शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

भुसावळात घरकुल प्रकरणी नागरिकांनी मांडल्या व्यथा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 20, 2019 19:42 IST

पंतप्रधान आवास योजनेंतर्गत लाभार्र्थींना दोन वर्षांनंतरही घरकुल मिळाले नसल्याने लाभार्र्थींनी आपल्या व्यथा मांडल्या.

ठळक मुद्देमुख्याधिकाऱ्यांची गाडी अडवून विचारला जाब मंजूर घरकुले दोषमुक्त करून लाभार्र्थींना मिळतील -मुख्याधिकारी करुणा डहाळे

भुसावळ, जि.जळगाव : पंतप्रधान आवास योजनेंतर्गत लाभार्र्थींना दोन वर्षांनंतरही घरकुल मिळाले नसल्याने लाभार्र्थींनी आपल्या व्यथा मांडल्या. याआधी मुख्याधिकारी करुणा डहाळे बाहेर जात असताना त्यांचे वाहन अडवून त्यांना जाब विचारला. यावर मंजूर सर्व घरकुले दोषमुक्त करून लाभार्र्थींना दिली जातील, असे मुख्याधिकाऱ्यांनी आश्वासन दिले.पंतप्रधान आवास योजनेंतर्गत घरकुल भागातील पात्र लाभार्र्थींना हक्काचे घरकुल उभारता यासाठी शासनाकडून अनुदान स्वरूपात आर्थिक मदत मिळते. सन २०१७-१८ मध्ये भुसावळ पालिकेकडून पात्र लाभार्र्थींकडून अर्ज भरण्यात आले होते. दोन वर्षांचा कालावधी उलटूनही लाभार्र्थींना घरकुल बांधकामासाठी कोणत्याही स्वरूपाची आर्थिक मदत मिळालेली नाही. अवकाळी पावसामुळे अनेक नागरिकांचे संसार उघड्यावर आले आहे. त्यांना त्वरित लाभ मिळावा याकरिता माजी नगरसेवक दीपक धांडे यांनी पुढाकार घेतला. याबाबत ७ नोव्हेंबर रोजी पात्र लाभार्र्थींना त्वरित लाभ मिळावा यासाठी निवेदन दिले होते.लोकसभा निवडणुकीपूर्वी पालिका प्रशासनाने शहरातील जवळपास ३५० पेक्षा जास्त लाभार्र्थींची घरकुलांची यादी प्रसिद्ध केली होती व यासाठी एक कोटी ४४ लाख रुपयाचे अनुदान पहिल्या टप्प्यात पालिका प्रशासनाकडे प्राप्त झाले आहे. परंतु संथ गतीने सुरू असलेल्या कारभारामुळे लाभार्र्थींना योजनेपासून वंचित राहावे लागत आहे. लाभार्र्थींनी संबंधित अधिकाºयांकडे कागदपत्र पत्राची पूर्तता करूनसुद्धा व यासाठी पाच हजाराचा आर्थिक भुर्दंड सोसावा लागला आहे. उसने घेऊन कागदांची पूर्तता केलेली आहे. परंतु लाभ काही मिळालाच नाही. यातूनच नागरिकांच्या भावना तीव्र झाल्या. म्हणून नागरिकांनी आंदोलनाचा पवित्रा उगारला.जास्तीत जास्त पात्र लाभार्र्थींना घरकुल मिळावे यासाठी प्रशासन युद्धपातळीवर प्रयत्न करीत आहे. परंतु अनेक प्रस्तावामध्ये गट नंबर, सर्वे नंबर लाभार्र्थींचे नाव यात गोंधळ आहे. यामुळे चुकीच्या व्यक्तीला त्याचा लाभ होऊ नये याकरिता काही विलंब झाला आहे. लवकरच त्रुटी दूर करून पात्र लाभार्र्थींना हक्काचे घरकुल देण्यात येणार आहे.-करुणा डहाळे, मुख्याधिकारी, नगरपालिका, भुसावळ

टॅग्स :agitationआंदोलनBhusawalभुसावळ