चाळीसगाव, जि.जळगाव : पाटणादेवी जंगलात चंदनाच्या झाडांची तोड करुन चोरी करणाऱ्या तिघा चोरट्यांपैकी एकाला वनविभागाच्या गस्त पथकाने जेरबंद केले आहे. चोरट्यांनी पथकावर हल्ला केला यात वनमजूर जखमी झाला असून, १२ हजारांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. दोघे चोरटे मात्र जंगलात पसार झाले.रविवारी वनविभागाच्या ३०३ झोनमध्ये पथक गस्त घालीत असताना त्यांना काही तरी तोडण्याचा आवाज आला. पथकाने शोध घेतला असता तिघे चोरटे चंदनाचे झाड तोडताना आढळून आले. त्यांनी चोरट्यांना पकडण्याचा प्रयत्न केला असता चोरट्यांनी त्यांच्यावर हल्ला केला. यात रोजंदारी वनमजूर हिरासिंग चव्हाण हे जखमी झाले. सरदार खान मेवानी पठाण (रा.ब्राह्मणी, ता.कन्नड, जि.औरंगाबाद) या चंदन चोरट्यावर झडप घालून पथकाने त्याला जेरबंद केले. त्याच्याकडून १२ हजार रुपये किमतीचे चंदनाच्या लाकडाचे गोल तुकडे यासह अवजारे, कुदळ, करवत व कुºहाड असा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
चाळीसगाव तालुक्यातील पाटणादेवी जंगलात चंदनचोर जेरबंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2019 22:29 IST
पाटणादेवी जंगलात चंदनाच्या झाडांची तोड करुन चोरी करणाऱ्या तिघा चोरट्यांपैकी एकाला वनविभागाच्या गस्त पथकाने जेरबंद केले आहे. चोरट्यांनी पथकावर हल्ला केला यात वनमजूर जखमी झाला असून, १२ हजारांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.
चाळीसगाव तालुक्यातील पाटणादेवी जंगलात चंदनचोर जेरबंद
ठळक मुद्दे१२ हजाराचा मुद्देमाल जप्तवनमजूर जखमीदोघे चोरटे जंगलात पसारचोरट्यांचा वनविभागाच्या पथकावर हल्ला