चाळीसगावला १०८ सरपंचांच्या पाठीवर कौतुकाची थाप !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 16, 2019 11:53 AM2019-08-16T11:53:07+5:302019-08-16T11:53:34+5:30

स्वातंत्र्यदिनी रंगला सोहळा

Chalisgaon has a smattering of applause sarpanch | चाळीसगावला १०८ सरपंचांच्या पाठीवर कौतुकाची थाप !

चाळीसगावला १०८ सरपंचांच्या पाठीवर कौतुकाची थाप !

Next
ळीसगाव,जि. जळगाव : आई फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ.विनोद कोतकर यांच्या संकल्पनेतून स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधत तालुक्यातील सर्व १०८ ग्रामपचायतींच्या सरपंचांचा सत्कार खासदार उन्मेष पाटील यांच्याहस्ते करण्यात आला. यावेळी व्यासपीठावर मुरलीधर कोतकर, संजीव निकम, केदारसिंग पाटील, कमल कोतकर व डॉ. चेतना कोतकर आदी उपस्थित होते. प्रास्तविक करताना डॉ.विनोद कोतकर यांनी ‘समृध्द खेडे-समृध्द देश’ ही संकल्पना नजरेसमोर ठेवत खेड्यातील प्रथम नागरिकाचा अर्थात सरपंचांचा सत्कार आई फाउंंडेशनमार्फत करण्यात येत असल्याचे सांगितले.आपली प्रत्येकाची नाळ ही खेड्याशी जुळली असल्याने त्या प्रत्येक खेड्याचा सर्वांगिण विकास होवून प्रत्येक खेडे आपण समृध्द बनवूया असे आवाहन डॉ.विनोद कोतकर यांनी केले.यावेळी खासदार उन्मेष पाटील यांनी तालुक्यात पहिल्यांदाच असा अभिनव उपक्रम स्वातंत्र्यदिनाच्या पवित्र दिवशी घेतल्याबद्दल कौतुक केले. भारतीय लोकशाहीचा कणा असलेल्या सरपंच बंधू - भगिनींचा सत्कार करीत असताना या सर्वांवर शासकीय योजनांचा फायदा समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहचविण्याची महत्वपूर्ण जबाबदारी असल्याचे खासदार पाटील म्हणाले.एक सरपंचाचा मी मुलगा असून या पदाला आमदार- खासदारपेक्षाही अधिक महत्त्व असल्याने तो ग्रामीण भागातील विकासकार्याचे स्वतंत्रपणे मॉडेल आपल्या गावाला बनवू शकतो, असे सांगताना खासदार पाटील यांनी राळेगणसिध्दी, पाटोदा या गावांचे उदाहरण दिले. डॉ.चेतना कोतकर यांनी आई फाउंडेशनच्या विविध उपक्रमांची माहिती देत यापुढेही आम्ही समाजाभिमुख उपक्रम वैद्यकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रात घेणार असल्याचे सांगितले. कार्यक्रमाची सुरुवात भारतमातेच्या प्रतिमापूजनाने झाली. यशस्वीतेसाठी मनोज कोतकर, सुधीर चव्हाण, राकेश कोतकर, मनोज पगार, सारंग कोतकर, संदिप पाखले, विवेक पुणेकर, योगेश कासार, अनमोल नानकर, दिपक राजपूत, संदेश येवले, महेश पाटील, योगेश मोराणकर, संजीव पाटील, के.डी.पाटील यांचे सहकार्य लाभले.सूत्रसंचालन कामिनी अमृतकार यांनी केले तर बाळकृष्ण मालपुरे यांनी आभार मानले.

Web Title: Chalisgaon has a smattering of applause sarpanch

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Jalgaonजळगाव