शहरं
Join us  
Trending Stories
1
इलेक्ट्रिक वाहनांना आजपासून अटल सेतूवर मोफत प्रवास; इतर दोन महामार्गावरही दोन दिवसांत लागू
2
आजचे राशीभविष्य, २२ ऑगस्ट २०२५: बोलण्यावर संयम ठेवणे आवश्यक; शक्यतो नवीन काम घेऊ नका
3
मुंबईचे सर्वाधिक दूषित पाणी भेंडी बाजार, वांद्रे पूर्व, कुलाबा, कफ परेड, सांताक्रूझमध्ये !
4
दसरा-दिवाळीत स्वस्ताईचा बार! GSTमध्ये मोठे बदल लवकरच; ५ टक्के आणि १८ टक्के असे दोनच टप्पे!
5
परदेशी विद्यार्थ्यांची मुंबई विद्यापीठाला पसंती; ६१ देशांच्या २५८ जणांनी घेतला प्रवेश
6
रस्तेबांधणीचे टेंडर हा नवा धंदा बनला आहे: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची यंत्रणेवर खोचक टीका
7
फडणवीस यांचा पवार, ठाकरेंना फोन; उपराष्ट्रपतिपदासाठी जुळवाजुळव सुरू; दोघांकडे मिळून २१ मते
8
बाळगंगा प्रकल्पाचे थकीत ३०३ कोटींचे बिल अदा करा; हायकोर्टाने लवादाचा निर्णय ठरविला योग्य
9
भय इथले संपत नाही... तारापूरमध्ये कंपनीत वायुगळती; ४ जणांचा मृत्यू, दोन जण गंभीर
10
BDDच्या घराची चावी घेण्यासाठी 'म्हाडा'कडून घातलेली हमीपत्राची अट काढून टाका- आदित्य ठाकरे
11
जीएसबी सेवा मंडळाचा ४७४ कोटींचा विमा; यामध्ये भाविकांचाही समावेश, एसीमध्ये दर्शन मिळणार
12
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
13
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
14
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
15
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
16
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
17
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
18
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
19
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
20
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं

चाळीसगाव पालिकेच्या ‘शताब्दी’चा पडला विसर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 21, 2018 18:48 IST

निनादणारे सनईचे मंगलस्वर... आंब्याच्या पानांचे तोरण... फुलांची सजावट... शहरातून निघालेली भव्य शोभायात्रा... एखाद्या शताब्दी महोत्सवाची सुरुवात अशी होते. तथापि, चाळीसगाव नगरपालिका प्रशासनाच्या ढिम्म कारभारामुळे या ऐतिहासिक क्षणांना मुकली आहे. शुक्रवारी पालिकेने शताब्दी वर्षात पदार्पण करूनही त्याचे साधे उद्घाटनही होऊ शकले नाही. नगराध्यक्षांसह नगरसेवकांच्या अनास्थेविषयी शहरात नाराजीचा सूर उमटला आहे.

ठळक मुद्देपालिका प्रशासन उदासिन, सर्व स्तरातून व्यक्त झाली नाराजीसत्ताधारी म्हणतात, समिती गठित करणारविरोधी गट म्हणतात, सुविधांबाबत जनतेचा भ्रमनिरास

जिजाबराव वाघचाळीसगाव, जि.जळगाव : निनादणारे सनईचे मंगलस्वर... आंब्याच्या पानांचे तोरण... फुलांची सजावट... शहरातून निघालेली भव्य शोभायात्रा... एखाद्या शताब्दी महोत्सवाची सुरुवात अशी होते. तथापि, चाळीसगाव नगरपालिका प्रशासनाच्या ढिम्म कारभारामुळे या ऐतिहासिक क्षणांना मुकली आहे. शुक्रवारी पालिकेने शताब्दी वर्षात पदार्पण करूनही त्याचे साधे उद्घाटनही होऊ शकले नाही. नगराध्यक्षांसह नगरसेवकांच्या अनास्थेविषयी शहरात नाराजीचा सूर उमटला आहे.स्थानिक स्वराज्य संस्था असणारी नगरपालिका कोणत्याही शहराचा आत्मा असते. चालता-बोलता इतिहास म्हणूनदेखील तिच्याकडे पाहिले जाते. शहराच्या जडणघडणीची ती मुख्य साक्षीदार असते. थेट ब्रिटिश कालखंडात सुरू झालेली चाळीसगाव पालिका म्हणून वेगळी ठरते. उत्तर महाराष्ट्रात लौकिक मिळविणाऱ्या याच पालिकेने ९९ वर्षांचा टप्पा पार करुन शताब्दी वर्षात पदार्पण केले आहे. शताब्दी महोत्सवही थाटात सुरू होणे अपेक्षित होते. मात्र प्रशासनासह शहराचा गाडा हाकणारे नगराध्यक्ष, नगरसेवक आणि यांच्यात दुवा म्हणून भूमिका बजावणारे मुख्याधिकारी यांना शताब्दी महोत्सवाचा विसर पडलेला पाहून नागरिकांसह विविध स्तरातील महानुभावांनी तीव्र नापसंती दर्शवली आहे.हेचि फळ का मम तपाला?१९ आॅक्टोबर १९१९ रोजी चाळीसगाव पालिकेचा कारभार लोकनियुक्त पदाधिकारी पाहू लागले. त्यामुळे यंदाचे २०१८ हे वर्ष पालिकेचे शताब्दी वर्ष ठरते. पुढील वर्षी शताब्दी वर्षाची सांगता होईल. शुक्रवारी म्हणूनच शताब्दी महोत्सवाचे दीपप्रज्वालन होऊन नमनाची सनई निनादणे आवश्यक होते. महोत्सवाच्या तयारीबाबतही पालिकेचे नियोजन नसल्याची बाब उघड झाली आहे. पालिका शताब्दीत पदार्पण करीत असल्याचे प्रशासनाकडून कळविण्यात आले नाही, अशी खंत काही नगरसेवकांनी ‘लोकमत’शी बोलतांना मांडली.चाळीसगाव पालिका नाबाद १००चाळीसगाव शहराचा कारभार (१९०७ ते १९१९ ) असा १२ वर्षे 'नोटीफाईड कमिटीने' पाहिल्यानंतर १२ एप्रिल १९१९ रोजी म्युनिसिपल अ‍ॅक्टनुसार पालिका अस्तित्वात आली. १ आॅगस्ट १९१९ रोजी आठ जागांसाठी पहिली निवडणूक झाली. यात १९ जण रिंगणात होते. १९ आॅक्टोबर १९१९ रोजी लोकनियुक्त प्रतिनिधींनी पालिकेचा कारभार पाहण्यास सुरुवात केली. पहिले नगराध्यक्ष म्हणून नगरशेट नारायण बंकट बुंदेलखंडी यांची निवड झाली. यंदाचे हे पालिकेचे शताब्दी वर्ष असून, शुक्रवारी त्याला सुरुवात झाली आहे. २०१९ मध्ये शताब्दीची सांगता होईल. गेल्या १०० वर्षांचा हा पालिकेचा प्रवास आहे. तो आजच्या आॅनलाइन पिढीलाही ज्ञात होणे गरजेचे आहे. शताब्दी महोत्सवात याचे सिंहावलोकन होऊ शकते.दोन दिवसात बैठक घेणारचाळीसगाव पालिकेने शताब्दी वर्षात पदार्पण केले, ही भूषणावह बाब असून, नियोजनासाठी येत्या दोन दिवसात बैठक घेण्यात येणार आहे. सर्व नगरसेवक व विविध क्षेत्रातील जाणकारांची एक समिती गठित केली जाईल. आमदार उन्मेष पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली महोत्सव साजरा केला जाणार आहे. - आशालता चव्हाण, नगराध्यक्षा, न.पा.चाळीसगाव.सगळाच आनंदी आनंदचाळीसगाव पालिकेने राज्यभर नावलौकिक मिळविला आहे. मात्र गेल्या दोन वर्षात याला आहोटी लागली आहे. सर्वत्र उदासिनता असून, जाहिरातबाजीला ऊत आला आहे. जनतेची कामे मार्गी लागत नाही. सोयी-सुविधांबाबत जनतेचा भ्रमनिरास झाला आहे. शताब्दी महोत्सवाचा विसर पडणे हे याचे स्पष्ट उदाहरण आहे.-राजीव देशमुख, गटनेते शविआ, चाळीसगाव पालिका.नियोजन करूगेल्या ३५ वर्षांपासून नगरसेवक म्हणून काम करतोयं. विद्यमान सभागृहातील ज्येष्ठ नगरसेवकही आहे. शताब्दी महोत्सवाबाबत प्रशासनाने कळविले नाही. नगराध्यक्षांसह सर्व नगरसेवकांना विश्वासात घेऊन नियोजन करू.नागरिकांच्या प्रताक्रिया, आशा तसेच अपेक्षाही जाणून घेण्यात येतील.-राजेंद्र चौधरी, गटनेते भाजपा, चाळीसगाव न.पा.विविध कार्यक्रम घ्यावेचाळीसगाव पालिकेला शतकी परंपरा आहे. यामुळे शताब्दी महोत्सव साजरा होणे क्रमप्राप्त ठरते. यासाठी विविध कार्यक्रम घेण्यात यावे. वेगवेगळे संकल्प करुन सोयी - सुविधा शेवटच्या घटकापर्यंत पोहचल्या पाहिजेत. शताब्दी सोहळ्यात नागरिकांना सहभागी केले पाहिजे. नागरी योजनांची प्रभावी अंमलबजावणी करावी.-लीलावती पाटील, माजी नगराध्यक्षा, चाळीसगाव.खंत वाटतेपाया भक्कम असेल तरच एखादी संस्था शताब्दीत पाऊल ठेवते. चाळीसगाव पालिकेला वैभवशाली इतिहास असून तिच्या शताब्दी महोत्सवाचा कोणताही मागसूम दिसत नाही याची खंत वाटते. स्थापनेपासून आमच्या कुटुंंबाने पालिकेसाठी मोठे योगदान दिले आहे. शहरात नागरी सुविधा पुरविण्याची चांगली परंपरा पालिकेने जपली आहे. तथापि, गेल्या काही वर्षात याला छेद गेला आहे. - प्रदीप देशमुख, अध्यक्ष, व्यापारी महामंडळ, चाळीसगाव.अभिमानाची बाबलोकसहभाग वाढविण्यासाठी शताब्दी महोत्सवाचा चांगला उपयोग होऊ शकतो. मात्र याचा विसर पडल्याचे पाहून वाईट वाटले. गेल्या शंभर वषार्तील स्मृती जागविणारा सोहळा घडवून आणणे. ही पालिकेची जबाबदारीच आहे. यामुळे सामाजिक जिव्हाळा वाढीस लागण्यास मदत होईल. 'प्रभाग मेळावे' असे उपक्रमही यानिमित्ताने घेता येतील.-डॉ.मुकूंद करंबेळकर, अध्यक्ष, रंगगंध कलासक्त न्यास, चाळीसगाव. 

टॅग्स :SocialसामाजिकChalisgaonचाळीसगाव