शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

दुसरीच्या विद्यार्थ्यांच्या गणित विषयाच्या वाचन पद्धतीत बदल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2019 17:11 IST

तब्बल दीड महिन्याच्या विश्रांतीनंतर शाळा चालू झाल्या खऱ्या, परंतु या शैक्षणिक वर्षापासून बालभारतीने अभ्यासक्रम बदलास सुरुवात केली असून इयत्ता दुसरीच्या गणित पुस्तकातील गणित शिक्षणात आमुलाग्र बदल करण्यात आला आहे. संख्या वाचन करताना एकवीसऐवजी वीस एक, त्र्याहत्तर ऐवजी सत्तर तीन, त्र्याण्णव ऐवजी नव्वद तीन असे वाचण्याच्या सूचना अभ्यास मंडळाने दिल्या आहेत.

ठळक मुद्देजोडाक्षरे वाचण्यातून सुटका२१ ते ९९ या संख्यांमध्ये बदलशिक्षकांनी शिकविताना जोडाक्षरे न वाचता संख्यावाचन करून विद्यार्थ्यांना शिकवायचे आहे.संख्यावाचन करताना एकवीस ऐवजी वीस एक, त्र्याहत्तर ऐवजी सत्तर तीन, सदुसष्ट ऐवजी साठ सात, त्रेपन्न ऐवजी पन्नास तीन असे वाचन असणार आहेबदल का करण्यात आला - कारण इंग्रजी व्यतिरिक्त कानडी, तेलगू, तामिळ, मल्याळी या भाषेतसुद्धा संख्यावाचन हे याच पद्धतीने केले जाते, त्यामुळे याचा अवलंब करण्यात आला आहे.

अजय कोतकरगोंडगाव, ता.भडगाव, जि.जळगाव : तब्बल दीड महिन्याच्या विश्रांतीनंतर शाळा चालू झाल्या खऱ्या, परंतु या शैक्षणिक वर्षापासून बालभारतीने अभ्यासक्रम बदलास सुरुवात केली असून इयत्ता दुसरीच्या गणित पुस्तकातील गणित शिक्षणात आमुलाग्र बदल करण्यात आला आहे. संख्या वाचन करताना एकवीसऐवजी वीस एक, त्र्याहत्तर ऐवजी सत्तर तीन, त्र्याण्णव ऐवजी नव्वद तीन असे वाचण्याच्या सूचना अभ्यास मंडळाने दिल्या आहेत.मराठी जोडाक्षरे कठीण असल्याचे सांगत बालभारतीने नवीन पद्धती अवलंबली आहे. यावर्षी दुसरी व अकरावीचा अभ्यासक्रम बदलण्यात आला. अकरावी अभ्यासक्रम सुरू होण्यास अद्याप एक-दीड महिना बाकी आहे; पण दुसरीच्या बदलाने मात्र शिक्षक वर्ग अचंबित झाला आहे. जोडाक्षरे नको म्हणून पाढे पठणाची व लिहिण्याची पद्धतच बदलली आहे. या शैक्षणिक वर्षापासून दुसरीच्या अभ्यासक्रमात बदल करण्यात आला. पहिल्याच दिवशी दुसरीच्या शिक्षकांना मोठा धक्का बसला आहे. या पुस्तकात नवी व जुनी पद्धत अशा दोन्ही स्वरुपात मांडणी देण्यात आली आहे. मात्र ही देत असताना शिक्षकांनी नवीन पद्धतीने शिकवावे, अशा सूचनाही करण्यात आल्या आहेत. या सर्व प्रकारामुळे विद्यार्थ्यांचा गोंधळ होणार आहेच. तसेच ही भाषेची गळचेपी असल्याची भावानाही शिक्षक वर्ग व्यक्त करत आहे.संख्या वाचनासाठी तीन पद्धती देण्यात आल्या आहेत. यात विद्यार्थ्यांना जी सोपी वाटते ती पद्धत वापरता येऊ शकते. इंग्रजीतील संख्या वाचन पद्धतीनुसार ही पद्धत करण्यात आली आहे. इतर सर्व प्रादेशिक भाषांमध्येही संख्या वाचन हे इंग्रजीप्रमाणेच असते, असे तज्ज्ञांचे मत आहे. यामुळे हा बदल करण्यात आला आहे. हा बदल सर्व स्तरावर स्वीकारला गेल्यास यात विद्यार्थ्यांचा फायदा आहे.बºयाच विद्यार्थ्यांना जोडाक्षरे वाचताना व लिहताना त्रास होत होता, परंतु आताच्या बदललेल्या गणित विषयाच्या अभ्यासक्रमात वाचन सोपे झाले आहे 

टॅग्स :Educationशिक्षणBhadgaon भडगाव