शहरं
Join us  
Trending Stories
1
' भारतीय अपमान सहन करीत नाहीत, अमेरिकेच्या दबावापुढे भारत कधीच झुकणार नाही' : पुतिन
2
आजचे राशीभविष्य- ४ ऑक्टोबर २०२५: पैशांच्या गुंतवणुकीवर लक्ष द्या, कमी वेळात जास्त लाभ घेण्याची लालसा सोडा
3
...तर पाकिस्तान जागतिक नकाशावर दिसणार नाही! भारतीय लष्करप्रमुखांनी खडसावले 
4
अमेरिकी रस्त्यावर भारतीय बाइक्सने अभिमान वाटतो; राहुल यांनी अमेरिकेत केला भारतीय कंपन्यांचा गौरव
5
लेह हिंसाचार : सोनम वांगचुक यांना अटक; न्याय मागण्यासाठी पत्नी कोर्टात
6
‘बाबा’ विद्यार्थिनींना रात्री खोलीत येण्यास भाग पाडायचा; मिळाली १४ दिवस कोठडी
7
आता सौरऊर्जेवर चालणारी ई-बुलेट आली; ऊर्जाबचत, प्रदूषण नियंत्रणासाठी मोठा फायदा
8
नवी मुंबई विमानतळास दि. बा. पाटील यांचेच नाव; नामकरणासाठी पंतप्रधान मोदी सकारात्मक : मुख्यमंत्री 
9
अमेरिकेच्या टॅरिफ संकटात भारतासह युरोपियन देशांची भूमिका मोलाची; स्वेन ओस्टबर्ग यांचे मत
10
पाणंद रस्ते मोकळे करा,  तरच मिळेल सरकारी लाभ; प्रस्ताव विचाराधीन
11
सोमवारपासून परतीच्या सरी; चक्रीवादळ 'शक्ती'मुळे महाराष्ट्रात पुन्हा पाऊस? हवामान खात्याचा नेमका अंदाज काय?
12
मनोज जरांगेंचा १९९४ च्या जी. आर. विरोधात एल्गार! 'या' दोन मोठ्या जातींच्या आरक्षणावर बोलले
13
पाकिस्तानवर हसावं की रडावं.... आता म्हणे मोहसीन नक्वीला गोल्ड मेडल देणार, सन्मान करणार !
14
लाखोंच्या गर्दीत हरवलेला 'मुन्ना' काही मिनिटांत 'अण्णा'च्या गळ्यात; बापलेकांची भावनिक भेट
15
सानिया मिर्झाशी घटस्फोट, आता शोएब मलिकचे सना जावेदशीही लग्न तुटणार? VIDEO मुळे उडाली खळबळ
16
ट्रॅक्टरमध्ये बसून थेट बांधावर... सोलापूरच्या अधिकाऱ्यांची तत्परता, शेतकऱ्यांना दिला धीर
17
'फिट' है तो 'हिट' है... बॉलिवूड अभिनेत्रीचा कमालीचा फिटनेस, या वयातही चाहत्यांना करते घायाळ
18
वेळागर समुद्रात आठजण बुडाले; तिघांचे मृतदेह हाती, एकीचा जीव वाचला, किनाऱ्यावर आक्रोश
19
राज्यात अतिवृष्टी, पूरस्थिती; अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेची ४-६ ऑक्टोबरला अंतिम विशेष फेरी
20
शेतकऱ्यांसाठी काँग्रेस रस्त्यावर; नुकसानग्रस्तांना तत्काळ मदत मिळण्यासाठी राज्यभर आंदोलन

लोकसभा निर्विघ्न पार पाडण्याचे आव्हान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2019 11:15 IST

लोकसभा निवडणुकीचा बिगुल वाजला आहे. जिल्ह्यात तिसºया टप्प्यात अर्थात २३ एप्रिल रोजी रावेर आणि जळगाव मतदार संघासाठी मतदान होणार आहे.

ठळक मुद्देआॅनलाईन विश्लेषणपोलीस दलाची कसरत अवैध धंदे पुन्हा सुरु

सुनील पाटीलजळगाव : लोकसभा निवडणुकीचा बिगुल वाजला आहे. जिल्ह्यात तिसºया टप्प्यात अर्थात २३ एप्रिल रोजी रावेर आणि जळगाव मतदार संघासाठी मतदान होणार आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा व पोलीस प्रशासन तयारीला लागले आहे. पोलीस प्रशासनाच्यावतीने पाल येथे दोन राज्यांची बॉर्डर कॉन्फरन्स झाली. विशेष पोलीस महानिरीक्षकांचे तीन दौरे झाले. अपर पोलीस महासंचालक दौºयावर येऊन गेले. या दोन्ही अधिकाºयांनी जिल्ह्याचा सूक्ष्म अभ्यास करुन त्याअनुषंगाने कामकाज करण्याच्या सूचना पोलीस अधिकाºयांना दिल्या. सद्यस्थितीत जिल्ह्यात पोलीस अधीक्षकापासून सर्वच अधिकारी नवीन आहेत. जिल्ह्याची फारशी जाण या अधिकाºयांना नाही. चाळीसगाव परिमंडळाचे अपर पोलीस अधीक्षक प्रशांत बच्छाव एकमेव अनुभवी अधिकारी आहेत. गेल्या लोकसभा निवडणुकीच्यावेळी ते जळगावला पोलीस उपअधीक्षक होते. जळगावची राजकीय व गुन्हेगारी स्थिती पाहता पोलीस अधीक्षकांसमोर मोठे आव्हान आहे. काही महिन्यापूर्वी झालेल्या मनपा निवडणुकीत गुन्हेगारी उफाळून आली होती. यावेळी पोलीस दलावर पक्षपातीचा आरोप झाला होता. राजकीय दबावाखाली यंत्रणा झुकल्याचा उघड आरोप झाला होता. त्यामुळे या निवडणुकीत हा डाग पुसून काढणे एक आव्हान आहे. पोलीस अधीक्षक डॉ.पंजाबराव उगले यांची ही पहिलीच कार्यकारी पोस्टींग आहे, त्यात सर्वच अधिकारी नवखे,त्यामुळे त्यांचा चांगलाच कस लागणार आहे. कायदा सुव्यवस्था असो कि गुन्हेगारांवरील कारवाया करताना मोठी कसरत करावी लागणार आहे. त्यात व्हाईट कॉलर गुन्हेगारांवर काय व कशी कारवाई होते, हे देखील पाहणे औत्सुकत्याचे आहे.त्यात आता भर पडली आहे ती अवैध धंद्याची. जिल्ह्यात बंद असलेले अवैध धंदे उघडपणे सुरु झाले आहेत. जामनेर येथे तर सट्टा बाजार नावाचे मार्केटच सुरु झाले आहे. या बाजारपट्ट्यात भाजापीला विक्रेते बसतात तसे सट्टा घेणाºयांनी दुकाने लावली आहेत. इतर तालुक्यातही अवैध धंदे जोरात आहेत, मात्र त्याच जामनेर जरा जास्तच वरचढ ठरले आहे. या साºया परिस्थितीत पोलीस दलासमोर लोकसभा निवडणूक निर्विघ्नपणे पार पाडण्याचेच खरे आव्हान आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीJalgaonजळगाव