शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

चाळीसगावला १०८ सरपंचांच्या पाठीवर कौतुकाची थाप !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 16, 2019 11:53 IST

स्वातंत्र्यदिनी रंगला सोहळा

चाळीसगाव,जि. जळगाव : आई फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ.विनोद कोतकर यांच्या संकल्पनेतून स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधत तालुक्यातील सर्व १०८ ग्रामपचायतींच्या सरपंचांचा सत्कार खासदार उन्मेष पाटील यांच्याहस्ते करण्यात आला. यावेळी व्यासपीठावर मुरलीधर कोतकर, संजीव निकम, केदारसिंग पाटील, कमल कोतकर व डॉ. चेतना कोतकर आदी उपस्थित होते. प्रास्तविक करताना डॉ.विनोद कोतकर यांनी ‘समृध्द खेडे-समृध्द देश’ ही संकल्पना नजरेसमोर ठेवत खेड्यातील प्रथम नागरिकाचा अर्थात सरपंचांचा सत्कार आई फाउंंडेशनमार्फत करण्यात येत असल्याचे सांगितले.आपली प्रत्येकाची नाळ ही खेड्याशी जुळली असल्याने त्या प्रत्येक खेड्याचा सर्वांगिण विकास होवून प्रत्येक खेडे आपण समृध्द बनवूया असे आवाहन डॉ.विनोद कोतकर यांनी केले.यावेळी खासदार उन्मेष पाटील यांनी तालुक्यात पहिल्यांदाच असा अभिनव उपक्रम स्वातंत्र्यदिनाच्या पवित्र दिवशी घेतल्याबद्दल कौतुक केले. भारतीय लोकशाहीचा कणा असलेल्या सरपंच बंधू - भगिनींचा सत्कार करीत असताना या सर्वांवर शासकीय योजनांचा फायदा समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहचविण्याची महत्वपूर्ण जबाबदारी असल्याचे खासदार पाटील म्हणाले.एक सरपंचाचा मी मुलगा असून या पदाला आमदार- खासदारपेक्षाही अधिक महत्त्व असल्याने तो ग्रामीण भागातील विकासकार्याचे स्वतंत्रपणे मॉडेल आपल्या गावाला बनवू शकतो, असे सांगताना खासदार पाटील यांनी राळेगणसिध्दी, पाटोदा या गावांचे उदाहरण दिले. डॉ.चेतना कोतकर यांनी आई फाउंडेशनच्या विविध उपक्रमांची माहिती देत यापुढेही आम्ही समाजाभिमुख उपक्रम वैद्यकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रात घेणार असल्याचे सांगितले. कार्यक्रमाची सुरुवात भारतमातेच्या प्रतिमापूजनाने झाली. यशस्वीतेसाठी मनोज कोतकर, सुधीर चव्हाण, राकेश कोतकर, मनोज पगार, सारंग कोतकर, संदिप पाखले, विवेक पुणेकर, योगेश कासार, अनमोल नानकर, दिपक राजपूत, संदेश येवले, महेश पाटील, योगेश मोराणकर, संजीव पाटील, के.डी.पाटील यांचे सहकार्य लाभले.सूत्रसंचालन कामिनी अमृतकार यांनी केले तर बाळकृष्ण मालपुरे यांनी आभार मानले.
टॅग्स :Jalgaonजळगाव