शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

"मराठी माणूस एकत्र येऊ नये म्हणून गाठीभेटी घेतात"; ठाकरेंच्या टीकेवर CM फडणवीस म्हणाले, "बोलबच्चन असलेल्यांना..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 20, 2025 11:30 IST

शिवसेनेच्या वर्धापनदिनी उद्धव ठाकरेंनी केलेल्या टीकेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिलं.

CM Devendra Fadnavis: शिवसेना ठाकरे गटाचा ५९ वा वर्धापनदिन सोहळा गुरुवारी पार पडला. यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला. यावेळी उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली होती. मराठी माणसाची शक्ती एकत्र येऊ नये यासाठी काही जण हॉटेलमध्ये गाठीभेटी घेत आहेत असं म्हणत राज ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला. उद्धव ठाकरे यांच्या टीकेला आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका वाक्यात प्रत्युत्तर दिले.

शिवसेना पक्षाचा ५९ वा वर्धापनदिन सोहळा षण्मुखानंद हॉलमध्ये साजरा झाला. यावेळी उद्धव ठाकरे यांनी पक्ष फोडाफोडी आणि नेत्यांच्या पळवा-पळवीच्या राजकारणावरून भाजप आणि एकनाथ शिंदे गटावर टीका केली. तसेच जे यांच्या मनात आहे आणि जे राज्याच्या मनात आहे तेच मी करेन. पण ते होऊ नये.. मराठी माणसाची शक्ती एकत्र येऊ नये म्हणून यांच्या मालकाचे नोकर इकडे गाठीभेटी घ्यायला लागल्याचेही उद्धव ठाकरे म्हणाले. यावेळी प्रहार चित्रपटातील एक डायलॉग म्हणत विरोधकांना इशारा दिला. अंगावर येणार असाल तर मी उभा आहे. कम ऑन किल मी. पण, येताना ॲम्ब्युलन्स घेऊन या. येताना सरळ याल पण जाताना आडवे व्हाल, असं उद्धव ठाकरे म्हणाले. 

शुक्रवारी क्रांतिकारी खाज्याजी नाईक स्मृती स्मारकाच्या उद्घाटनासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जळगाव येथे दाखल झाले असता त्यांनी उद्धव ठाकरेंना प्रत्युत्तर दिलं.बोलबच्चन भैरवींना मी उत्तर देत नाही, अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांना चिमटा काढला. तसेच शरद पवार गटाचे एकनाथ खडसे कार्यक्रमात येणार आहेत का असं विचारलं असता यासंदर्भात मला माहित नाही, असे म्हणत या विषयाला फारसे महत्त्व द्यायला मुख्यमंत्र्यांनी टाळले. 

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसUddhav Thackerayउद्धव ठाकरेEknath Shindeएकनाथ शिंदे