसायटीत उघडकीस आली. वैभव याने आत्महत्या का? केली याबाबत सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे.

ठळक मुद्दे  पिंप्राळ्यातील इंद्रनील सोसाटीतील घटना आत्महत्येचे कारण अस्पष्टशाळेत वाद झाल्याचा संशय

आॅनलाईन लोकमतजळगाव दि,२१ : शाळेतून घरी पोहचताच वैभव अशोक पाटील (वय १५, मुळ रा.अंजनविहिरे,ता.धरणगाव)या दहावीच्या विद्यार्थ्याने वरच्या मजल्यावर जाऊन ओढणीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना गुरुवारी दुपारी अडीच वाजता पिंप्राळ्यातील इंद्रनील सोसायटीत उघडकीस आली. वैभव याने आत्महत्या का? केली याबाबत सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे. दरम्यान, याप्रकरणी रामानंद नगर पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, वैभव हा ख्वाजामिया चौक परिसरातील प्रगती माध्यमिक विद्यालयात दहावीच्या वर्गात होता. गुरुवारी दुपारी तो शाळेतून घरी आला. पायातील बुट व पायमोजे काढून तो शाळेच्यागणवेशातचथेट वरच्या मजल्यावर गेला. आई चित्रा व वडील अशोक डोंगर पाटील हे दवाखान्यात दाखल असलेल्या नातेवाईकांना पाहण्यासाठी गेले होते. आजोबा डोंगर पाटील हे घरीच होते. लहान भाऊ मयुर हा सातवीला असून तो देखील शाळेतून घरी आलेला होता.  लहान भाऊ मयुर हा त्याला बोलावण्यासाठी वरच्या मजल्यावर गेला असता वैभव याने गळफास घेतलेला दिसून आला. घाबरलेला मयुर तातडीने खाली आला व आजोबांना ही घटना सांगितली. गल्लीतील लोकांनी तत्काळ वैभवचा गळफास काढला व त्याला जिल्हा रुग्णालयात हलविले. तेथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषीत केले. वैद्यकिय अधिकारी डॉ.प्रवीण पाटील यांनी वैभव याचे शवविच्छेदन केले.शाळेत वाद झाल्याचा संशयवैभव याने आत्महत्या का केली असा प्रश्न सर्वांनाच पडला आहे. घरातील वातावरण अतिशय चांगले होते. शाळेत नियमित जात असताना अचानक असे काय घडले की त्याला आत्महत्या करावी लागली. शाळेतून आल्यानंतर कोणालाच काहीच न सांगता थेट त्याने गळफास घेतला. शाळेत त्याचा कोणाशी तरी वाद झाला असावा असा संशय त्याच्या कुटुंबियांना आहे. 

टॅग्स :JalgaonजळगावCrimeगुन्हा