शहरं
Join us  
Trending Stories
1
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
2
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
3
राहुल गांधी यांनी उल्लेख केलेली 'ती' ब्राझिलियन मॉडेल कोण? मतदार यादीत छापला गेला फोटो; तुम्हीही डोक्याला हात लावाल!
4
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
5
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
6
देशभरात एअर इंडियाचा सर्व्हर डाउन, दिल्ली विमानतळावर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा; मॅन्युअली पद्धतीने चेक-इन
7
दुबई-अबुधाबी फिरण्याचा विचार करताय? आयआरसीटीसीने आणलंय धमाल पैसा वसूल पॅकेज!
8
India’s Squad vs SA Test : पंत इज बॅक! दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटीसाठी कुणाला मिळाली संधी?
9
ISI नं का घडवला मुंबईवर हल्ला?; पाकिस्तानी राष्ट्रपती जरदारीच्या प्रवक्त्याचा मोठा दावा
10
IND A vs SA A : रोहित-विराट दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या 'या' वनडे मालिकेपासून दूरच
11
"...तोपर्यंत सरकार तुमच्यासमोर गुडघ्यावर येणार नाही"; कर्जमाफी घेण्यासाठी उद्धव ठाकरेंचा शेतकऱ्यांना सल्ला
12
मारुतीने आज जो इतिहास घडवला, टाटालाही झेपणार नाही; ४२ वर्षांत ३ कोटी कार विकल्या...
13
फक्त २९ पैशांचा शेअर थेट १०० रुपयांवर! १ लाखाच्या गुंतवणुकीतून झाला '३.४४ कोटींचा' नफा
14
UP: बेकायदेशीर औषधाविरुद्ध योगी सरकारची कडक कारवाई; ४ दिवसांत १६ गुन्हे दाखल, २५ दुकानांवर बंदी!
15
जगातील अवघ्या ३ लोकांकडे आहे 'ही' कार! डिझाईन पाहून प्रेमात पडाल अन् किंमत ऐकून हैराण व्हाल!
16
१७ वर्षे एकाच कंपनीत काम केले, अचानक काढून टाकले, कर्मचाऱ्याने लाखमोलाचा दिला सल्ला, पोस्ट व्हायरल
17
मोदी सरकारचा मोठा निर्णय; ऑपरेशन सिंदूरनंतर पहिल्यांदाच पाकिस्तानात गेले 2100 भारतीय, कारण काय?
18
भाजी विक्रेत्याने जिंकली तब्बल ११ कोटींची लॉटरी; टॅक्स भरून हातात किती पैसे येणार?
19
चेज मास्टर विराट कोहलीचे व्यवसायिक साम्राज्य माहितीये का? क्रिकेटपेक्षा इथून करतो सर्वाधिक कमाई
20
गुगल क्रोम वापरणाऱ्यांना मोठा धोका; हॅकर्सचं लक्ष तुमच्यावरच! सुरक्षित राहण्यासाठी 'ही' गोष्ट आताच करा

नागाशी भिडली! बाळाला नागाचा विळखा, ती आई होती म्हणूनी... डसला पण...

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 10, 2023 09:42 IST

बाळासाठी आईचे काळाशी दोन हात.... तान्हुले बाळ, रात्रीच्या अंधारात झोपले होते... तिचे डोळे उघडले पाहते तर काय... ग्रामस्थांनी शंकरालाच पाण्यात ठेवले...

भास्कर पाटीललोकमत न्यूज नेटवर्क महिंदळे (जि. जळगाव) : रात्रीची वेळ. घरात आई आणि तिचे तान्हे बाळ झोपलेले. रात्री अचानक बाळ रडायला लागले. आईला जाग आली. पाहते तर बाळाच्या अंगावर चक्क नाग. क्षणाचाही विलंब न करता आईने या नागाला पकडून दूर फेकले आणि एवढ्यातच नागाने तिला हाताला दंश केला. गेल्या पाच दिवसांपासून आईची मृत्यूशी झुंज सुरू होती. गुरुवारी त्या झुंजार आईने या लढाईवर मात केली. 

एखाद्या चित्रपटात शोभावी अशी घटना महिंदळे, ता. भडगाव येथे गेल्या आठवड्यात घडली. महिंदळे येथील भिकन नरसिंग राजपूत यांची कन्या ज्योती हिचे सासर बांभोरी, ता. एरंडोल येथील. काही दिवसांपूर्वी ती बाळंतपणासाठी माहेरी आलेली. तिला पुत्ररत्न झाले. गेल्या आठवड्यात पहाटे आई व बाळ झोपेत होते त्यावेळी ही घटना घडली. बाळासाठी जिवाची बाजी लावणारी ज्योतीमधली हिरकणी जागी झाली आणि क्षणात तिने नागाला हातात पकडून दूर फेकले. यात तिला नागाने दंश केला. काही कळण्याच्या आतच ती अस्वस्थ झाली. ज्योती हिला वेळीच सर्पदंश विरोधी लसीची इंजेक्शन देण्यात आली. त्यामुळे ती वाचल्याची माहिती डॉ. सागर गरुड यांनी दिली.

लढाई जिंकलीतिला तत्काळ ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्रकृती खालावल्याने तिला पाचोरा येथील खासगी दवाखान्यात दाखल करण्यात आले. डॉ. भूषण मगर यांनी वेळीच औषधोपचार केले. पाच दिवसांपासून मृत्यूशी झुंज सुरु होती. अखेर ज्योतीने ही लढाई जिंकली. डॉक्टरांनी सांगितले. 

ज्योती लवकर बरी व्हावी, यासाठी गावातील महिलांनी तिची प्रकृती आता महादेवाला साकडे घातले होते. मंदिराचा गाभारा पाण्याने भरला होता.

टॅग्स :snakeसापWomenमहिला