लॉकडाऊनमुळे नागरिकांची पायपीट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 30, 2020 09:58 PM2020-03-30T21:58:45+5:302020-03-30T22:01:10+5:30

चाळीसगाव , जि.जळगाव : कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी सरकारने लॉकडाऊन केला असून देशासह राज्यभर संचारबंदी लागू असून यामध्ये सर्व एसटी, ...

Citizens' pipette due to lockdown | लॉकडाऊनमुळे नागरिकांची पायपीट

लॉकडाऊनमुळे नागरिकांची पायपीट

Next
ठळक मुद्देसंचारबंदीचा फटकावाहनाअभावी गावाकडे येणे झाले अवघड

चाळीसगाव, जि.जळगाव : कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी सरकारने लॉकडाऊन केला असून देशासह राज्यभर संचारबंदी लागू असून यामध्ये सर्व एसटी, रेल्वे वाहतूक पूर्णत: बंद झालेली आहे. त्याची झळ अनेक नागरिकांना सोसावी लागत आहे त्यात सर्व सामान्यांना पेट्रोल व डिझेल मिळत नसल्याने खासगी गाड्यासुद्धा बंद झालेल्या आहेत. याचा फटका रुग्ण, ज्येष्ठ नागरिक व सर्वसामान्य नागरिकांना बसत आहे तर एसटी व रेल्वे सध्या बंद असल्याने नागरिकांना गावाकडे येणेसुद्धा अवघड झाले आहे.
गावाकडे जाण्यासाठी कुठल्याही प्रकारची सुविधा उपलब्ध नसल्याने अनेकांना पायपीट करीत चालत यावे लागत आहे. कोरोना सदृश रुग्णांची संख्या वाढण्याचा धोका लक्षात घेऊन सरकारने खबरदारी घेतली. मात्र याच्या भीतीने मुंबई व पुण्यातील कामाधंद्याच्या शोधात गेलेले अनेकजण खेड्याकडे वळालेले असतांना त्यांना पायपीट हाच शेवटचा पर्याय उरला आहे.
पनवेल येथे टाटा पॉवर केबल लाईनचे काम करणाऱ्या हातमजुरांवर ही वेळ येवून ठेपली आहे. २६ रोजी पनवेल येथून पायपीट करीत निघालेले मजूर अमरावती जिल्ह्यातील लोणी तालुक्यातील बहिलनपूर या गावी निघाले आहेत. जिगर भोसले, सुधाकर भोसले, मुनेष पवार यांच्यासह दोन चिमुरड्यांसह निघालेले मजूर कुटुंब आज चाळीसगावला मध्यरात्री पोहोचले.
सदर मजूर कुटुंब हे मध्यरात्री चाळीसगाव शहरात आले असतांना समाजसेवक स्वप्नील कोतकर, अभिजीत शितोळे, स्वप्नील धामणे, अभिलाष एसके, हर्षल ब्राह्मणकर या समाजसेवकांनी आस्थेवाईकपणे विचारपूस करीत तत्काळ त्यांना जेवणाची व्यवस्था करुन देत त्यांना वेदनाशामक औषधींची उपलब्धता करुन दिली. तर त्यावेळी रस्त्यावरुन जात असलेले सामाजिक कार्यकर्ते रोशन जाधव, लंकेश शर्मा, गव्हर्नमेंट कॉंट्रॅक्टर रवी देशमुख, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष दिनेश पाटील यांनी रोख स्वरुपात मदत करीत समाजभान जपत मजूर कुटुंबास मायेचा आधार देत समाजभान जोपासले.

Web Title: Citizens' pipette due to lockdown

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.