शहरं
Join us  
Trending Stories
1
SRH vs DC : दिल्लीच्या फलंदाजांनी नांगी टाकली; पण पावसाच्या बॅटिंगमुळे हैदराबाद फक्त बॉलिंग करून 'आउट'
2
"९० हजार सैनिकांचे पायजमे आजही तिथे टांगलेले आहेत’’, मुनीर आणि पाकिस्तानचं बलूच नेत्याकडून वस्रहरण   
3
IPL 2025 Playoffs Race : आता ४ जागेसाठी ७ दावेदार! कोणत्या संघासाठी कसे आहे प्लेऑफ्सचे समीकरण?
4
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं सरपंच संतोष देशमुख यांची कन्या वैभवीचं कौतुक
5
दोन्ही दिल्लीकर एकाच क्रीजमध्ये; रन आउटसाठी स्टँडमध्ये काव्या मारनची 'दातओठ खात' तळमळ (VIDEO)
6
"वेगळे राजकारण करून पॅनलला गालबोट लावण्याचा प्रयत्न केल्यास माझ्या दारात येऊ नका",अजित पवार यांचा इशारा
7
SRH vs DC : पॅट कमिन्सचा विकेट्सचा खास पॅटर्न! स्पेल बघून काव्या मारनही झाली शॉक
8
निकाल ऐकण्यापूर्वीच विद्यार्थिनीने संपवलं जीवन, नापास झाल्याच्या भीतीतून उचलले पाऊल
9
Shivalik Sharma: क्रिकेटरला अटक; लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर अत्याचार केल्याचा आरोप
10
रेल्वे स्थानकाच्या पायऱ्यांवर पाकिस्तानी ध्वज चिकटवला; पाहताच महिलेने घातला गोंधळ, व्हिडीओ व्हायरल
11
SRH vs DC : "डिअर क्रिकेट प्लीज प्लीज ..." दुसऱ्यांदा पदरी भोपळा पडल्यावर करूण नायर झाला ट्रोल
12
"महायुती म्हणजे 'तीन तिघाडा, काम बिघाडा"; काँग्रेस फोडण्याच्या मुद्द्यावरून प्रणिती शिंदेंची टीका
13
ड्रग्स टेस्टमध्ये दोषी आढळलेला कगिसो रबाडा पुन्हा IPL खेळणार, 'या' संघाविरूद्ध होणार 'कमबॅक'
14
हवाई हल्ल्याची तयारी... पाकिस्तानसोबत तणावाच्या पार्श्वभूमीवर गृह मंत्रालयाचे सर्व राज्यांना निर्देश
15
भारताच्या संरक्षण वेबसाईट्सवर पाकिस्तानकडून सायबर हल्ला, महत्त्वपूर्ण गोपनीय माहिती लीक झाल्याचा संशय
16
काही लोक काँग्रेस सोडत आहेत, आमची वेळ आल्यावर आम्हीही बदला घेऊ- विजय वडेट्टीवार
17
वाहतुकीचे नियम तोडले तर मिळतील निगेटिव्ह पॉईंट्स, ड्रायव्हिंग लायसन होणार सस्पेंड, अशी आहे नवी पॉईंट सिस्टिम
18
ही आहे भारताची ताकद; जर्मनी-फ्रान्सचा पाकिस्तानबाबत मोठा निर्णय, जाणून घ्या...
19
पाकवर आर्थिक हल्ला; ADB अध्यक्षांना भेटल्या निर्मला सीतारामण, निधी रोखण्याची केली मागणी
20
२२ महीने राबला, पगार मागताच हॉटेल मालक, मॅनेजरने स्वयंपाक्याचा गुप्तांग ठेचून खून केला

चाळीसगाव पालिकेचा शिलकी अर्थसंकल्पावर विरोधकांचा आक्षेप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2018 12:42 IST

मुख्याधिका-यांना दिले निवेदन

ठळक मुद्देचर्चेविनाच केला मंजूरसत्ताधारी म्हणतात सर्व योग्यच

आॅनलाइन लोकमतचाळीसगाव, जि. जळगाव, दि. २८ - चाळीसगाव नगरपालिकेचा ३ कोटी ३९ लाख ७६ हजार ८६७ रुपये शिलकीचा अर्थसंकल्प मंगळवारी सभागृहात नगराध्यक्षा आशालता चव्हाण यांनी सादर केला. सत्ताधा-यांनी बहुमताने मंजुरही केला. विरोधी शविआच्या सदस्यांनी मात्र चर्चेविनाच बहुमताच्या जोरावर अर्थसंकल्प मंजुर केल्याचा आक्षेप घेतला. मुख्याधिकारी अनिकेत मानोरकर यांना याविषयीचे निवेदनही दिले. उपनगराध्यक्षा आशाबाई चव्हाण, शविआचे गटनेते राजीव देशमुख, भाजपाचे गटनेते राजेंद्र चौधरी यांच्यासह सर्व नगरसेवक उपस्थित होते.१८२ कोटी २४ लाख १६ हजार ४६६ रुपयांचा अर्थसंकल्प मांडण्यात आला. यात १७९ कोटी २४ लाख ३९ हजार ९९९ रुपये खर्च होणार असून ३ कोटी ३९ लाख ७६ हजार ८६७ शिल्लक राहणार आहेत. अर्थसंकल्पात कोणतीही करवाढ सुचविण्यात आली नाही.विरोधकांचे आक्षेपअर्थसंकल्पाच्या आकडेवारीत चुका आहेत. त्याबाबत मुख्याधिका-यांनी समर्पक उत्तर दिले नाही. २०१४ - १५च्या अर्थसंकल्पात प्रारंभिक शिलकीची आकडेवारी सदोष असल्याने २०१८च्या अर्थसंकल्पावर त्याचा परिणाम झाला आहे.अर्थसंकल्प सभागृहात मांडण्याआधी तो स्थाथी समितीसमोर मांडणे आवश्यक होते. मात्र तसे झाले नाही. सत्ताधारी विरोधी नगरसेवकांविषयी आकस बुद्धीने वागतात. सदोष आकडेवारी लक्षात आणून दिल्यानंतर मुख्याधिका-यांनी सभागृहात माफीही मागितली.सत्ताधा-यांनी बहुमताच्या जोरावर कोणतीही चर्चा न करताच अर्थसंकल्प मंजुर केला. मतदान देखील घेतले नाही. मंगळवारी घेतलेली सभा रद्द करावी. अशी मागणीही विरोधकांनी मुख्याधिका-यांना दिलेल्या निवेदनात केली. यावर सुरेश स्वार, दिपक पाटील, सूर्यकांत ठाकुर, रामचंद्र जाधव, आनंदा कोळी यांच्यासह एकुण १६ सदस्यांच्या स्वाक्षरी आहेत.सत्ताधारी म्हणतात सर्व योग्यच२०१४च्या अर्थसंकल्पाच्या आकडेवारीत तांत्रिक चूक होती. हे आम्ही मान्य केले. मुख्याधिका-यांनी माफी मागून विरोधकांच्या सुचना स्विकारण्याची तयारी देखील दाखवली. तथापि विरोधकांनी अडवणुकीचे धोरण घेतले.शहरातील अंतर्गत पाणी पुरवठा करणा-या जलवाहिन्या, नदी संवर्धन, पालिकेला २०१९ मध्ये १०० वर्ष होत असल्याने शताब्दी महोत्सव साजरा करणे, भूयारी गटार, हा?कर्स झोनची निर्मिती, दलित वस्ती सुधारणा, पंतप्रधान आवास योजना यासाठी भरीव तरतूद केली आहे.अर्थसंकल्पावर चर्चा करण्याची तयारी असतांनाही विरोधकांनी अडवणुकीचे धोरण घेतले. बहुमत असल्यानेच शिलकी अर्थसंकल्प मंजुर केला असल्याची प्रतिक्रिया सत्ताधारी गटातील नगरसेवक घृष्णेश्वर पाटील, नितिन पाटील यांनी दिली.लेखपालास नोटीस देणारअर्थसंकल्पातील आकडेवारीत चुका करणारे लेखापाल चंद्रशेखर वैद्य यांना नोटीस देण्यात येणार असल्याचे मुख्याधिकारी अनिकेत मानोरकर यांनी सांगितले. वैद्य हे मंगळवारी अर्थसंकल्पाच्या सभेलाही गैरहजर होते. आकडेवारीत चुका करणा-या कर्मचा-यांवर कारवाई करावी. अशी मागणी सभागृहात संजय रतनसिंग पाटील, चंद्रकांत तायडे या सत्ताधारी गटातील नगरसेवकांनी केली होती.विरोधी सदस्यांची भूमिका समन्वयाची नव्हती. तांत्रिक चुक मान्य करुन आणि फेरबदल करण्याची तयारी दर्शविल्यानंतरही त्यांनी विरोधच केला. बहुमताने शिलकी अर्थसंकल्प मंजुर झाला आहे. सभा ही कायदेशीरच आहे. सुचना स्विकारण्याचेही आम्ही मान्य केले होते.- आशालता चव्हाण, नगराध्यक्षाअर्थसंकल्प हा पालिका व नागरिकांच्या जिव्हाळ्याचा विषय आहे. सत्ताधा-यांना आकडेवारीतील चुका लक्षात आणुन दिल्या. चचेर्ची तयारीही दाखवली. मात्र त्यांनी चर्चा न करताचं अर्थसंकल्प मंजुर केला. हे चुकीचे आहे. सत्ताधा-यांकडे बहुमत होते. त्यांनी मंजुरीसाठी मतदान का घेतले नाही ?- राजीव देशमुख, गटनेते शविआ

टॅग्स :ChalisgaonचाळीसगावMuncipal Corporationनगर पालिका