शहरं
Join us  
Trending Stories
1
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
2
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
3
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
4
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
5
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
6
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
7
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
8
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
9
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
10
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
11
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
12
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
13
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
14
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
15
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
16
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
17
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
18
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
19
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
20
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!

चोपडा येथील कुंटणखान्यातील अतिक्रमित झोपड्यांवर संक्रांत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2020 18:05 IST

कुंटणखाना चालत असलेल्या भागातील अतिक्रमित झोपड्यांवर संक्रांत आली आहे.

ठळक मुद्देहतनूर विभागाकडून जेसीबीद्वारा घरे उद्ध्वस्त३०-३५ वर्षांपासून सुरू होता कुंटणखाना

चोपडा, जि.जळगाव : येथील धरणगाव रस्त्यावर हतनूर उजव्या कालव्याला लागून असलेल्या हतनूर प्रकल्पाच्या जागेवरील कुंटणखाना चालत असलेल्या भागातील अतिक्रमित झोपड्यांवर संक्रांत आली आहे. हतनूर विभागाने जेसीबीद्वारे हे अतिक्रमण मंगळवारी काढले.हतनूर प्रकल्पाच्या जमिनीवर गेल्या ३० ते ३५ वर्षांपासून अतिक्रमित घरे, झोपड्या उभारून कुंटणखाना सुरू होता. याविषयी वारंवार विविध विभागांकडे नागरिकांनी तक्रारीही केल्या होत्या. या तक्रारींची दखल घेऊन काही कारवाया यापूर्वीही केल्या आहेत. परंतु १४ जानेवारी रोजी हतनूर पाटबंधारे विभागाच्या चोपडा कार्यालयाने कालव्या लगत असलेल्या या जमिनीवरील अतिक्रमण केलेली २५ घरे जेसीबी लावून जमीनदोस्त करून सुमारे १० हजार चौरस फूट जागा मोकळी केली. कुंटण खाण्याच्या अतिक्रमित झोपड्यांवर आत्मा विभागाकडून संक्रांत आली.हतनूर पाटबंधारे विभागातर्फे या ठिकाणी वास्तव्यास असणाऱ्या वेश्यांना यापूर्वी तीन वेळा नोटिसा बजावण्यात आल्या होत्या. तरीही त्यांनी जागा खाली न केल्याने दंडाधिकाऱ्यांच्या आदेशान्वये ही कारवाई करण्यात आल्याचे शाखा अभियंता पी. बी.पाटील यांनी सांगितले. या कारवाईत उपविभागीय अभियंता ए. जे.निकम, शाखा अभियंता पी.आर. सोनवणे यांच्यासह २० कर्मचारी उपस्थित होते.याकामी स पो.नि. मनोज पवार यांच्यासह २६ पुरुष व ३ महिला पोलीस कर्मचाºयांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.जागेचे प्रतिदिन भाडे रुपये एक हजार@वेश्या व्यवसायासाठी बाहेरून आलेल्या महिलांनी याठिकाणी उभारलेल्या झोपड्यांंमध्ये व्यवसाय सुरू केला होता. यातील बºयाच वेश्यांना झोपड्या, पत्र्याची घरे ही स्थानिक लोकांनी बांधून दिली. त्यांना प्रति दिवस एक हजार रुपये भाडे द्यावे लागत होते, असेही घटनास्थळी समजले. यामागे मोठे अर्थकारण होत असल्याने तसेच गुंडगिरी फोफावत असल्याने त्याविरोधात ही कारवाई करण्यात आल्याने शहरात समाधान व्यक्त केले जात आहे.कुंटणखान्यातील महिला घरातील साहित्य काढून वाचविण्याचा प्रयत्न करत होत्या. काही महिलांनी रिक्षामध्ये घरातील साहित्य टाकून दुसरीकडे हलवण्यासाठी धावपळ केली. मात्र हतनूर विभागाकडून तोडण्यात आलेली घरांचे पत्रे जेसीबीने संपूर्ण नेस्तनाबूत करण्यात आले. केवळ भंगारमध्ये ते पत्रे विकले जातील, या स्वरूपाचे करून पुन्हा या ठिकाणी अतिक्रमण होणार नाही, यासाठी हतनूर विभागाचे अधिकारी सतर्क राहणार आहेत.गेल्या ३५-४० वर्षांपासून ही वस्ती या ठिकाणी वसलेली होती. यामुळे अनेक घटनाही घडलेल्या होत्या. परंतु आता या विभागाने पोलीस संरक्षणात केलेल्या थेट कारवाईमुळे आता ही वस्ती मात्र याठिकाणी नष्ट करण्यात आलेली आहे.

टॅग्स :SocialसामाजिकChopdaचोपडा