शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
3
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
4
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
5
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
6
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
7
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
8
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
9
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
10
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
11
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
12
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
13
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
14
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
15
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
16
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
17
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
18
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
19
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
20
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
Daily Top 2Weekly Top 5

मुख्यमंत्री आले अन् गेले...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 10, 2018 19:10 IST

मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याचा मूळ उद्देश विकास योजनांचा आढावा घेणे होता

चंद्रशेखर जोशीजळगावमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा जळगाव जिल्हा दौरा काय देऊन गेला, यावर आता चर्चा रंगू लागल्या आहेत. कोणतीही मोठी व्यक्ती येणार म्हटल्यावर एक भावना नेहमी जनमानसात दिसून येते. ती म्हणजे ही व्यक्ती देणार काय? मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याचा मूळ उद्देश हा विकास योजनांचा आढावा घेणे हा होता. त्या अनुषंगाने समोर येणाºया विषयांचा त्यांनी उहापोह करणे अपेक्षित होते. विशेष म्हणजे या दौºयात केवळ अधिकारी वर्ग, पालकमंत्री किंवा तत्सम विभागांशी संबंधीत मंत्री त्या जिल्ह्यातील असेल तर तो अपेक्षित होता. या संदर्भात लोकप्रतिनिधींना निरोप दिले जाणे अपेक्षित होते. मात्र जळगावात तसे झाले नाही. परिणामी मुख्यमंत्र्यांच्या या बैठकीला मानापमानाचे ग्रहण लागले. बैठकीस आलेल्या काही लोकप्रतिनिधींना पोलीस प्रशासनातील अधिकाºयांनी अडविले. येथून ठिणगी पडली. मात्र पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सामंजस्याची भूमिका घेत जे येत असतील त्यांना येऊ द्या अशी सूचना दिल्यानंतर या विषयावर पडदा पडला. सत्ताधारी भाजपा, शिवसेना पक्षातील एकदोन वगळता सर्वच मंत्र्यांनी बैठकीत प्रवेश केला. मुख्यमंत्री येणार...समोर अधिकारी वर्ग व आपण व्यासपीठावर असणे ही फार मोठी बाब... (लोकप्रतिनिधींच्या दृष्टीने) त्यानुसार त्यांची भूमिका या ठिकाणी दिसली. तब्बल चार ते साडेचार तास मॅरेथॉन बैठक मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत झाली. जिल्ह्यात यंदा अभूतपूर्व दुष्काळाचे सावट आतापासून जाणवू लागले आहे. जिल्ह्यात जेमतेम ६५ टक्क्यांच्या दरम्यान पाऊस झाला. त्यामुळे दुष्काळी स्थितीवर मात करण्यासाठी नेमकी काय भूमिका मुख्यमंत्री मांडतात याबाबत लोकप्रतिनिधींना जास्त उत्सुकता होती. सिंचनाचा अनुशेष, निधीचा अनुशेष ही नित्त्याची बाब आहे. निधीच्या घोषणा या नेहमीच्याच. जलयुक्त शिवार अतिशय चांगली योजना पण पाऊसच पडला नसेल तर योजनेचा उपयोग तो काय? हीच स्थिती यंदा जिल्ह्यात आहे. गेल्या तब्बल चार वर्षांपासून दुष्काळामुळे जिल्ह्यातील बळीराजा होरपळत आहे. त्यातच नैसर्गिक आपत्ती, बोंडअळीचे प्रताप सतावत असतात. यामुळे जे उत्पादन येणार तेदेखील अडचणीत येते. यंदा खरीप जेमतेम ५० टक्के येईल असा अंदाज आहे. रब्बीची आशा फारशी नाही. त्यामुळे काही दिलासादायक चित्र मुख्यमंत्र्यांनी उभे करणे अपेक्षित होते. नेमके ते झाले नाही. आता दिवाळी तोंडावर आहे. हा काळ उत्साहाचा त्यात काही दिले गेले असते तर फारचे चांगले झाले असते...अशाच प्रतिक्रीया उमटत आहेत.

टॅग्स :Chief Ministerमुख्यमंत्रीJalgaonजळगाव