जळगाव : आमच्या उक्ती आणि कृतीमध्ये फरक नाही. जे सांगोत ते करतोच. जम्मू काश्मीरमधील ३७० कलम हटविल्याने देशातील काही राजकीय नेते व पक्ष देश हिताच्या निर्णयावरून राजकारण करीत आहे.त्यांनी या व आगामी कोणत्याही निवडणुकीच्या जाहीरनाम्यामध्ये ३७० कलमचा उल्लेख करून दाखवावा, असे आव्हान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जळगावाता विरोधकांना दिले.विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची रविवारी जळगावात विमानतळाच्या समोरील जागेवर जाहीर सभा होत आहे. त्या वेळी ते बोलत आहे.
विरोधकांना आव्हान, जाहीरनाम्यात ३७० कलमचा उल्लेख करून दाखवा - नरेंद्र मोदी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 13, 2019 13:11 IST