शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
3
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
4
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
5
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
6
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
7
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
8
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
9
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
10
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
11
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
12
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
13
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
14
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
15
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
16
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
17
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
18
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
19
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
20
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
Daily Top 2Weekly Top 5

जळगावात लॉकडाऊनच्या घोषणेनंतर नागरिक मोठ्या प्रमाणात रस्त्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 5, 2020 22:46 IST

जीवनावश्यक वस्तू खरेदीसाठी दुकानांवर गर्दी

जळगाव : शहरात ७ जुलैपासून पुन्हा लॉकडाऊन करण्यात येणार असल्याची घोषणा जिल्हा प्रशासनाने केल्यानंतर विविध वस्तूंच्या खरेदीसाठी रविवारी सकाळपासून जळगावकरांनी मोठी गर्दी केली. या लॉकडाऊनमध्ये जीवनावश्यक वस्तूंचेही व्यवहार बंद राहणार असल्याने या वस्तूंच्याही खरेदीसाठी गर्दी उसळली होती़ सुभाष चौक परिसर, चित्रा चौक, गणेश कॉलनी, बळीराम पेठ, भिलपुरा चौक, टॉवर चौक, गिरणा टाकी परिसर तसेच विविध किराणा दुकांनावर गर्दी झाली होती.कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी मार्च महिन्यापासून लॉकडाऊनची घोषणा झाली व जीवनावश्यक वस्तूंव्यतिरिक्त इतर व्यवहार थांबले होते. मात्र त्यानंतर जून महिन्यापासून टप्प्या-टप्प्याने व्यवहार सुरू झाले. मात्र हे होत असताना रस्त्यांवरील गर्दीवर नियंत्रण नसल्याने कोरोनाचा संसर्ग वाढतच गेला. त्यामुळे आता पुन्हा ७ जुलैपासून लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेण्यात आला.या वेळच्या लॉकडाऊनमध्ये जीवनाश्यक वस्तूंचेदेखील व्यवहार बंद राहणार असल्याने मार्च महिन्याप्रमाणेच आता पुन्हा शहरात ठिकठिकाणी खरेदीसाठी गर्दी उसळली. तसे पाहता शनिवार, ४ जुलै रोजी लॉकडाऊनसंदर्भात जिल्हा प्रशासनाने निर्णय जाहीर केला. ही वार्ता सोशल मीडियावर पसरताच शनिवार दुपारपासून बाजारपेठेत गर्दी सुरू झाली. संध्याकाळी पाच वाजेपर्यंत दुकानांची वेळ असल्याने अनेकजण खरेदीविना माघारी परतले. मात्र रविवार सकाळपासून पुन्हा बाजारपेठेत गर्दी सुरू झाली.साठा करून ठेवायला प्राधान्यमुळात महिनाभराचा किराणा सामान खरेदी करायचा काळ असल्याने त्यादृष्टीने ग्राहकांचे नियोजन होतेच. त्यात लॉकडाऊनची घोषणा झाल्याने जे नंतर खरेदी करणारे होते, तेदेखील बाजारपेठेत पोहचले. त्यामुळे गर्दीत अधिक भर पडत गेली. महिनाभर लागण्याऱ्या साहित्यापेक्षा अधिकचा साठा करण्यावर ग्राहकांनी भर दिला. या पूर्वीच्या लॉकडाऊनमध्ये जीवनावश्यक वस्तूंचे व्यवहार सुरू होते. मात्र या वेळी हे व्यवहारही बंद राहणार असल्याने अधिक गर्दी झाली.बटाट्याचे भाव वधारलेकिराणा साहित्यासह भाजीपाला खरेदीसाठीही नागरिकांची गर्दी झाली. कांदे, बटाटे, लसण, आले या टिकावू वस्तूंची खरेदी मोठ्या प्रमाणात केली जात होती. बटाट्याला मागणी वाढल्याने त्याचे भाव थेट ४० रुपये प्रति किलोवर पोहचले.फळ दुकानांवरही गर्दीवेगवेगळ््याभागामध्ये मोठ्या प्रमाणात टरबूज, संत्रे, केळी तसेच अननस इत्यादी फळांचीदेखील खरेदी केली जात होती़ त्यामुळेया दुकानांवरही गर्दी झाली होती़मेडिकल स्टोअर्सवर गर्दीरविवारी सकाळपासून जवळपास सर्वच भागांमधील मेडिकल स्टोअर्सवर औषधी घेण्यासाठी नागरिकांची गर्दी झालेली होती़ एक-एका दुकानावर पंधरा ते वीस जण खरेदी करतानाचे चित्र होते. तसे पाहता लॉकडाऊनमध्ये औषधी दुकाने सुरू राहणार आहेत, मात्र मधुमेह, उच्च रक्तदाब, ह्रदयविकार अशा वेगवेगळ््या आजारांसाठीचे औषध खरेदी करून ठेवले. लॉकडाऊनदरम्यान औषधी खरेदीस मुभा असली तरी आपापल्या भागातच ती खरेदी करायची असल्याने व दुचाकीवर जाण्यासही मज्जाव असल्याने नागरिक अगोदरच औषधी साठा करून ठेवत असल्याचे चित्र आहे.

टॅग्स :Jalgaonजळगाव