शहरं
Join us  
Trending Stories
1
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
2
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
3
राहुल गांधी यांनी उल्लेख केलेली 'ती' ब्राझिलियन मॉडेल कोण? मतदार यादीत छापला गेला फोटो; तुम्हीही डोक्याला हात लावाल!
4
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
5
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
6
देशभरात एअर इंडियाचा सर्व्हर डाउन, दिल्ली विमानतळावर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा; मॅन्युअली पद्धतीने चेक-इन
7
दुबई-अबुधाबी फिरण्याचा विचार करताय? आयआरसीटीसीने आणलंय धमाल पैसा वसूल पॅकेज!
8
India’s Squad vs SA Test : पंत इज बॅक! दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटीसाठी कुणाला मिळाली संधी?
9
ISI नं का घडवला मुंबईवर हल्ला?; पाकिस्तानी राष्ट्रपती जरदारीच्या प्रवक्त्याचा मोठा दावा
10
IND A vs SA A : रोहित-विराट दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या 'या' वनडे मालिकेपासून दूरच
11
"...तोपर्यंत सरकार तुमच्यासमोर गुडघ्यावर येणार नाही"; कर्जमाफी घेण्यासाठी उद्धव ठाकरेंचा शेतकऱ्यांना सल्ला
12
मारुतीने आज जो इतिहास घडवला, टाटालाही झेपणार नाही; ४२ वर्षांत ३ कोटी कार विकल्या...
13
फक्त २९ पैशांचा शेअर थेट १०० रुपयांवर! १ लाखाच्या गुंतवणुकीतून झाला '३.४४ कोटींचा' नफा
14
UP: बेकायदेशीर औषधाविरुद्ध योगी सरकारची कडक कारवाई; ४ दिवसांत १६ गुन्हे दाखल, २५ दुकानांवर बंदी!
15
जगातील अवघ्या ३ लोकांकडे आहे 'ही' कार! डिझाईन पाहून प्रेमात पडाल अन् किंमत ऐकून हैराण व्हाल!
16
१७ वर्षे एकाच कंपनीत काम केले, अचानक काढून टाकले, कर्मचाऱ्याने लाखमोलाचा दिला सल्ला, पोस्ट व्हायरल
17
मोदी सरकारचा मोठा निर्णय; ऑपरेशन सिंदूरनंतर पहिल्यांदाच पाकिस्तानात गेले 2100 भारतीय, कारण काय?
18
भाजी विक्रेत्याने जिंकली तब्बल ११ कोटींची लॉटरी; टॅक्स भरून हातात किती पैसे येणार?
19
चेज मास्टर विराट कोहलीचे व्यवसायिक साम्राज्य माहितीये का? क्रिकेटपेक्षा इथून करतो सर्वाधिक कमाई
20
गुगल क्रोम वापरणाऱ्यांना मोठा धोका; हॅकर्सचं लक्ष तुमच्यावरच! सुरक्षित राहण्यासाठी 'ही' गोष्ट आताच करा

जळगाव मनपात युतीसाठी मुख्यमंत्री सकारात्मक - सुरेशदादा जैन यांची माहिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2018 11:56 IST

राजकीय घडामोडींना वेग

ठळक मुद्देयुतीच्या चर्चेसाठी बैठक घेण्याचीही तयारी२५ कोटी मिळाले मात्र...

आॅनलाइन लोकमतजळगाव, दि. ४ - आगामी काळात राज्यात भाजपा व शिवसेनची युती झाली नाही तरी जळगाव महापालिकेत युती व्हावी यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अनुकुलता दर्शविली असून या बाबत बैठक घेवून निर्णय घेऊ असे त्यांनी आजच आश्वासन दिले. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या साक्षीने बुलढाणा येथे ही चर्चा झाली असून विकासासाठी ही बाब आवश्यक असल्याचे प्रतिपादन माजी मंत्री सुरेशदादा जैन यांनी शनिवारी येथे आयोजित कार्यक्रमात केले.महापालिका अंतर्गत कोकीळगुरूजी अ‍ॅक्वा स्पा जलतरण तलावाच्या नूतनीकरण कामाचे उद्घाटन सुरेशदादा यांच्या हस्ते झाले. त्याप्रसंगी ते बोलत होते.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महापौर ललित कोल्हे होते. यावेळी आमदार चंदुलाल पटेल, आमदार सुरेश भोळे, जैन उद्योग समुहाचे अध्यक्ष अशोक जैन, उपमहापौर गणेश सोनवणे, मनपातील विरोधी पक्षनेते वामनराव खडके यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.महापालिका निवडणुकीची धामधूम सुरु झाली आहे. एकीकडे प्रशासन निवडणुकीच्या कामाला लागले असून दुसरीकडे राजकीय पक्षांकडूनही तयारी सुरु झाली आहे. सुरेशदादा जैन हे आज बुलढाणा येथे आयोजित कार्यक्रम आटोपून जलतरण तलावाच्या उद्घाटनासाठी उपस्थित राहिले. मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या चर्चेची माहिती त्यांनी येथे दिली.युतीच्या चर्चेसाठी बैठक घेण्याचीही तयारीजलतरण तलावाच्या या उपक्रमात कोणतीही मते मतांतरे नाहीत. येथे सर्वपक्षीय आहेत त्यांनीही विघ्न आणणार नाही अशी ग्वाही दिली. ही बाब अतिशय चांगली आहे. महापालिकेची येणारी निवडणूक भाजपा-शिवसेना युती करून लढवू असे आपण बुलढाणा येथे एका कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सांगितले. त्यांनीही त्यास अनुकुलता दर्शविली. याबाबत बैठक घेण्याची तयारीही त्यांनी दर्शविली आहे. यास केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हेदेखील साक्षीदार असल्याचे सुुरेशदादांनी यावेळी सांगितले. आपण व जलसंपदा मंत्री गिरीश महाजन एकत्र येऊन सकारात्मक निर्णय घेऊ शकतो असेही सुरेशदादा म्हणाले.महापालिकेची सप्टेंबर महिन्यात निवडणूक आहे. या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना आता गती आली आहे. निवडणुकीचा एक टप्पा म्हणजे प्रारूप प्रभाग रचनेचा कार्यक्रम घोषित झाला आहे. प्रारुप प्रभाग रचनेचा प्रस्ताव मनपा प्रशासनाने विभागीय आयुक्तांकडे पाठविला आहे. महापालिकेत सद्य स्थितीत खाविआ, मनसे, राष्टÑवादी कॉँग्रेस, जनक्रांती अशी आघाडी आहे.मनसेने सहकार्य केल्याने ललित कोल्हे हे सध्या महापौर आहेत. राष्टÑवादी काँग्रेसने यापूर्वी महाआघाडी तयार करावी असा प्रस्ताव सुरेशदादांकडे व्यक्त केला होता. दिलीप वळसे पाटील यांनी याप्रश्नी सुरेशदादा जैन यांची भेटही घेतली होती. शिवसेना नेते खासदार संजय राऊत हे शहराच्या दौºयावर आले असता त्यांनीही मनपा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सुरेशदादांची भेट घेतली होती. गेल्या पंधरा दिवसांपासून मनपा निवडणुकीच्या हालचालींना वेग आला आहे. या पार्श्वभूमीवर सुरेशदादांनी जलतरण तलावाच्या उद्घाटनप्रंगी केलेले वक्तव्य महत्वाचे मानले जात आहे. तलावाच्या उद्घाटनप्रसंगी भाजपाचे दोन्ही आमदार, मनताील विरोधीपक्षनेते, बांधकाम व्यावसायिक श्रीराम व श्रीकांत खटोड उपस्थित होते. त्यांच्या उपस्थितीत सुरेशदादा यांनी हे वक्तव्य केले.शिवाजी उद्यान विकसीत व्हावेशिवाजी उद्यान जैन उद्योग समुहाच्या माध्यमातून विकसीत व्हावे असा प्रस्ताव होता. मात्र त्यावेळी काही मतेमतांतरे होती. मात्र आता तशी परिस्थिती नाही.ती जुनी फाईल पुन्हा उघडून प्रस्ताव जैन समुहाला द्यावा. भाऊंचे उद्यान, गांधी उद्यानासारखे हे उद्यानही सुशोभित व्हावे व शहराच्या वैभवात भर पडावी अशी अपेक्षाही सुरेशदादांनी व्यक्त केली.२५ कोटी मिळाले मात्र...शहरास पूर्व वैभव मिळावे असे आपले प्रयत्न आहेत. आज २५ कोटींचा निधी प्राप्त होऊनही तो वापरता आला नाही तेच जर चांगला समन्वय असता तर अधिक विकास होऊ शकला असता असेही सुरेशदादा म्हणाले.

टॅग्स :Jalgaonजळगाव