शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

जळगावातील कुटूंब कुलदेवतेच्या दर्शनाला अन् घरात मुलाची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 14, 2018 20:33 IST

कुटुंब आमडदे, ता.भडगाव येथे कुलदेवतेच्या दर्शनाला गेले असताना मयुर सुनील भंगाळे (वय २४, रा.सरसस्वती नगर, मुळ रा. कानळदा) या तरुणाने राहत्या घरात पंख्याला बेडशीड बांधून गळफास लावून आत्महत्या केली. ही घटना रविवारी दुपारी साडे चार वाजता सरस्वती नगरात उघडकीस आली.

ठळक मुद्दे सरस्वती नगरातील घटना मुंबई येथे रेल्वेत नोकरीला आहे तरुण दोन दिवसापूर्वीच आला घरी

जळगाव : कुटुंब आमडदे, ता.भडगाव येथे कुलदेवतेच्या दर्शनाला गेले असताना मयुर सुनील भंगाळे (वय २४, रा.सरसस्वती नगर, मुळ रा. कानळदा) या तरुणाने राहत्या घरात पंख्याला बेडशीड बांधून गळफास लावून आत्महत्या केली. ही घटना रविवारी दुपारी साडे चार वाजता सरस्वती नगरात उघडकीस आली. याप्रकरणी शनी पेठ पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, शनी पेठ पोलीस स्टेशनच्या हद्दीत असलेल्या सरस्वती नगरातील सुनील हरी भंगाळे हे पत्नी, मोठा मुलगा तेजस व सून यांच्यासह रविवारी आमडदे येथे कुलदेवतेच्या दर्शनाला गेले होते. सकाळी १०.३० वाजता ते घरातून बाहेर पडले. लहान मुलगा मयुर हा एकटाच घरी होता. दुपारी साडे चार वाजता संपूर्ण कुटुंब घरी आले असता त्यांना पहिल्याच खोलीत मयुर हा पंख्याला लटकलेला दिसला. बेडशीटने त्याने गळफास घेतला होता. हा प्रकार पाहताच कुटुंबाना धक्का बसला. त्यांनी तातडीने मयुर याला जिल्हा रुग्णालयात हलविले असता डॉक्टरांनी मृत घोषीत केले. मयुर हा दोन वर्षापूर्वी मध्य रेल्वेत खलाशी म्हणून भरती झाला होता. परेल, मुंबई येथे त्याची ड्युटी होती. दर शनिवारी तो व  सोबतचे मित्र घरी येत होते. 

संशयास्पद वस्तू किंवा चिठ्ठी नाहीदरम्यान, शनी पेठ पोलीस स्टेशनचे उपनिरीक्षक सुरेश सपकाळे, सहायक उपनिरीक्षक करीम शेख व गिरीश पाटील यांनी घटनास्थळाचा पंचनामा केला. मृत मयुरच्या खिशात चिठ्ठी किंवा संशयास्पद कोणतीच वस्तू आढळून आली नाही.सायंकाळी शवविच्छेदन झाल्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. रात्रीच त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.यावेळी जिल्हा रुग्णालयात मित्र व नातेवाईकांची प्रचंड गर्दी झाली होती.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीJalgaonजळगाव