चाळीसगाव पालिकेचा शिलकी अर्थसंकल्प  सादर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2019 07:59 PM2019-02-25T19:59:53+5:302019-02-25T20:01:17+5:30

नागरिकांवर कोणत्याही प्रकारच्या करवाढीचा बोझा न टाकता सोमवारी चाळीसगाव पालिकेचे शिलकी अंदाजपत्रक सादर करण्यात आले. एकूण २३७ कोटी रुपयांचे अंदाजपत्रक सभागृहाच्या पटलावर नगराध्यक्षा आशालता चव्हाण यांनी मांडले. चर्चेअंती अर्थसंकल्प मंजूर करण्यात आला.

Chalisgaon Municipal Corporation's balance budget presented | चाळीसगाव पालिकेचा शिलकी अर्थसंकल्प  सादर

चाळीसगाव पालिकेचा शिलकी अर्थसंकल्प  सादर

Next
ठळक मुद्दे२३७ कोटी रुपयांचा अर्थसंकल्प सादरनागरिकांवर करवाढीचा बोझा नाहीचर्चे दरम्यान नगरसेवकांनी उपस्थित केले काही प्रश्न

चाळीसगाव, जि.जळगाव : नागरिकांवर कोणत्याही प्रकारच्या करवाढीचा बोझा न टाकता सोमवारी पालिकेचे शिलकी अंदाजपत्रक सादर करण्यात आले. एकूण २३७ कोटी रुपयांचे अंदाजपत्रक सभागृहाच्या पटलावर नगराध्यक्षा आशालता चव्हाण यांनी मांडले. चर्चेअंती अर्थसंकल्प मंजूर करण्यात आला.
दुपारी १२ वाजता अर्थसंकल्प मांडल्यानंतर त्यावर चर्चा सुरु झाली. यावेळी उपनगराध्यक्षा आशाबाई चव्हाण, शविआचे गटनेते राजीव देशमुख, भाजपा गटनेते संजय रतनसिंग पाटील यांच्यासह सर्व नगरसेवक व मुख्याधिकारी अनिकेत मानोरकर आदी उपस्थित होते.
अंदाजपत्रकात २१८ कोटी रुपये खर्च तर १९ कोटी रुपये शिल्लक दाखवण्यात आली आहे. यात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासाठी एक कोटी कोटी २५ लाख रूपयांची तरतूद करण्यात आली आहे. नवीन गटारी, नवीन रस्ते, दलित वस्त्या सुधारणा, अनुसूचित जाती नवबौद्ध घरकुल योजना, नवीन पाणी पुरवठा योजना, भुयारी गटार आदी कामांसाठीही मोठ्या प्रमाणावर तरतूद करण्यात आली आहे.
पालिकेचे यंदाचे हे शताब्दी वर्ष आहे. शताब्दी महोत्सवाच्या समारोपासाठी एक कोटी रुपयांचा निधी खर्च होणार आहे.
पालिकेचा सन २०१८-१९चा सुधारित व सन २०१९-२०२० चे अंदाजित अंदाजपत्रक सादर सभागृहात सादर करण्यात आले. सुरुवातीला पुलवामा घटनेत शहीद झालेल्या जवानांना तसेच पालिकेच्या दिवंगत आजी माजी नगरसेवकांना श्रद्धांजली वाहण्यात आली. त्यानंतर पालिकेच्या सांंिख्यकी विभागाचे कुणाल कोष्टी यांनी अंदाजपत्रकाचे वाचन केले.
रामचंद्र जाधव यांनी अर्थसंकल्पास नगराध्यक्षांची प्रस्तावना जोडली नसल्याचे निदर्शनास आणून दिले. अंदाजपत्रकावर यावेळी गरमामगरम चर्चा झाली. यात अनेक सुधारणा होणे अपेक्षित होते, तर त्रुटींही राहून गेल्याचे चर्चेत निदर्शनास आणले गेले. नगरसेवकांनी याविषयी नाराजी व्यक्त केली. चंद्रकांत तायडे यांनी चर्चेत आपल्या प्रभागात अद्यापही एलईडी दिवे का लावण्यात आला नाही, असा प्रश्न उपस्थित केला. एलईडी दिवे आपल्याही प्रभागात लावण्यात यावे, अशी मागणी रामचंद्र जाधव, सुरेश स्वार यांनी केली.
अर्थसंकल्प सादर करण्यापूर्वी स्थायी समिती सदस्यांच्या सूचना काय व कशा पद्धतीने विचारात घेतल्या तसेच हा अर्थसंकल्प नगराध्यक्षा व मुख्याधिकारी यांच्या सूचना व अपेक्षा समावेश करून तयार केला आहे का, असा खोचक प्रश्न शविआचे गटनेते राजीव देशमुख यांनी विचारला. मागील अर्थसंकल्पावरील चर्चा दोन तास चालली.
चालू वर्षाच्या अर्थसंकल्पाचे वाचन करण्यात आले. यावेळी सत्ताधारी व विरोधकांमध्ये अनेकदा खडाजंगी झाली. जेथे गरज नाही तेथे जास्त तरतूद केली आहे तर जेथे गरज आहे तेथे कमी तरतूद केल्याचे सांगत सत्ताधारी नगरसेवक राजेंद्र चौधरी नाराजी व्यक्त केली. अनेक विषयांवर चर्चा घडून आली. शेखर देशमुख यांनी अग्निशमन केंद्रातून दररोज मोठ्या प्रमाणावर टँकरद्वारे पाणी पालिकेकडून दिले जाते. मात्र त्यात अनियमितता असून पावत्या कमी दाखवून पाणी जास्त दिले जात असल्याचा गंभीर आरोप केला. ही चर्चा वेगळे वळण घेत असल्याचे पाहून नगराध्यक्षा आशालता चव्हाण यांनी विरोधी पक्षांच्या काही सूचना व त्रुटी विचारात घेण्याच्या अनुषंगाने आपण त्या सुचवाव्यात व अर्थसंकल्पाला सर्वानुुमते मंजुरी द्यावी अशी विनंती केली, यावर सर्व सदस्यांनी अंदाजपत्रकास मंजुरी दिली.
शहरवासियांना कुठलाही कर न लावता शहराच्या विकासासाठी परिपूर्ण अर्थसंकल्प सभागृहात ठेवला आहे, अशी टिप्पणी नगराध्यक्षा आशालता चव्हाण यांनी शेवटी केली.

Web Title: Chalisgaon Municipal Corporation's balance budget presented

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.