शहरं
Join us  
Trending Stories
1
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
2
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
3
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
4
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
5
दहशतवाद्यांचे लॉन्च पॅड, हाफिज सईद, मसूदचे अड्डे, कारवाईदरम्यान या पाच ठिकाणांना भारत करू शकतो लक्ष्य
6
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...
7
चांगले संकेत असूनही बाजारात घसरण कायम! कोणते शेअर वधारले; कुठे बसला फटका
8
जिद्दीला सलाम! मुलाच्या जन्मानंतर १७ दिवसांनी दिली UPSC; IAS होण्याचं स्वप्न केलं साकार
9
रोहित शर्माच्या आईने 'हे' खास १२ फोटो वापरून आपल्या मुलाला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
10
राज्यातील ओबीसी आरक्षण संपल्यात जमा; आरक्षणाला कसलाही धक्का लागू नये, हीच मागणी - लक्ष्मण हाके
11
"सर, माझ्याकडे १२ सेकंदांचा Video..."; आवाज ऐकताच वाजू लागले फोन? NIA टीम एक्टिव्ह
12
सुनील नारायणची विश्वविक्रमाशी बरोबरी; केकेआरसाठी केली खास कामगिरी!
13
पाकिस्तानचं आर्थिक कंबरडं मोडणार? हल्ल्याच्या भीतीने शेअर बाजार धडाम; काय आहे परिस्थिती?
14
अभिनेत्री लग्नानंतर ६ वर्षांनी होणार आई, व्हिडिओ शेअर करत दिली गुडन्यूज; पतीही आहे अभिनेता
15
१ मे रोजी गुरुवार पण बंद राहणार शेअर बाजार; कारण काय? जाणून घ्या
16
राधाकृष्ण विखे पाटलांना दणका; फसवणुकीप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
17
Nashik Crime: हर्षद पाटणकरच्या सांगण्यावरून करण चौरेची हत्या; तपासातून समोर आली खबळजनक माहिती
18
LoC Tensions Escalate: तणाव वाढताच पाकिस्तानी जवानांनी सीमेवरील चौक्या सोडल्या, झेंडेही हटवले
19
मनीष सिसोदिया आणि सत्येंद्र जैन पुन्हा अडचणीत; आता ₹2000 कोटींच्या भ्रष्टाचाराचा आरोप
20
भारत-पाकिस्तान युद्ध झालेच तर पाकिस्तानच्या बाजुने कोणते देश? भारताला कोण मदत करू शकतो...

जळगावात संडे मार्केटमध्ये स्वस्तात मस्त ‘फॅशनेबल’ कपडे व पादत्राणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 4, 2018 23:45 IST

ग्राहकांची खरेदीसाठी दर रविवारी गर्दी

ठळक मुद्दे बेरोजगारांना मिळाला रोजगारमुंबई, दिल्ली येथून येतो माल

विजयकुमार सैतवाल / ऑनलाईन लोकमत

जळगाव, दि. 4 - दिवसेंदिवस कपडे, चपला, बुट यांचे दर वाढत असतानाही कमी किंमतीत नवीन ट्रेण्डच्या कपडय़ांची हौस भागविण्याची संधी जळगावात सुरु झालेल्या ‘संडे मार्केट’ने उपलब्ध करून दिली आहे. ‘रस्ते का माल सस्ते मे’ याप्रमाणे एकाहून एक सरस कपडे, चपला, बुट घेण्यासाठी रविवारी सकाळपासून शहरातील नेहरु चौकात प्रचंड गर्दी होत असून ब्रॅण्डेडच्या तोडीचा माल येथे सहज उपलब्ध होत असल्याचे तरुणाईचा खरेदीसाठी कल वाढत आहे.  या बाजाराने बेरोजगार तरुणांना रोजगारही उपलब्ध करून दिल्याने त्यांनाही दिलासा मिळाला आहे. कपडे व पादत्राण्यांचा नवनवीन ट्रेण्ड बाजारात येतो व त्याचे तरुणाईला खास आकर्षण असते. मात्र याचे दर गगणाला भिडत आहे. असे असतानाही तरुणाईला जळगावातील या संडे मार्केटने नवनवीन ट्रेण्डची  हौस पूर्ण करण्याची संधी उपलब्ध करून दिली आहे. 

रविवारची असते प्रतीक्षामुंबई, पुणे, नागपूर व इतर शहरात ठराविक भागामध्ये स्वस्त कपडय़ांचा बाजार भरतो. त्याच धरतीवर गेल्या सहा महिन्यांपूर्वी जळगावातही अशा प्रकारच्या बाजाराला सुरुवात झाली आहे. दर रविवारी सकाळी साधारण नऊ वाजेपासून नेहरू चौकात हे दुकाने लागण्यास सुरुवात होते. रविवारी या भागातील दुकाने बंद असतात. त्या दुकानांसमोर अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने वाहतुकीस कोणताही अडथळा होणार नाही, याची दक्षता घेत ही दुकान थाटली जातात. सहा महिन्यांपासून याची बहुतांश जणांना माहिती झाल्याने आता प्रत्येकास रविवारच्या या बाजाराची प्रतीक्षा लागलेली असते. 

दीडशे रुपयांपासून करा फॅशनजीन्स पॅण्ट, साधी पॅण्ट, शर्ट, टी शर्ट यासह कपडय़ांचे विविध प्रकार वेगवेगळ्य़ा आकार, रंगात तसेच  चपला, बुटा, कबरेचा पट्टा (बेल्ट), पाकीट (व्हॉलेट) अशा एकाहून एक फॅशनेबल वस्तू येथे उपलब्ध असतात. दीडशे रुपयांपासून ते चारशे रुपयांमध्ये येथे कोणतीही वस्तू सहज उपलब्ध होत असल्याने कमी किंमतीत नवनवीन फॅशनची हौस येथून भागविली जात आहे.

दालनांच्या तोडीच्या वस्तूसध्या चांगल्या प्रकारातील  जीन्स, शर्ट घ्यायला गेले तरी ते साधारण दोन हजार रुपयांच्या पुढेच जातात. तसेच पादत्राणे घ्यायचे म्हटले तरी ते 400 ते 800 रुपयांर्पयत असतात. मात्र या ठिकाणी त्याच तोडीचे ड्रेस 300 ते 800 रुपयांमध्ये तर चपला- बुट 150 ते 300 रुपयांमध्ये सहज उपलब्ध होतात. 

मुंबई, दिल्ली येथून येतो मालजळगावात कमी किंमतीत मिळणारे कपडे व या वस्तू मुंबई, दिल्ली येथून आणल्या जातात. यासाठी तेथील व्यापा:यांवर अवलंबून न राहता हे विक्रेते तेथे स्वत: जावून निवडून चांगल्या प्रकारचा माल जळगावात आणतात. हल्ली एकाच पॅकिंगमध्ये तीन ते चार शर्ट वेगवेगळ्य़ा डिजाईन व आकारात उपलब्ध झालेले आहे, त्याच प्रकारचे कपडे येथेही उपलब्ध असल्याने तरुणाईचा इकडे खरेदीसाठी मोठा कल दिसून येतो. 

शहरा बाहेरील ग्राहकांचीही गर्दीज्या ठिकाणी हा बाजार भरतो, ते ठिकाण रेल्वे स्थानकाकडून येताना अगदी समोर असल्याने बाहेर गावाहून येणा:यांसाठीही ते सोयीचे आहे. त्यामुळे समोर हा बाजार दिसताच तेथे खरेदीसाठी या मंडळींचे पाय आपसूकच वळतात. 

इंटरनेटवरून घेतली जाते माहितीया ठिकाणी माल आणण्यासाठी येथील विक्रेते तंत्रज्ञानाचा वापर करीत चांगला व नवनवीन फॅशन असलेला माल आणण्यासाठी तत्पर असतात. त्यासाठी नवीन फॅशन कोणती, तो माल कोठे उपलब्ध आहे, याची  इंटरनेटवरून माहिती घेत असतात व ज्या फॅशनची ‘चलती’ आहे, तो माल येथे आणून जळगावकरांची हौस पूर्ण करीत आहे. 

तरुण वळले स्वयंरोजगाराकडेशिक्षण घेऊनही रोजगार मिळत नसल्याने येथील काही तरुणांनी या बाजाराविषयी माहिती घेत या क्षेत्रात वळले असून यातून त्यांनी स्वयंरोजगार उभा केल्याचा आनंद असल्याचे येथील विक्रेत्यांनी सांगितले.