शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
6
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
7
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
8
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
9
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
10
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
11
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
12
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
13
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
14
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
15
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
16
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
17
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
18
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
19
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
20
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
Daily Top 2Weekly Top 5

उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात अखेर चॉईस बेस्ड सिस्टीम लागू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2018 19:39 IST

विद्यार्थी व महाविद्यालयांच्या शैक्षणिक हिताच्या दृष्टीने यावर्षापासून चॉईस बेस्ड क्रेडिट सिस्टीम लागू करण्याचा निर्णय अधिष्ठाता व सर्व अभ्यासमंडळ अध्यक्षांच्या बैठकीत घेण्यात आला.

ठळक मुद्देजागतिक स्पर्धेत विद्यार्थी टिकावा यासाठी घेतला सर्वानुमते निर्णयप्राध्यापकांच्या कामकाजावर कोणताही परिणाम होणार नाहीअधिष्ठाता व अभ्यास मंडळाच्या बैठकीत घेतला निर्णय

जळगाव : विद्यार्थी व महाविद्यालयांच्या शैक्षणिक हिताच्या दृष्टीने यावर्षापासून चॉईस बेस्ड क्रेडिट सिस्टीम लागू करण्याचा निर्णय अधिष्ठाता व सर्व अभ्यासमंडळ अध्यक्षांच्या बैठकीत घेण्यात आला.कुलगुरू प्रा.पी.पी.पाटील यांच्या अध्यक्षतेखाली गुरूवार १२ रोजी विद्यापीठात बैठक झाली. यावेळी चॉईस बेस्ड क्रेडीट सिस्टीम अर्थात 'सीबीसीएस' प्रणालीवर सविस्तर चर्चा झाली. शैक्षणिक क्षेत्रातील बदल लक्षात घेऊन उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचा विद्यार्थी या स्पर्धेत टिकावा यादृष्टीने जे नवे बदल करता येतील त्या बदलांना सामोरे जाण्याचा सर्व अभ्यासमंडळाच्या अध्यक्षांनी बैठकीत निर्धार व्यक्त केला.कुलगुरू प्रा.पी.पी.पाटील यांनी 'सीबीसीएस' प्रणालीचे फायदे सांगितले. विद्यापीठ अनुदान आयोगाच्या निर्देशाप्रमाणे व नवीन विद्यापीठ कायदा लक्षात घेऊन ही प्रणाली या वर्षापासून लागू केली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. या प्रणालीमुळे प्राध्यापकांच्या कार्यभारावर कोणताही परिणाम होणार नाही आणि परिणाम झाल्यास विद्यापीठ हे प्राध्यापकांच्या पाठीशी पुर्णत: उभे राहील. प्रसंगी शासन दरबारी याबाबत पाठपुरावा केला जाईल, अशी ग्वाही बैठकीत दिली.'सीबीसीएस' प्रणाली प्रमाणे २०१८/१९ चे सर्व अभ्यासक्रम तयार करण्यात आले आहे. महाविद्यालयाच्या प्राचार्यांना सूचना देण्यात आल्याची माहिती बैठकीत देण्यात आली. सर्वच अभ्यासमंडळांच्या अध्यक्षांनी ही प्रणाली लागू करणे ही काळाची गरज असल्याचे मत व्यक्त केले. नॅक, रूसा आणि एनआयआरएफच्या मार्गदर्शक सूचनांमध्ये देखील ही प्रणाली अत्यावश्यक असल्याचे नमूद करण्यात आले आहे. ज्या महाविद्यालयांमध्ये ही प्रणाली लागू करण्यात आलेली नसेल, त्या महाविद्यालयांना रूसाकडून कोणत्याही प्रकारचे अनुदान दिले जाणार नसल्याचे यावेळी सांगितले.याचा फायदा विद्यार्थ्यांच्या रोजगार वाढीसाठीच होणार आहे, असे मत या बौठकीत व्यक्त झाले.प्र-कुलगुरू प्रा.पी.पी.माहुलीकर यांनी या प्रणालीच्या अनुषंगाने तांत्रिक माहिती दिली. व्यवस्थापन परिषद सदस्य दिलीप पाटील, अधिष्ठाता प्राचार्य पी.पी.छाजेड, प्राचार्य प्रमोद पवार आणि सर्व अभ्यासमंडळांचे अध्यक्ष उपस्थित होते.

टॅग्स :North Maharashtra Universityउत्तर महाराष्ट्र विद्यापीठJalgaonजळगाव