शहरं
Join us  
Trending Stories
1
‘शटडाऊन’च्या पहिल्याच दिवशी अमेरिकेत संकट; देशातील अनेक महत्त्वाची पर्यटनस्थळे तात्पुरती बंद
2
'युरोपने चिथावणी दिली तर योग्य उत्तर मिळेल,तेल खरेदीबाबत भारत अमेरिकेच्या दबावाला झुकणार नाही';पुतिन यांचा स्पष्ट इशारा
3
आजचे राशीभविष्य- ०३ ऑक्टोबर २०२५, धनलाभ होईल, प्रतिस्पर्ध्यांवर मात करू शकाल
4
‘बाबा’कडे तसले टॉय, पॉर्न सीडी, अश्लील चॅट अन्... चैतन्यानंदच्या चौकशीतून धक्कादायक माहिती बाहेर
5
श्वासात, ध्यासात गांधी विचार जगलेला स्वातंत्र्य संग्रामातील तारा निखळला; ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी डॉ. जी. जी. पारीख कालवश
6
सर्व राज्यांत मतदार यादीतून हटवणार मृत व्यक्तींची नावे; जन्म-मृत्यू नोंदणी कार्यालयाचा डेटा निवडणूक यंत्रणेशी जोडणार
7
तेजीचे दिवस; अर्थव्यवस्थेची मरगळ झटकली, नोकऱ्या आणि गिग कामगारांसाठी 'अच्छे दिन' का?
8
हिंसा हे प्रश्नांचे उत्तर नाही, लोकशाहीतूनच आमूलाग्र बदल शक्य आहे : सरसंघचालक डॉ. मोहन भागवत
9
संकटात जो घरी बसतो तो कसला आला शिवसैनिक? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची उद्धव ठाकरेंवर टीका
10
संघ मेहनतीला लागलेले भाजप हे विषारी फळच! उद्धव ठाकरे यांचा दसरा मेळाव्यात घणाघात
11
मुंबई महापालिकेवर युतीचा भगवा फडकणार; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची नेस्काेच्या सभेत घाेषणा
12
डॉ. जी. जी. पारीख गोवा महामार्गाच्या आंदोलनात खुर्ची टाकून बसले तेव्हा!
13
केवळ लठ्ठपणाच नव्हे, तर मुलांच्या यकृतातील चरबी ठरतेय गंभीर आजारांसाठी आमंत्रण!
14
आता पाहा, मित्र-मित्रच एकमेकांना कापताना दिसतील!
15
महापालिका अदानींच्या पायावर ठेवणार का? उद्धव ठाकरेंचा सवाल, श्वेतपत्रिकेची केली घोषणा
16
जेईई, नीट यांसारख्या परीक्षा अन् बारावीचा अभ्यासक्रम यापैकी नेमके कठीण काय? केंद्र करणार मूल्यमापन 
17
एकाच समाजातील दोन गटात तुफान हाणामारी; सोनाळा पोलिस ठाण्यात १५ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल
18
दिवाळीपूर्वी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होणार : अजित पवार
19
Sana Mir Controversial Comment : सनाची Live मॅच वेळी वादग्रस्त कमेंट; ICC तिला नोकरीवरून काढणार?
20
आंतरराष्ट्रीय कुख्यात गँगशी संबंधित १० जणांना अमरावती येथील परतवाड्यातून घेतले ताब्यात

पायावरील शस्त्रक्रियेनंतर बालक शुद्धीवर आलाच नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2019 11:29 IST

उपचारात हलगर्जीमुळे मृत्यू

ठळक मुद्दे चौकशी समितीच्या अहवाल ठपका

जळगाव : दीड वर्षाच्या बालकावर उपचार करताना निष्काळजीपणा केल्याचे सिध्द झाल्याने चिरायु हॉस्पिटलच्या ८ डॉक्टरांविरुध्द शनिवारी मध्यरात्री जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात ३०४ अ प्रमाणे (मृत्यूस जबाबदार) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. धुळे येथील शासकीय हिरे महाविद्यालयाच्या चौकशी समितीच्या अहवालावरुन हा गुन्हा दाखल झाला आहे. या अहवालात डॉक्टरांवर गंभीर ठपका ठेवण्यात आला आहे.गुन्हा दाखल झालेल्या डॉक्टरांमध्ये डॉ.राजेश श्रीकृष्ण शिंपी, डॉ. गिरीश इच्छाराम गाजरे, भूलतज्ज्ञ डॉ. एच. आर. बºहाटे, डॉ.अमित नारखेडे, डॉ.संजीव चौधरी, डॉ. अविनाश भोसले, डॉ. वृषाली सरोदे व डॉ.सारिका सुरवाडे यांचा समावेश आहे.दर आठ तासांनी डॉक्टर बदललेचिरायु हॉस्पिटलमध्ये दाखल केल्यावर दर आठ तासांनी तन्मयवर उपचार करणारे डॉक्टर बदलत होते. डॉ. संजीव चौधरी, डॉ. अविनाश भोसले, डॉ.वृषाली सरोदे, डॉ.सारिका सुरवाडे यांच्यासह इतर डॉक्टर उपचार करीत होते. त्यावेळी देखील तन्मयची प्रकृती वारंवार बिघडत होती.शासकीय समितीने ठेवला ठपकातन्मयचा मृत्यू झाल्यानंतर तो नेमका कशामुळे झाला, त्याला कोण जबाबदार आहे यासाठी गोपाळ भवरे यांनी पोलिसांकडे तक्रार केली होती. त्यानुसार अंत्यविधी केल्यानंतर पोलिसांनी उपचाराचे कागदपत्रे, शवविच्छेदन अहवाल, व्हिसेरा अहवाल धुळे येथील भाऊसाहेब हिरे शासकीय महाविद्यालय व प्रयोगशाळाकडे पाठविले होते. त्यानंतर व्हिसेरा व उपचाराच्या कागदपत्रांचा अभ्यास करुन समितीने तन्मय याच्या मृत्यूस बालरोग तज्ज्ञ डॉ. राजेश श्रीकृष्ण शिंपी, सर्जन डॉ.गिरीश इच्छाराम गाजरे, भूलतज्ज्ञ डॉ. एच.आर.बºहाटे, चिरायु हॉस्पिटल येथे उपचार करणारे डॉ. अमित नारखेडे, डॉ.संजीव चौधरी, डॉ.अविनाश भोसले, डॉ.वृषाली सरोदे व डॉ.सारिका सुरवाडे हे जबाबदार असून त्यांचा निष्काळजीपणा कारणीभूत असल्याचे म्हटले आहे. या अहवालाच्या आधारावर तन्मयची आई सोनाली गोपाळ भवरे (वय २९, रा.रामेश्वर कॉलनी) यांनी जिल्हा पेठ पोलीस स्टेशनला फिर्याद दिली. या गुन्ह्याचा तपास सहायक निरीक्षक संदीप आराक करीत आहेत.शासकीय डॉक्टरांच्या समितीने ठेवला ठपकायाबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, रामेश्वर कॉलनीतील रहिवाशी गोपाळ रामकृष्ण भवरे व पत्नी सोनाली यांचा मुलगा तन्मय (वय १७ महिने) याला ताप येत असल्याने २७ डिसेंबर २०१५ रोजी वर्धमान नगरातील डॉ.राजेश शिंपी यांच्या अमेय हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी नेले होते. तेथे डॉक्टरांनी गोळ्या, औषधी दिल्यानंतर मुलाला लगेच घरी नेण्यात आले होते.दोन - तीन दिवसांनी पुन्हा त्याला ताप आल्याने त्याला पुन्हा डॉ.शिंपी यांच्याकडे घेऊन गेले. तेव्हा डॉक्टरांनी रक्त तपासणी करण्याचे सांगितले. त्यानुसार रक्ताची तपासणी केली असता त्यात टायफाईड असल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार डॉक्टरांनी औषधी लिहून दिली. त्याने प्रकृतीत सुधारणा झाली. परंतु ताप कमी होत नव्हता.त्यामुळे पुन्हा तन्मय याला ३१ डिसेंबर २०१५ रोजी डॉ.शिंपी यांच्या दवाखान्यात नेण्यात आले. डॉक्टरांनी तेथील नर्सला सांगून बाळाला इंजेक्शन देण्याची सूचना केली. या इंजेक्शनमुळे तन्मयला सूज आली. त्यामुळे दुसऱ्या दिवशी पुन्हा तन्मयला दवाखान्यात नेण्यात आले. इंजेक्शनमुळे पायाला सूज आली आहे व तापही उतरत नाही असे डॉक्टरला सांगितले असता डॉ.शिंपी यांनी तन्मयला दाखल करुन घेतले. इंजेक्शनच्या ठिकाणी बर्फाने शेकण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला.शस्त्रक्रियेनंतर तन्मय कायमचाच झोपला... डॉक्टरांच्या सल्लयानुसार तन्मयच्या पायाची सोनोग्राफी केली. त्यानंतर ४ जानेवारी रोजी डॉ.गिरीश गाजरे यांनी त्याच्या पायावर शस्त्रक्रिया केली. त्यावेळी त्यांच्यासोबत भूलतज्ज्ञ डॉ. एच.आर.बºहाटे व इतर डॉक्टर होते. शस्त्रकियेनंतर तो ४ ते ५ तासांनी शुध्दीवर येईल, असे डॉक्टरांनी सांगितले होते, मात्र तो शुध्दीवर आला नाही, त्यामुळे डॉक्टरांच्या लक्षात आणून दिले असता त्यांनी कृत्रिम श्वासोश्वास द्यावा लागेल, असे सांगितले. परंतु तरीही तन्मय शुध्दीवर येत नसल्याने आई, वडीलांची चिंता वाढली. त्यानंी परत डॉक्टरला विनवण्या केल्या. दवाखान्यात संपूर्ण बील वसूल केल्यानंतर ९ जानेवारी रोजी रात्री ११ वाजता तन्मय मृत झाल्याचे डॉक्टरांनी जाहीर केले.