शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
2
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
3
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
4
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
5
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
6
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
7
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
8
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
9
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
10
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
11
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
12
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
13
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
14
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
15
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
16
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
17
‘साहेब’ होऊ घातलेला बिरदेव म्हणतो, शेळ्या-मेंढ्यांना काय लाजायचं? तीच माझी ताकद
18
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
19
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
20
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन

७२७ वर्षांची परंपरा असणारा चाळीसगावचा बामोशी बाबा उरुस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2018 19:06 IST

तीन दिवसांच्या मुख्य उरुस दरम्यान तलवार मिरवणुकीस लोटतो भाविकांचा जनसागर

ठळक मुद्देतलवार मिरवणुक आणि भक्तिभावचादर, शिरणी आणि न्याजसमाधीचे दुधाने स्नान

जिजाबराव वाघ/आॅनलाईन लोकमतचाळीसगाव, दि : २८ : हजरत पीर मुसा कादरी ऊर्फ बामोशी बाबांच्या सर्वधर्मीय उरुसाचे यंदाचे हे ७२८ वे वर्ष आहे. तीन दिवसीय मुख्य उत्सवाला शनिवार ३१ पासून सुरुवात होत आहे. पोलीस प्रशासनाने नुकताच परिसराचा आढावा घेऊन सुरक्षेसाठी तयारी पूर्ण केली आहे.समाधीचे दुधाने स्नानतीन दिवस चालणाऱ्या उरुस यात्रोत्सवाची सुरुवात बामोशी बाबांच्या समाधीच्या स्नानाने होते. ३१ रोजी रात्री बारानंतर पहाटे चार पर्यंत दुध, गुलाबपाणी, सुगंधी अत्तराने कबरीचे शाही स्नान केले जाते.चला चला 'कादरी' का संदलउत्सवाच्या दुस-या दिवशी संदल मिरवणुक निघते. यावर्षी १ एप्रिल रोजी रथगल्लीतील तमीजोद्दीन शेख यांच्या घरुन परंपरेप्रमाणे सायंकाळी पाच वाजता संदल मिरवणुक निघेल. ही मिरवणुक वाजत - गाजत रात्री साडे नऊ वाजता बाबांच्या समाधीस्थळी पोहचते. यावेळी मिरवणुक वाजत - गाजत आणलेले संदल (चंदन) अर्पण केले जाते. मानाची चादर कबरीवर टाकण्यात येते.तलवार मिरवणुक आणि भक्तिभावभालचंद्र भास्करराव देशमुख हे तलवार भुवनचे संस्थापक व प्रमुख आहेत. गेल्या ७२७ वर्षांपासून याठिकाणावरून तलवारीची भव्य मिरवणुक निघते. यंदा ही मिरवणुक २ एप्रिल रोजी सायंकाळी पाच वाजता निघणार आहे. हिरव्या चुडीचादरीत गुंडाळलेली तलवार, भगवा फेटा आणि टिळा लावलेला देशमुख कुमार धरतो. मिरवणुकीत सर्वधर्मीय भाविक सहभागी होतात. राष्ट्रीय एकात्मतेचे हे दृश्य डोळ्याचे पारणे फेडणारे असते. बँण्डची सुरावट, ढोल पथकाचे गगनभेदी ताल, हजारो मुखातून बाबांचा होणार गजर, वाटेत ठिकठिकाणी होणारी पुष्पवृष्टी...अशा वातावरणात ही मिरवणुक पुढे सरकते. रात्री नऊ वाजता बाबांच्या समाधीस्थळी तलवारीचा मुक्काम असतो.काय आहे अख्यायिकापीर मुसा कादरी ऊर्फ बामोशी बाबांच्या चाळीसगाव शहरातील वास्तव्याबाबत वेगवेगळ्या अख्यायिका असल्या तरी ते आठव्या शतकातील सुफी संत म्हणून परिचित आहेत. अखिल मानव जातीच्या कल्याणासाठी त्यांनी वेगवेगळे चत्मकारही करुन दाखविले. अवलिया संतांसारखी त्यांची दिनचर्या होती. रंजल्या - गांजल्या लोकांची दु:खे दूर करण्यात त्यांना आत्मानंद वाटत असे. शहराच्या नैऋत्य दिशेला डोंगरी नदीच्या किनारी त्यांची समाधी असून येथेच दर्गाह उभारण्यात आला आहे. बाबांनीच आयुष्याच्या शेवटच्या क्षणी त्यांच्याजवळ असणारी तलवार भालचंद्र देशमुख यांना सुपूर्द केली. तलवार मिरवणुकीत धुनी धरण्याचा मान चाळीसगावचे पोलीस पाटील स्व. वसंतराव भास्करराव देशमुख यांच्या कुटूंबियांकडे आहे.चादर, शिरणी आणि न्याजचाळीसगाव पंचक्रोशीतून अनेक भाविक बाबांच्या समाधीवर 'चादर' चढवतात. चादरीसोबत गोड शिरणी, न्याज (गोड भात) अशी सवाद्य मिरवणुक काढली जाते. बाबांच्या समाधीवर टाकण्यात येणारी चादर मुंबई, पुणे, बुलढाणा येथून येते. चादरीवर कुराण मधील 'आयते सुरह' लिहिले असतात. उरुस पर्वणीत चादर सेवा विशेष मानली जाते. सर्वधर्मीय लोक चादर चढवितात.

टॅग्स :JalgaonजळगावChalisgaonचाळीसगाव