शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतानं ८० लढाऊ विमानांनी केला हल्ला; बिथरलेल्या पाकिस्तानी पंतप्रधानांचा कांगावा
2
२४ तासांत दुसऱ्यांदा बलुच बंडखोरांचा पाकिस्तानी सैन्यावर हल्ला, रिमोटने वाहन उडवले, ७ सैनिकांना ठार मारल्याचा दावा
3
भारताने सियालकोटवर हल्ला चढवला, अन् पाकिस्तानने अमृतसरवर; रात्रभर अफवांचा बाजार उठला...
4
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: आर्थिक लाभ होऊ शकेल; लाभदायक बातम्या प्राप्त होतील!
5
पाकिस्तानला घरात घुसून मारले! १०० हून अधिक दहशतवादी ठार; पहलगाम हल्ल्याचा घेतला बदला
6
Operation Sindoor Live Updates: जम्मू-काश्मीरच्या कुपवाडामध्ये पाकिस्तानकडून पुन्हा गोळीबार, भारताने दिले चोख प्रत्युत्तर
7
Mohini Ekadashi 2025: आज मोहिनी एकादशीनिमित्त विष्णुंच्या मोहक रूपाला घालूया आर्त साद!
8
रात्री उशिरा पाकिस्तानी पंतप्रधानांनी त्यांच्या देशाला संबोधित केले; भारताला दिली धमकी...
9
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी निवडले ‘सिंदूर’ नाव; दडले आहेत कोणते पाच अर्थ? 
10
भारताच्या हल्ल्याला प्रत्युत्तरासाठी पाकची लष्कराला परवानगी
11
अर्ध्या तासात दहशतवादी भुईसपाट; ९ तळ उद्ध्वस्त; लष्करातील नारीशक्तीचे जगाला दर्शन
12
संपादकीय: याद राखा, हिशेब चुकता होईल! पाकिस्तान काय करेल आणि काय नाही...
13
पाकला धडा शिकवलाच, कायदेही मोडले नाहीत! एलओसी पार न करताच शत्रूवर मारा... 
14
सिंदूर, सोफिया अन् व्योमिका... नावात काय नाही, नावातच सारे दडलेले होते...
15
पाकिस्तान प्रतिहल्ला करेल?-शक्यता नाकारता येत नाही!
16
प्रवाशांना ‘बेस्ट’ची रिअल-टाइम सुविधा; मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते उपक्रमाचे उद्घाटन 
17
१८ विमानतळांवरील कामकाज तात्पुरते बंद; एकट्या इंडिगोने सुमारे १६० उड्डाणे रद्द केली
18
सीमावर्ती जिल्ह्यांमधील १४ जिल्ह्यांत सर्व शाळा बंद; ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर पंजाब, राजस्थान आणि जम्मूत सूचना जारी  
19
विनाअपघात एसटी बस चालकांना बक्षीस देणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती
20
राज्यात गारपिटीची, तर मुंबईत मुसळधारेची शक्यता; मध्य महाराष्ट्र व मराठवाड्याला इशारा

जळगाव जिल्हा पोलीस दलात बदलाचे वारे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2018 15:50 IST

: जिल्हा पोलीस दलात अधिकारी व कर्मचा-यांच्या बदल्या होणार आहेत. मे महिना तसा बदल्यांचाच असतो. जिल्हा पोलीस दलात साडे तीन हजार पोलीस कर्मचारी आहेत. दरवर्षी दहा टक्के बदल्या होतात. त्यात प्रशासकीय तर काहींच्या विनंती बदल्या असतात. अशा बदलीपात्र कर्मचाºयांची यादी तयार करण्याच्या कामाला सुरुवात झाली आहे.

ठळक मुद्देपोलीस वार्तापत्रकर्मचा-यांचे गॅझेट बनविण्याचे काम सुरुएस.पी,ए.एसपींची पदोन्नतीने बदली होणार

आॅनलाईन लोकमतजळगाव, दि,१८ : जिल्हा पोलीस दलात अधिकारी व कर्मचा-यांच्या बदल्या होणार आहेत. मे महिना तसा बदल्यांचाच असतो. जिल्हा पोलीस दलात साडे तीन हजार पोलीस कर्मचारी आहेत. दरवर्षी दहा टक्के बदल्या होतात. त्यात प्रशासकीय तर काहींच्या विनंती बदल्या असतात. अशा बदलीपात्र कर्मचा-यांची यादी तयार करण्याच्या कामाला सुरुवात झाली आहे. त्यामुळे अनेक कर्मचा-यांनी पसंतीच्या ठिकाणी बदली व्हावी यासाठी आपआपल्या पध्दतीने फिल्डींग लावली आहे. पोलीस दलात अधिका-यांच्या बदलीचा इतका त्रास होत नाही, त्याहीपेक्षा कर्मचारी बदलीत पोलीस अधीक्षकांना होतो. आमदारापासून तर मंत्र्यांपर्यंतच्या शिफारशी या बदल्यात होतात. शिफारशीनेही काम झाले नाही तर थेट मंत्र्यांनाच फोन करायला भाग पाडले जाते. प्रत्येक बदलीत कोणाचा अन् कोणाचा तरी कुठे ना कुठे स्वार्थ दडलेला असतो. पोलीस अधीक्षक दत्तात्रय कराळे यांनी गेल्या वर्षी बदली प्रक्रियेत राजकीय दबाव झुगारुन लावला होता. राजकीय दबाव आणणाºया कर्मचाºयाची इच्छीतस्थळी बदली न करता दुस-याच ठिकाणी बदली केल्याचे काही किस्से घडले होते. यातून कराळे यांनी शिस्तीची जाणीव करुन दिली होती. कराळे यांची पदोन्नती झालेली आहे, त्यामुळे केव्हाही त्यांच्या बदलीचे आदेश येऊ शकतात. नवीन अधीक्षक कोण व कसा असणार याची चिंता बदलीपात्र कर्मचाºयांना लागली आहे. त्यामुळे कराळे यांच्या काळात बदलीचे गॅझेट निघाले तर काही अंशी मनासारखी बदली मिळेल अशी अपेक्षा काही कर्मचाºयांना आहे. कर्मचाºयांप्रमाणे अपर पोलीस अधीक्षक बच्चन सिंह, भुसावळचे सहायक पोलीस अधीक्षक निलोत्पल व सहा पोलीस निरीक्षक बदलीस पात्र आहेत. या सर्वांचा जिल्ह्यातील कार्यकाळ पूर्ण झालेला आहे. पोलीस अधीक्षक कराळे, अपर पोलीस अधीक्षक बच्चन सिंह व निलोत्पल हे पदोन्नतीने बदलून जाणार आहेत. पोलीस स्टेशनचा कार्यकाळ पूर्ण झालेल्या प्रभारी अधिका-यांच्याही महिनाभरात बदल्या होणार आहेत. सहायक निरीक्षक प्रभारी असलेल्या पोलीस ठाण्यांची संख्या अधिक आहे. याशिवाय जळगाव उपविभागीय अधिकारी सचिन सांगळे यांचाही काही महिन्यात कार्यकाळ पूर्ण होणार आहे. आगामी महापालिका निवडणूक लक्षात घेता त्यांच्या काळात ही निवडणूक होती की त्यापूर्वीच त्यांची बदली होते याकडेही शहरातील राजकीय नेत्यांचे लक्ष लागले आहे. एप्रिल ते जून असे तीन महिने कर्मचारी व अधिकारी यांच्या बदलीचा काळ असतो. पोलीस अधीक्षक, विशेष  पोलीस महानिरीक्षक व पोलीस महासंचालक अशा तीन टप्प्यात बदल्या होतात.

टॅग्स :JalgaonजळगावCrimeगुन्हा