शहरं
Join us  
Trending Stories
1
VIDEO: उत्तरकाशीमध्ये ढगफुटी; १४ सेकंदात सगळं गाव उद्ध्वस्त, घरांसह अनेकजण ढिगाऱ्याखाली गाडले गेले
2
मंत्रिमंडळ बैठकीत ७ मोठे निर्णय; स्टार्टअप उद्योजगता धोरण जाहीर, समृद्धी फ्रेट कॉरिडॉर मंजूर
3
मराठीशी पंगा महागात! निशिकांत दुबेंच्या अडचणी वाढण्याची शक्यता; मनसेकडून याचिका दाखल
4
टाटा ग्रुपचा मोठा धमाका! शेअर बाजारात येणार आणखी एका कंपनीचा IPO, गुंतवणूकदार मालामाल होणार?
5
२०,५००% रिटर्न! बिहारच्या या कंपनीनं ५ वर्षांत ₹१ लाखांचे केले ₹२ कोटी, तुमच्याकडे आहे का?
6
Amit Shah: विक्रमी अमित शाह! 'अशी' कामगिरी करणारे पहिलेच गृहमंत्री, अडवाणींनाही टाकले मागे
7
बिहारमध्ये डोमिसाईल पॉलिसी मंजूर; शिक्षक भरतीमध्ये ८५ टक्के बिहारींनाच नोकरी मिळणार
8
पाकिस्तानातील प्रत्येक सहावा व्यक्ती भिकारी; परदेशात पसरलं नेटवर्क, दरवर्षी ११७ ट्रिलियन कमाई
9
सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय; घटस्फोटानंतर 12 कोटी रुपये अन् BMW कार मागणाऱ्या पत्नीला काय मिळाले?
10
डोनाल्ड ट्रंप टॅरिफविरोधात भारतीय सैन्याची एन्ट्री; ५४ वर्षांपूर्वीची कारस्थाने बाहेर काढली...
11
युजवेंद्र चहलने घटस्फोटावर उघडपणे विधान केल्यानंतर Ex-पत्नी धनश्रीची पोस्ट, म्हणाली- शांतता...
12
सरकारांना ईव्हींवर आणखी ऑफर्स द्याव्या लागणार? विक्रीच्या वेगावर निती आयोगाचे वक्तव्य...
13
छोट्या भावावर हात उचलणाऱ्याला कायमचं संपवलं; भावाचा बदला घेणारी २२ वर्षीय 'लेडी डॉन' कोण?
14
नवऱ्याचं पोट फाडलं, मृतदेहावर अ‍ॅसिड ओतलं; बॉयफ्रेंडसाठी तबस्सुमनं गाठला क्रूरतेचा कळस 
15
Jalana: "भाजप प्रवेशाच्या निव्वळ अफवा"; राजेश टोपेंनी चर्चांना दिला पूर्णविराम
16
कथावाचक प्रदीम मिश्रा यांच्या कुबेरेश्वर धाममध्ये चेंगराचेंगरी, २ महिलांचा मृत्यू, अनेकजण जखमी   
17
Satyapal Malik Death: जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांचे निधन; राम मनोहर लोहिया रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
18
Thane: ठाण्यातील प्रतिष्ठित शाळेत ४ वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचार, पालकांच्या आरोपानंतर तपास सुरू
19
दरवर्षी मान्सून येताच लखपती बनतात इथले लोक; आंध्र प्रदेशच्या २ जिल्ह्यातील लोकांचं नशीब बदलतं
20
Satyapal Malik: 'मला सत्य सांगायचे आहे', शेवटच्या पोस्टमध्ये काय म्हणाले होते सत्यपाल मलिक?

चिमुकल्यांचा सुट्टीचा मूड कायम, अभ्यासाचाच पडला विसर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2021 04:12 IST

स्टार - ९०२ सागर दुबे लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : सध्या दहा वर्षांपेक्षा कमी वयोगटातील मुलांना कोरोना होण्याची ...

स्टार - ९०२

सागर दुबे

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : सध्या दहा वर्षांपेक्षा कमी वयोगटातील मुलांना कोरोना होण्याची शक्‍यता सर्वाधिक आहे. शिक्षण विभागाने शाळा सुरू करण्यासंदर्भात चाचपणी सुरू केली असली तरी पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांच्या शाळा सद्यस्थितीत सुरू होण्याची चिन्हे नाहीत, हे स्पष्ट आहे. दरम्यान, ऑनलाइन शिक्षणामुळे ही चिमुकली अभ्यासाला लागली नाहीत आणि यामुळे पालक, शिक्षक मात्र हैराण झाले आहेत. शाळा बंद असल्याने अजूनही यांचा सुट्टीचा मूड कायम असल्याच्या प्रतिक्रिया पालक देत आहेत.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या दीड वर्षापासून शाळा बंद आहेत. ऑनलाइन अभ्‍यास जरी सुरू असले तरी या ऑनलाइन अभ्यासामुळे सगळ्यांच्याच अभ्यासाची हेळसांड झालेली आहे. त्यात लहान मुलांच्या अभ्यासाचे मोठे शैक्षणिक नुकसान झाले आहे, असे मत पालक व्यक्त करत आहेत. शिक्षकांच्या प्रत्यक्ष मार्गदर्शनातून विद्यार्थी ज्या संकल्पना, अक्षर ओळख शिकतात त्यापासून सध्‍या विद्यार्थी वंचित राहत आहेत. ऑनलाइन वर्गात विद्यार्थ्यांना अभ्यासात एकाग्र करणे, समरस करणे शिक्षकांसाठी हे मोठे आव्हान ठरत आहे. वर्गात असताना इतर मुलांसोबत म्हणणे, कविता म्हणणे, अक्षर, प्राणी यांची तोंडओळख होणे या गोष्टी विद्यार्थ्यांसाठी सहज, सोप्या होत असतात; मात्र ऑनलाइन शिक्षणात मुलांना त्याचा कंटाळा येत असल्याने मुलांचा शिक्षणाचा पाया कच्चा राहत असल्याच्या तक्रारी पालक करीत आहेत.

पालकांनी घरातच घ्‍यावी शाळा...

कोरोनाची दुसरी लाट ओसरली असली तरी, कोरोनाचा धोका अजूनही टळलेला नाही. या कारणास्तव शाळा ही टप्प्याटप्प्याने सुरू करण्याचा विचार शिक्षण विभाग घेत आहे. ऑनलाइन पद्धतीनेच अभ्यास आणखी काही महिने तरी करू द्यावा, असे मत तज्ज्ञ व्यक्त करीत आहेत. विद्यार्थ्यांना विविध कामांतून, गोष्टीतून, गप्पांतून नवीन संकल्पना आणि विषय समजावून द्यावेत, दैनंदिन कामातून आकडेमोड आणि अक्षरओळख करून द्यावी, सहज बोलताना गाणी, कविता म्हणून घ्याव्यात आणि त्याच्यातून त्यांना धडे द्यावेत, असे तज्ज्ञ पालकांना सूचवितात.

००००००००००००

अभ्यास टाळण्यासाठी कारणे अनेक

- अनेकदा मुले ऑनलाइन नावाखाली गेम्स खेळताना, कार्टून व्हिडीओ बघताना सापडत असल्याच्या तक्रारी पालक करत आहेत.

- ऑनलाइन वर्गांना ही मुले बसतात खरी; पण त्यानंतर शिक्षकांनी सांगितलेला अभ्यास करताना मात्र ते टाळाटाळ करतात.

- प्रत्यक्षात शाळा सुरू असताना किमान ४ ते ५ तास शाळेत असणारी ही मुले घरी असताना मात्र कोणीतरी आले की अथवा पाणी प्यायचे आहे, भूक लागली आहे, बाहेर जायची कारणे देऊन अभ्यासावरून उठून टाळाटाळ करत असल्याची कारणे पालक देतात.

०००००००००००

पालकांची अडचण वेगळीच

गेल्या दीड वर्षापासून मुले घरातच आहेत. कोरोनामुळे मुलांना बाहेर जाता येत नाही. चिडचिडेपणा वाढला आहे. त्यामुळे पालकांची डोकेदुखी वाढली आहे. मोबाइलचे व्यसनही मुलांना लागले आहे.

- हर्षल पाटील, पालक

००००००००००

पूर्वी मुलांच्या हातात मोबाइल दिसला की, त्यांच्यावर रागवावे लागत होते. आता ऑनलाइन शिक्षणामुळे स्वत:हून त्यांना नाइलाजास्तव मोबाइल द्यावा लागत आहे. जर मुलांसोबत अभ्यासाला बसले नाही तर मुले अभ्यासाकडे दुर्लक्ष करतात.

- मनाली दीक्षित, पालक

००००००००००

मुलांना अक्षर ओळख होईना

- पहिली ते चौथीपर्यंतचे विद्यार्थी मोबाइल अथवा टॅबवर ऑनलाइन शिक्षण घेत आहेत. दरम्यान, ऑनलाइन शिक्षणामुळे विद्यार्थ्यांना आता अक्षर ओळख होण्यास अडचणी येत आहेत.

- ऑनलाइन शिक्षणामुळे मुलांसोबत पालकांना पूर्णवेळ गुंतून राहावे लागते. काही मुले मोबाइल हाताळणीत तरबेज झाली आहेत. मात्र, पालकांचे लक्ष हटताच हे पाल्य गेम खेळतात.

- जळगाव जिल्ह्यात लाखाच्यावर विद्यार्थ्यांकडे ऑनलाइन सुविधा नाहीत. परिणामी, या विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षणापासून वंचित राहावे लागत आहे. यामुळे मुलांचे मोठे नुकसान होत आहे. बेसिक पाया कच्चा राहत असल्याचे पालकांचे म्हणणे आहे.

००००००००००००

वर्गनिहाय विद्यार्थी

पहिली : ७६५१४

दुसरी : ७९३१३

तिसरी : ७७९१८

चौथी : ८००५०