शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
4
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
7
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
8
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
9
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
10
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
11
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
12
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
13
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
14
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
15
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
16
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
17
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
18
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
19
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
20
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
Daily Top 2Weekly Top 5

जनता एक्स्प्रेसमधील गार्ड व सुरक्षा रक्षकांत हाणामारी; कर्मचाऱ्यांचे मध्यरात्री ठिय्या आंदोलन

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 10, 2023 08:44 IST

या हाणामारीची घटना भुसावळ रेल्वे पोलिस व जीआरपी पोलिसांना समजल्यानंतर दोन्ही विभागाच्या पोलिसांचा ताफा भुसावळ स्टेशनवर तैनात करण्यात आला होता, तसेच यावेळी स्टेशनवर ड्युटीसाठी आलेले १५ ते २० गार्डही जमा झाले होते.

सचिन देव जळगाव : बिहारहून मुंबईकडे जाणाऱ्या अपच्या जनता एक्स्प्रेसमध्ये शनिवारी मध्यरात्री गार्ड व रेल्वे सुरक्षा बलाच्या कर्मचाऱ्यांमध्ये  तुफान हाणामारी झाल्याची घटना घडली आहे. गाडी  उशिरा धावण्याच्या  चौकशीवरून ही हाणामारीची घटना घडली असून, या घटनेनंतर भुसावळ स्टेशनवर गाडीतील  रेल्वे पोलिसांना अटक करण्याच्या मागणीसाठी मध्यरात्री रेल्वेच्या गार्ड कर्मचाऱ्यांनी चांगलाच गोंधळ घालत ठिय्या आंदोलन केेले. 

बिहारकडून येणारी पटना एक्स्प्रेस रात्री बारा वाजता खंडवा स्टेशनवर आल्यानंतर या गाडीला खंडव्याहून भुसावळपर्यंत एस्कॉर्ट सुरक्षा देण्याची जबाबदारी रेल्वे सुरक्षा बलाचे कर्मचारी संजीव कुमार, दीपेंद्र सोलंकी व संदीप कुमार यांच्यावर देण्यात आली होती. खंडव्याला ही गाडी तब्बल पाऊण तास उशिरा आल्याने त्याची चौकशी करण्यासाठी हे सुरक्षा रक्षक पोलिस गार्डच्या डब्यात गेले. तेथे रजनीकांत डे व त्यांच्या सोबत असलेले राजेश मीना यांनी या रेल्वे सुरक्षा बलाच्या कर्मचाऱ्यांसोबत मोठमोठ्याने आवाज करून वाद घातला. यावेळी सुरक्षा रक्षक संदीप कुमार व एका गार्डमध्ये  जोरदार हाणामारीही झाली. खंडवा येथून  बऱ्हाणपूर स्टेशनवर गाडी आल्यानंतरही या कर्मचाऱ्यांमध्ये वाद होऊन अर्धा तास गाडीचा खोळंबा झाला.

...अन् गार्ड कर्मचाऱ्यांनी मध्यरात्री मांडला ठिय्याया हाणामारीची घटना भुसावळ रेल्वे पोलिस व जीआरपी पोलिसांना समजल्यानंतर दोन्ही विभागाच्या पोलिसांचा ताफा भुसावळ स्टेशनवर तैनात करण्यात आला होता, तसेच यावेळी स्टेशनवर ड्युटीसाठी आलेले १५ ते २० गार्डही जमा झाले होते. भुसावळ स्टेशनवर मध्यरात्री अडीच वाजता गाडी आल्यानंतर पुन्हा या ठिकाणी  जोरदार वाद झाला. यावेळी गार्ड कर्मचाऱ्यांनी रेल्वे पोलिसांना अटक करण्याच्या मागणीसाठी ठिय्या आंदोलन केले. यानंतर जीआरपी पोलिसांनी रेल्वे पोलिसांसह गाडीतील दोन्ही गार्ड कर्मचाऱ्यांना ताब्यात घेऊन, गाडी मुंबईच्या दिशेने मार्गस्थ केली. दोघांच्या तक्रारीवरून जीआरपी पोलिसांनी परस्परांविरोधात गुन्हे नोंदविले आहेत.

जनता एक्स्प्रेसमध्ये गार्ड व सुरक्षा रक्षकांमध्ये झालेली वादाची घटना खरी आहे. ही तक्रार खंडवा स्टेशनकडे वर्ग केली आहे.- विजय घेरडे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, लोहमार्ग पोलिस, भुसावळ