शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

मुले म्हणतात, पिवळा भात, मी नाही खात; कारण चव नाही त्यात!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 1, 2019 05:01 IST

कुपोषणमुक्तीसाठी सुरुवातीला अंगणवाडीमध्ये बालकांना उसळ, वाटाणे, खिचडी, चवळी व मटकी, हरभऱ्याची उसळ दिली जायची.

- विलास बारीजळगाव : मुलांना कुपोषणातून बाहेर काढण्याच्या नावाखाली, शासनाने तीव्र कुपोषित मुलांना रेडी टू युज थेरपेटिक फूड म्हणून ‘ईझी नट पेस्ट पाकीट’ सुरू केले खरे; मात्र मुलांनाच ते आवडत नाही. त्यामुळे शिल्लक राहिलेली पाकिटे एकतर फेकली जातात किंवा गुरांना टाकली जातात. दुसरीकडे अंगणवाड्यांमध्ये बचत गटांकडून दिला जाणारा आहारदेखील बेचव असल्याची तक्रार आहे.

कुपोषणमुक्तीसाठी सुरुवातीला अंगणवाडीमध्ये बालकांना उसळ, वाटाणे, खिचडी, चवळी व मटकी, हरभऱ्याची उसळ दिली जायची. त्यानंतर पोषण आहार शिजविण्याचा ठेका बचत गटांना दिला गेला. सध्या अंगणवाडीमध्ये ३ ते ६ वर्षे वयाच्या मुलांना एक दिवस वरणभात, तीन दिवस उपमा व शिरा आणि दोन दिवस कांदे पोहे व खिचडी देण्यात येते. मुलांच्या पोषणासाठी शासन बचत गटांना ८ रुपये अनुदान देते. त्यात ५० पैसे इंधनावर खर्च होत असून, ५० पैसे आहार तयार करणा-या बचत गटांना मिळतात. उर्वरित ७ रुपयांमध्ये तयार होणाºया आहारात कोणते पौष्टिक घटक राहणार? बेचव असणारा हा आहार बालक नाकारत आहेत. ‘पिवळा भात, मी नाही खात... का नाही खात, तर चव नाही त्यात,’ अशी सर्वसाधारण प्रतिक्रिया बालकांची असते.

आता महिला व बालविकास विभागाच्या माध्यमातून तीव्र कुपोषित बालकांना पेस्ट स्वरूपात आहार दिला जात आहे. दिवसातून किमान तीन पाकिटे देण्यात येतात. एका पाकिटाची किंमत २५ रुपये. याप्रमाणे दिवसाला किमान ७५ रुपये एका बालकावर खर्च होतात. आधीच्या व्हीसीडीसी योजनेत राज्यातील कुपोषित मुलांना १८ कोटी रुपयांमध्ये गरम ताजा आहार मिळत होता. आता या पेस्ट पाकिटांवर सुमारे २५ कोटी रुपये सरकार खर्च करीत आहे.ज्यांना हवे त्यांच्या वाट्याला किती?सहा महिने ते तीन वर्षे वयाच्या अंगणवाडीतील मुलांसाठी तसेच शाळेत न जाणाºया किशोरवयीन मुली व गर्भवती मातांसाठी शासनातर्फे मुगाची डाळ, मसूरची डाळ, चवळी, हळद, मिरची व तेलाची पाकिटे दिली जातात. या पाकिटांमुळे कुपोषणमुक्तीला हातभार लागत असला, तरी हे पूर्ण अन्नघटक बाळ, किशोरवयीन मुली किंवा गर्भवतीच्या वाट्याला येतात का, असा प्रश्न आहे.आदिवासी मुलांचा आहार हा वेगवेगळा आहे. शून्य ते ६ वर्षे हा वयोगट मुलांच्या बौद्धिक वाढीचा असतो. त्यासाठी कुपोषित बालकांना समतोल आहार देणे आवश्यक आहे. पेस्ट स्वरूपात देण्यात येणाºया आहाराची शिफारस कुणी केली? या आहारात त्रुटी असल्यास ते तपासण्याचे अधिकार कुणाला, हे सर्व निश्चित होणे गरजेचे आहे. तात्पुरत्या उपाययोजनेपेक्षा कायमस्वरूपी उपायांची गरज आहे.- अ‍ॅड. बंड्या साने,खोज सामाजिक संस्था, मेळघाट.पेस्ट स्वरूपात देण्यात येणाºया या आहाराचा पूरक पोषण आहारात समावेश होतो. एका पाकिटातून बाळाला ४५ टक्के एनर्जी मिळते. बाळाच्या वाढीसाठी आवश्यक असलेले सर्व घटक यात आहेत. कुपोषित बालकाच्या प्रतिकारशक्ती वाढीसाठी हे उपयुक्त आहे.- डॉ. राजेंद्र पायघन, बालरोगतज्ज्ञ, जळगाव.

टॅग्स :Jalgaonजळगाव