शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

भागपूर प्रकल्पामुळे शेतकऱ्यांचे भाग्य बदलणारा - पालकमंत्री चंद्रकांत पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2019 21:25 IST

भागपूर उपसा सिंचन योजनेचे भूमीपूजन

पहूर, ता. जामनेर - भागपूर उपसा सिंचन प्रकल्प हा शेतकऱ्यांचे भाग्य बदलवणारा प्रकल्प असून यामुळे शेतीचे उत्पन्न वाढणार आहे. त्यामुळे शेतकरी आनंदी व श्रीमंत होईल, असा विश्वास पालकमंत्री चंद्र्रकांत पाटील यांनी पहूर येथे शुक्रवारी केले.भागपूर उपसा सिंचन योजना टप्पा २ या योजनेचे ई भूमीपूजन चंद्रकांत पाटील यांच्याहस्ते करण्यात आले, त्या वेळी ते बोलत विकास महामंडळ जळगाव, उपसा सिंचन बांधकाम विभाग जळगाव यांच्यावतीने जामनेर रोडलगत पहूर येथे आयोजित या कार्यक्रमप्रसंगी या वेळी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील, जि.प. अध्यक्षा उज्ज्वला पाटील, खासदार रक्षा खडसे, आमदार स्मिता वाघ, हरीभाऊ जावळे, संजय सावकारे, उन्मेष पाटील, सुरेश भोळे, माजी मंत्री एम.के.पाटील, जि.प.उपध्याक्ष नंदकिशोर महाजन, राज्याचे माहिती आयुक्त व्ही.डी.पाटील, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष गोविंद अग्रवाल, पेठ सरंपच नीता पाटील, कसबे सरंपच ज्योती घोंगडे, भाजपा तालुकाध्यक्ष चंद्रकांत बाविस्कर, जि.प.महिला बालकल्याण सभापती रजनी चव्हाण, सभापती रूपाली पाटील, नगरध्याक्षा विजया खलसे, कृउबा समिती सभापती संजय देशमुख, तापी पाटबंधारे विभागाचे अधीक्षक अभियंता ए.एस.मोरे, कार्यकारी संचालक एस.डी. कुलकर्णी, जि.प.सदस्य अमित देशमुख, पं.स. सदस्य नीता पाटील, पोलीस अधीक्षक पंजाबराव उगले, प्रांतधिकारी चवरे उपस्थित होते.दरवर्षी सहाशे साठ कोटींचे उत्पन्न वाढणारपुढे बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले की, दोन हजार तीनशे कोटींचा हा महत्वाकांक्षी प्रकल्प आहे. यामुळे दरवर्षी जामनेर, पाचोरा व जळगाव तालुक्यातील शेतकऱ्यांचे दरवर्षी सहाशे साठ कोटींचे उत्पन्न वाढणार आहे. जलयुक्त शिवारच्या माध्यमातून २०१५-१६ या वर्षात पाऊस चांगला झाल्यामुळे राज्यातील शेतकºयांचे उत्पन्न चाळीस हजार कोटी ने वाढले आहे. शेतीचा विकासक २३ टक्केच्या पुढे गेला आहे.कॉंग्रेसच्या काळात शेती विकास दर ठप्पआम्ही शेतकºयांना आनंदी व श्रीमंत करणारे असून काँग्रेसच्या सरकारने फक्त शेतकºयांना अशिक्षित ठेवण्याचे धोरण स्वीकारल्याने त्यांच्या कार्यकाळात शेतीविकास दर वाढला नाही, तो आमच्या सरकारने करून दाखविले आहे. हा प्रकल्प पूर्ण करणे ही गिरीश महाजन यांची जबाबदारी आहे, असे सांगत पालकमंत्र्यांनी अवघ्या पाच मिनिटात अध्यक्षीय भाषण उरकले.मी खाली तिजोरीचा मंत्री - गुलाबराव पाटीलआमची जबाबदारी तुमच्यावर आहे, तुमच्याकडे बजेट आहे. मी खाली तिजोरीचा मंत्री आहे. शेवटी शेजारच्या महाजनांनी या प्रकल्पाच्या माध्यमातून माझ्या तालुक्यातील शेतकºयांचा पाण्याचा प्रश्न मिटवून भले केले आहे, असे सहकार राज्य मंत्री गुलाबराव पाटील यांनी म्हणताच सभा स्थळी एकच हशा पिकला. शेतकºयांना पाणी, रस्ते, वीज हे मिळाल्यास शेतकºयांचे उत्पन्न वाढणार आहे, यात शंका नाही. पण पाच तालुक्यांचा तापी प्रकल्प असलेल्या निम्न तापी प्रकल्पाला निधीची तरतूद करून प्रकल्पाचे काम पूर्णत्वास नेण्याची अपेक्षा ही महाजनांकडून आहे असे ना गुलाबराव पाटील म्हणाले.

टॅग्स :Jalgaonजळगाव