शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

ऑनलाइन परीक्षेच्या वेळी व्यत्यय येणार नाही म्हणून तात्काळ लोडशेडींगच्या वेळेत बदल करावा...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 6, 2020 21:59 IST

जळगाव : कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या अंतिम वर्षाच्या (बॅकलॉगसह) विद्यार्थ्यांच्या १२ ऑक्टोबर पासुन सुरु  होत आहेत.  त्यामुळे ...

जळगाव : कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या अंतिम वर्षाच्या (बॅकलॉगसह) विद्यार्थ्यांच्या १२ ऑक्टोबर पासुन सुरु  होत आहेत.  त्यामुळे ऑनलाईन परीक्षा देतांना विद्यार्थ्यांना वीज पुरवठ्याचा व्यत्यय येवू नये यासाठी जिथे लोड शेडींग केले जाते.  त्या गावांमध्ये वेळा  बदलण्याच्या सूचना महावितरणच्या प्रतिनिधींना करून  होणाऱ्या परीक्षांसाठी जिल्हा प्रशासन, महावितरण, परिवहन महामंडळ, पोलिस व आरोग्य विभाग यांनी सर्वतोपरी सहकार्य करून या परीक्षा सुरळीत पार पाडाव्यात असे आवाहन जळगाव जिल्हयाचे पालकमंत्री तथा पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी केले. 

 मंगळवारी विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेच्या सभागृहात  गुलाबराव पाटील यांच्या उपस्थितीत परीक्षा आढावा बैठक घेण्यात आली.  या बैठकीस कुलगुरू प्रा. पी.पी. पाटील, प्र-कुलगुरू प्रा. पी.पी. माहुलीकर, जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, जिल्हा पोलिस अधिक्षक डॉ. प्रवीण मुंडे, राज्य परिवहन महामंडळाचे वाहतुक अधिकारी दिलीप बंजारा, महावितरणचे प्रतिनिधी  एम.व्ही. चौधरी, अधिष्ठाता  प्रा. ए.बी. चौधरी, प्रभारी कुलसचिव प्रा. बी.व्ही. पवार, परीक्षा व मूल्यमापन मंडळ संचालक बी.पी. पाटील, उपकुलसचिव डॉ. एस. आर. भादलीकर आदी उपस्थित होते. 

 अंतिम वर्षासाठी ५३ हजार ५६४ परीक्षार्थी  बैठकीच्या  सुरुवातीला बी.पी. पाटील यांनी अंतिम वर्ष / अंतिम सत्राच्या परीक्षेसाठी ऑनलाईन व ऑफलाईन पध्दतीने परीक्षा देणाऱ्या एकूण विद्यार्थ्यांची संख्या ५३ हजार ५६४ एवढी असल्याचे सांगितले यामध्ये ऑनलाईन पर्याय ३९ हजार ९० विद्यार्थ्यांनी तर ऑफलाईन पर्याय १४ हजार ४७४ विद्यार्थ्यांनी निवडला असल्याची माहिती दिली. ऑफलाईनसाठी जळगाव जिल्हयात ७ हजार २९८ तर ऑनलाईनसाठी २१ हजार ९३४ परीक्षार्थी आहेत. जळगाव जिल्हयात ऑफलाईनसाठी ९४ परीक्षा केंद्र असणार आहेत. असे यावेळी सांगण्यात आले. कुलगुरू प्रा. पी.पी. पाटील यांनी यावेळी विद्यापीठाच्या वतीने परीक्षांच्या पुर्वतयारीची सविस्तर माहिती दिली. विद्यापीठाच्या वतीने सराव चाचण्या (मॉकटेस्ट) घेण्यात येत आहेत. याशिवाय मॉडेल प्रश्नसंच देखील विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देण्यात आले आहेत. कोणताही विद्यार्थी परीक्षेपासून वंचित राहणार नाही याची काळजी घेतली जाईल. असे कुलगुरूंनी यावेळी स्पष्ट केले.  

महामंडळाने बसेसची पुरेशी व्यवस्था करावी... ग्रामीण भागातून परीक्षा केंद्रापर्यंत पोहचण्यासाठी एस.टी. महामंडळाने बसेसची पुरेशी व्यवस्था करावी अशीही सूचना पालकमंत्र्यांनी  बैठकीत केली. परीक्षा केंद्रावर येणाऱ्या विद्यार्थ्यांच्या आरोग्याची काळजी योग्य त्या प्रतिबंधक उपाययोजना करून घेतली जावी, शक्य असेल तिथे ग्रामिण भागातील विद्यार्थ्यांना तालुका स्तरावर परीक्षा देण्यासाठी सूचना कराव्यात, दिव्यांग विद्यार्थ्यांना कोणत्याही अडचणी येणार नाही याची काळजी घ्यावी, आवश्यक त्या परीक्षा केंद्रावर पुरेसा पोलिस बंदोबस्त द्यावा अशा सूचना श्री. गुलाबराव पाटील यांनी संबंधित विभागांच्या प्रतिनिधींना केल्या.  विद्यापीठाच्या पुर्वतयारी बद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. बी.पी. पाटील यांनी शेवटी आभार मानले.  

टॅग्स :Educationशिक्षणJalgaonजळगाव