शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

सरकारकडून चांगली कामे थांबविण्याचा धडाका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2020 13:02 IST

भाजप जिल्हाध्यक्ष जावळे : ‘महाविकास’ आघाडी ‘महाभकास’ झाल्याची टीका

जळगाव : राज्य सरकारच्या धोरणाविरुद्ध तसेच राज्यातील महिलांवरील वाढत्या अत्याचाराच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर भाजपतर्फे २५ रोजी प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी तहसील कार्यालयांसमोर सकाळी ११ ते दुपारी ४ वाजेदरम्यान धरणे आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती भाजपचे जिल्हाध्यक्ष हरिभाऊ जावळे यांनी पत्रकार परिषदेत दिली. सरकारकडून चांगली कामे थांबविण्याचा धडाका सुरु असल्याचे ते म्हणाले.जळगाव येथे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हे आंदोलन करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.या संदर्भात रविवारी पत्रकार परिषद झाली. या वेळी जावळे यांच्यासह महानगराध्यक्ष दीपक सूर्यवंशी, डॉ. विजय धांडे, मनोज भांडारकर उपस्थित होते. या प्रसंगी जावळे यांनी राज्य सरकारच्या धोरणावर टीका करीत भाजप सरकारने केलेल्या कामांची माहिती दिली.सातबारा अद्यापही कोरा नाहीभाजपचा विश्वासघात करून कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉँग्रेससोबत सत्ता स्थापन केलेल्या शिवसेनेने शेतकऱ्यांचाही विश्वासघात केला असल्याचा आरोप हरिभाऊ जावळे यांनी केला.ते म्हणाले की, शिवसेना पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या प्रमुख नेत्यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन अवकाळी पावसाचा फटका बसलेल्या शेतकºयांना हेक्टरी २५ हजार रुपये व फळबागांसाठी हेक्टरी ५० हजार रुपये मदत देण्याची घोषणा केली होती. मात्र या नेत्यांना आश्वासनांचा विसर पडला असून सरसकट कर्जमाफीची घोषणाही हवेत विरल्याने शेतकºयांचा सातबारा अद्यापही कोरा झाला नसल्याचे जावळे म्हणाले. सरकारची सरसकट कर्जमाफीची घोषणा म्हणजे शेतकºयांची सरसकट फसवणूक असल्याची टीका त्यांनी केली.चांगली कामे थांबविण्याचा धडाकाभाजप सरकारने विविध कामांसाठी घेतलेल्या निर्णयांमुळे सुरू झालेली चांगली कामेही थांबविण्याचा धडाका राज्य सरकारने लावला असल्याचा आरोप या वेळी करण्यात आला. पावसाळ््यात दमदार पाऊस झाला व शेततळ््यांचीे कामे चांगलीे झाल्याने रब्बी हंगाम चांगला आला. हरभरा चांगला आला असला तरी खरेदी केंद्र नाही, तूर खरेदीही केवळ साडे तीन क्विंटलपर्यंत केली जात आहे.राष्ट्र हिताला बाधासीएए वरून तेढ निर्माण करण्याचे काम सध्या सुरू असून याद्वारे राष्ट्र हिताला बाधा पोहचविण्याचे कामदेखील राज्य सरकारकडून सुरू असल्याचा आरोप जावळे यांनी केला.महिला अत्याचारात वाढराज्यात महिलांवरील अत्याचाराच्या घटना दिवसेंदिवस वाढत असून हिंगणघाटच्या घटनेनंतरही महिलांवरील अत्याचार थांबविण्यात राज्य सरकारला अपयश आले असून पोलिसांचा धाक संपल्याची टीका जावळे यांनी केली. तीन पक्ष मिळून स्थापन झालेले हे सरकार म्हणजे ‘तिºह्या’ रंगाचे सरकार आहे, असा उल्लेख त्यांनी केला. 

टॅग्स :PoliticsराजकारणJalgaonजळगाव