शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
3
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
4
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
5
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
6
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
7
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
8
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
9
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
10
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
11
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
12
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
13
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
14
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
15
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
16
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
17
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
18
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
19
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
20
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

चाळीसगावात अनेक गावांचा संपर्क तुटला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 31, 2021 13:32 IST

चाळीसगावात ढगफुटी झाल्याने अनेक गावांची संपर्क तुटला आहे.

ठळक मुद्देपरिसरातील गावांना पुराने वेढले.

लोकमत न्यूज नेटवर्क

चाळीसगाव : रात्री ढगफुटी सदृश पाऊस पडून चाळीसगाव शहरातील तितुर नदीसह वाघडू, वाकडी, रोकडे, मुंदखेडे, जामडी, कोंगानगर, बाणगाव, जावळे, कोदगाव, हिंगोणे सिम, मजरे आदी परिसरातील गावांना पुराने वेढले आहे.

अनेक गावांचा संपर्क तुटला असून अचानकपणे पडलेल्या या पावसामुळे जनावरे, शेती अवजारे वाहून गेली असून मनुष्यहानीदेखील झाली असल्याची माहिती मिळत आहे. कन्नड घाटात देखील दरड कोसळल्याने वाहतूक बंद आहे.

सायगाव येथे व परिसरात पावसाने दमदार हजेरी लावल्याने मन्याड धरणात वाढ झाल्याने पुरात वाढ झाल्याने मन्याड नदीच्या पात्रात अचानक वाढ झाली आहे.

पिडीतांची तात्पुरत्या निवाऱ्याची सोय

सर्व पूर पिडीतांची नगरपरिषदेकडून तात्पुरत्या निवाऱ्याची सोय करण्यात येणार असून  त्यांना जीवनावश्यक सुविधा पुरविण्यात येत आहे. संपर्कातील पूर पिडीतांची माहिती नगरपरिषद अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना त्वरित करुन द्यावी असे आवाहन चाळीसगाव नगरपालिकेतर्फे  करण्यात आले आहेकजगावात एकजण अडकला

कजगाव, ता. भडगाव : तितुर नदीच्या पुरात कजगाव चा एक इसम अडकला त्याला बाहेर काढण्यासाठी अद्याप बचाव कार्य दाखल झालेले नाही. सदर इसम जीव मुठीत धरत  झाडावर बसलेला आहे.

टॅग्स :JalgaonजळगावChalisgaonचाळीसगावRainपाऊसfloodपूर