आॅनलाईन लोकमतजळगाव, दि.२४ : एकीकडे सुर्य आाग ओकत असताना नागरिक प्रचंड उकाड्याने हैराण झाले आहेत. तर दुसरीकडे महावितरणकडून गेल्या आठवड्याभरापासून तालुक्यातील ग्रामीण भागात पुकारलेल्या अघोषीत भारनियमनामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. दुपारच्या वेळेस पाच ते सहा तास विज पुरवठा खंडीत होत असल्याने उकाड्यामुळे घरात थांबणेही कठीण झाले आहे.जिल्ह्यात सध्या उष्णतेची लाट पसरली आहे. तापमानाने ४५ अंशाचा पारा पार केला आहे. अशा परिस्थितीत नागरिक घरातच पंखे, कुलर सुरु करून घरातच राहणे पसंत करतात. मात्र,भर दुपारीच तालुक्यातील आव्हाणे, वडनगरी, खेडी, फुपनगरी या गावांमध्ये विजपुरवठा खंडीत होत आहे. सकाळी १० वाजेला विज गेल्यानंतर दुपारी ३ वाजेच्या सुमारास विज पुरवठा परत येतो. यामुळे ज्येष्ठ नागरिक व लहान मुलांचे हाल होत आहे. याबाबत ग्रामीण भागातील नागरिकांनी महावितरणकडे तक्रार केली असून, या तक्रारीची दखल देखील घेतली जात नाही.
जळगावात अघोषीत भारनियमनाने नागरिक त्रस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2018 20:08 IST
महावितरणकडून गेल्या आठवड्याभरापासून तालुक्यातील ग्रामीण भागात पुकारलेल्या अघोषीत भारनियमनामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत.
जळगावात अघोषीत भारनियमनाने नागरिक त्रस्त
ठळक मुद्देवीज नसल्याने उकाड्यामुळे घरात थांबणेही कठीणउन्हाचा ताप त्यात भारनियमनाचे संकटजिल्ह्यात सध्या उष्णतेची लाट