शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

कवयित्री बहिणाबाई चौधरी स्मारकाच्या आराखड्यात बदल

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 2, 2019 23:50 IST

बहिणाबाई चौधरी यांच्या स्मारकाचे काम केवळ साडेनऊ ते दहा कोटींच्या निधीसाठी हे काम रखडले होते.

जळगाव : असोदा येथे उभारण्यात येत असलेल्या खान्देशकन्या कवयित्री बहिणाबाई चौधरी यांच्या स्मारकाचे काम कमी निधीत व्हावे या हेतूने स्मारकाच्या मूळ आराखड्यात प्रशासनाने परस्पर बदल केला. त्यामुळे शासन व प्रशासनाची या स्मारकाप्रती असलेली अनास्था उघड झाली आहे. याबाबत नागरिकांनी आंदोलनाचा इशारा दिल्यावर आता निधीसाठी शासनाकडे नव्याने प्रस्ताव पाठविला जाणार आहे.३ डिसेंबरला कवयित्री बहिणाबाई चौधरी यांची पुण्यतिथी आहे. त्यामुळे त्यांच्या स्मारकासंदर्भात स्मारक समितीच्या सदस्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता यांच्याशी चर्चा केली. त्यावर निधीसाठी सुमारे २३ कोटींचा नवीन प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.बहिणाबाई चौधरी यांच्या स्मारकाचे काम केवळ साडेनऊ ते दहा कोटींच्या निधीसाठी हे काम रखडले होते. आता या खर्चात वाढ झाली आहे. त्यामुळे एकूण बजेट २३ कोटींवर गेले आहे.- खान्देश कन्या कवयित्री बहिणाबाई चौधरी यांची ३ डिसेंबर रोजी पुण्यतिथी आहे. त्यांचे स्मारक जळगावनजीक असोदा येथे होत आहे. त्यासाठी शासनाने निधीसाठी हात आखडता घेतला आहे.- स्मारकाचे काम मूळ आराखड्यानुसारच होईल, अशी मागणी समितीने व नागरिकांनी केल्यावर प्रशासनाने तसे आश्वासन दिले. मात्र प्रत्यक्षात अ‍ॅम्पीथिएटरवर पत्रे टाकण्यात आले. तर पुढील बाजूने केवळ स्लॅब टाकण्यात आला. उपलब्ध निधीतून केवळ उंची १० मीटरने कमी केलेल्या इमारतीचेच काम झाले आहे. तर सुशोभिकरणाचे काम करण्यासाठी निधीच शिल्लक नाही. त्यामुळे याबाबत सुधारीत प्रस्ताव सादर करण्यात येणार असल्याचे स्मारक समितीचे किशोर चौधरी यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.

टॅग्स :Jalgaonजळगाव