शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

धर्मांतरासाठी आस्थेशी खेळू नका: मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 30, 2023 17:05 IST

अ.भा.हिंदू गोर बंजारा व लभाना नायकडा समाज कुंभमेळ्यातून दिला इशारा

कुंदन पाटील, जळगाव-सनातन हा मानवता धर्म आहे. सनातन धर्माशी छेडछाड केल्यास मानवी जीवनाशी खेळ सुरु होईल. त्यामुळे धर्मांतरासाठी आस्थेशी खेळ करु नका, अशा शब्दात इशारा  उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी सोमवारी येथे इशारा दिला. सनातन धर्मामुळेच प्रत्येकाला सुरक्षेचे कवच आहे. त्यामुळे एकसंघ भारताला कुणीही रौखू शकत नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.

गोद्री ता.जामनेर येथे आयोजित अ.भा.हिंदू गोर बंजारा लभाना व नायकडा समाज मेळाव्याचा सोमवारी समारोप झाला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी योगगुरु रामदेवबाबा,  द्वारकापीठाधीश्वर शंकराचार्य सदानंदजी महाराज, रा.स्व.संघाचे माजी , सहकार्यवाह भय्याजी जोशी, आयोजन समितीचे शामचैतन्य महाराज, वृंदावनधामचे गादीपीठ गोपाळचैतन्य महाराज, गोपालबाबा महाराज,बाबुसिंगजी महाराजांसह देशभरातील साधू-संत, महंत तसेच समाज नेते व्यासपीठावर उपस्थित होते.

छेडछाड सहन करणार नाही

हा 'कुंभ आहे.कुंभाचा भाव म्हणजे सर्वसमावेशक कामनापूर्ती आणि सिद्धीपूर्ती.बंजारा समाजाने या कुंभाच्या माध्यमातून प्राचीन सनातन धर्माच्या भूमीवर जन्मघेतल्याचे सिद्ध केले आहे.सनातन हा मानवता धर्म आहे.सनातन धर्मासोबत छेडखानी केल्यास मानवी जीवनाशी खेळ ठरणार आहे.त्यामुळे धर्मांतराचा डाव कधीही यशस्वी होऊ देणार नाहीत, हेच या कुंभातून सिद्ध झाले आहे, असेही योगी म्हणाले.देश सुरक्षित तर धर्म सुरक्षित.म्हणूनच 'अतिथी देव भव' हा आमचा स्वभाव गुण आहे.त्यामुळे सनातन धर्माच्या मुल्यांचेही जतन होणे अपेक्षित आहे.मात्र धर्माला छेद द्यायला निघाले असतील तर त्यांना भोग भोगावेच लागतील, असा इशारा योगींनी यावेळी दिला.

देशात दोन संविधान - रामदेवबाबा

देश चालविण्यासाठी संविधान आवश्यक आहे.मात्र धर्माला जगविण्यासाठी सनातन संविधान आवश्यक आहे.त्यामुळे देशात दोन संविधान असल्याचे धक्कादायक विधान योगगुरु रामदेवबाबा यांनी यावेळी केले.हिंदू धर्म विश्व धर्म आहे.सनातन धर्माची ताकद आणि मुल्यांना कुणीही हात लावू शकत नाही.धर्मांतराची भीक स्वीकारु नका.आपला 'डीएनए' सनातन धर्माचा आहे.त्यामुळे आपल्या दंडातल्या ताकदीतून कर्तृत्व दाखवून द्या, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

शिंदे-फडणवीस अचानक माघारी

दरम्यान या मेळाव्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दोघे एकाच विमानाने मेळाव्यासाठी मुंबईहून निघाले.मात्र दुपारी एक वाजता विमान तांत्रिक बिघाडाचे कारण देत दोघे माघारी परतल्याचे आयोजकांनी यावेळी जाहीर केले.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :Jalgaonजळगावyogi adityanathयोगी आदित्यनाथ