शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यर सिडनीच्या रुग्णालयात दाखल, ICUमध्ये उपचाराला सुरुवात, कॅच घेताना झालेली दुखापत
2
महिला डॉक्टर हॉटेलमध्ये का राहत होती? प्रशांत बनकरसोबत भांडण झालेले, समोर आले मोठे कारण...
3
'कॉल मर्जिंग स्कॅम'चा नवा धोका: तुमचा फोन सुरु असतानाच दुसरा कॉल येईल..., बँक खाते रिकामे होईल...
4
"टीम इंडियाला ऑस्ट्रेलियात माझी गरज होती, पण त्यांनी... "; अजिंक्य रहाणे सिलेक्टर्सवर बरसला
5
१९९० मध्ये एकाच ठिकाणी उभे होते भारत आणि चीन; मग ड्रॅगन कसा गेला पुढे, दिग्गज उद्योजकानं सांगितली संपूर्ण कहाणी
6
पंतप्रधान मोदींची 'ती' गाडी बिहारमधील लोकल गॅरेजवर धुण्यासाठी? प्रोटोकॉल तोडल्याच्या चर्चांना उधाण
7
चातुर्मास कधी संपणार? पाहा, विष्णुप्रबोधोत्सव, कार्तिकी एकादशीचे महत्त्व, महात्म्य, मान्यता
8
'AI'ची मोठी चूक! चिप्सच्या पाकिटाला बंदूक समजले; शाळकरी विद्यार्थ्याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या...
9
Numerology: ‘या’ ४ पैकी तुमची बर्थडेट आहे? १८ वर्षांची महादशा-दोष दूर; राहु कृपेने पैसा-लाभ
10
टाकाऊपासून टिकाऊ! कचऱ्यातील प्लास्टिकपासून बनवली काँक्रिटपेक्षा ३०% मजबूत विट
11
टीव्हीवरचं लोकप्रिय कपल, लग्नाच्या १४ वर्षांनी जय भानुशाली-माही विजचा घटस्फोट?
12
फक्त आरोग्य विमा काढणे पुरेसे नाही? 'या' एका नियमामुळे तुमचा क्लेम रिजेक्ट होईल, खिशाला बसेल भुर्दंड
13
माजी CJI चंद्रचूड यांच्या विधानाचा आधार, राम मंदिराविरोधात याचिका; वकिलाला ६ लाखांचा दंड
14
"टाटा समूहात जे सुरू आहे, ते पाहून..," रतन टाटांचे निकटवर्तीय नोशीर सूरावालांनी अखेर मौन सोडलं
15
भारतापासून १४ हजार किमी दूर, १४ लाख लोकसंख्या; ‘हा’ देश बांधणार राम मंदिर, हिंदू वस्ती किती?
16
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना ऑक्टोबर सांगता सुखाची, पद-पैसा-लाभ; ६ राशींना खडतर काळ!
17
खळबळजनक! सुसाट डिफेंडरची ५ वाहनांना जोरदार धडक; तिघांचा मृत्यू, ५ जण जखमी
18
पैसे कमावण्याची संधी? ५ मोठे आयपीओ बाजारात येणार; लेन्सकार्टसह 'या' कंपन्यांची लिस्टिंगची तयारी
19
दक्षिण चीन समुद्रात खळबळ; अर्ध्यातासाच्या अंतराने अमेरिकन नौदलाची दोन विमाने कोसळली
20
८ वा वेतन आयोग कधी लागू होणार? घोषणेच्या १० महिन्यांनंतरही अधिसूचनेची प्रतीक्षाच

चिनावलकरांची लॉटरी - एटीएममधून निघाली चक्क पाच पट रक्कम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2021 01:09 IST

एटीएममधून पाच पट पैसे निघत असल्याने पैसे काढण्यासाठी एकच गर्दी झाली होती.

चिनावल, ता. रावेर : कधी कुणी स्वप्नातही विचार केला नसेल असा आश्चर्यकारक अनुभव मंगळवारी चिनावलकरांनी एटीएममधून पैसे काढताना अनुभवला. चक्क एटीएममधून टाकलेल्या रकमेच्या पाच पट पैसे निघत असल्याने येथील एसटी स्टँड परिसरातील ईंडीकॅशच्या एटीएमवर सायंकाळी सहा ते रात्री साडेआठपर्यंत तोबा गर्दी उसळली. पोलीस आल्यानंतर गर्दी निवळली.येथील एटीएममधून पैसे काढणारांनी जणू लॉटरी लागल्यागत स्थिती अनुभवली. या प्रकाराची वाच्यता गावात होताच सर्वस्तरीय एटीएमधारकांनी या एटीएमवर गर्दी केली. एटीएममध्ये ५०० रुपये व त्याच्या पटीत रक्कम टाकल्यास चक्क पाच पट रक्कम निघत असल्याने अवघ्या अडीच तासात जवळजवळ सहा लाख रुपये येथून विड्राल झाल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे.रात्री नऊ वाजेच्या सुमारास ईंडीकॅश कंपनीच्या लोडीग कर्मचाऱ्यांला याबाबतची माहिती मिळताच त्यांनी तत्काळ सावदा पोलीस स्टेशनला कळवून ए.टी.एम असलेल्या गर्दीवर नियंत्रण मिळवले व एटीएम लॉक केले. तोपर्यंत बरीच रक्कम एटीएममधून काढली गेली होती.याबाबत अद्याप सावदा पोलीस स्टेशनला नोंद झाली नसली तरी एटीएम सुरक्षेसाठी हे. काँ. विनोद पाटील, रिजवान पिंजारी, ईशान तडवी, सुरेश अडाएगे, होमगार्ड प्रकाश भालेराव येथे तळ ठोकून आहेत.सेटींगमध्ये चूक?याबाबत एटीएमच्या लोडीग कर्मचाऱ्यांला विचारणा केली असता पैसे भरताना नोटांची ब्लॉक सेटींग चुकीची झाली असावी अथवा मशीन सेटींग बिघाड झाल्याचा अंदाज व्यक्त केला. या प्रकारामुळे मात्र चिनावलकरांना मात्र लॉटरी लागल्यागत अनुभव आला. चिनावल व पंचक्रोशीत या प्रकाराची जोरदार चर्चा होती. अद्यापपावेतो ईडीकॅश कंपनीची कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया मिळाली नाही.

टॅग्स :MONEYपैसाRaverरावेर