शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

जळगावात समतानगरात पिता-पूत्रावर चाकूहल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2018 12:16 IST

शिवीगाळ केल्याचा जाब विचारल्याने वार

जळगाव : महिलांसमोर अश्लील शिवीगाळ का करीत आहे, याचा जाब विचारल्याच्या कारणावरून दिलीप सोनू सपकाळे (५०) व विक्की दिलीप सपकाळे (१७) या पिता-पूत्रावर चाकूने हल्ला केल्याने दोघेही जखमी झाले असून त्यांच्यावर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचार सुरू आहे. ही घटना शुक्रवारी संध्याकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास समतानगरात घडली. यातील हल्ला करणारा विशाल (पूर्ण नाव समजू शकले नाही) नामक तरुण हल्ल्यानंतर पसार झाला.या घटनेबाबत जखमींच्या नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार, समतानगरात दिलीप सपकाळे यांच्या घरासमोर विशाल नामक तरुण आला व त्याने अश्लील शिविगाळ करणे सुरू केले. त्या वेळी महिलादेखील समोर बसलेल्या होत्या. त्याप्रसंगी दिलीप सपकाळे यांनी विशालला महिलांसमोर अश्लिल शिविगाळ का करीत आहे, या बाबत विचारणा केली. त्यावेळी विशालने त्याच्याकडे असलेला चाकू काढून थेट दिलीप सपकाळे यांच्यावर हल्ला केला. त्या वेळी दिलीप सपकाळे यांचा मुलगा विक्की सपकाळे याने तेथे धाव घेतली. विशालने त्याच्यावर चाकूने हल्ला केला. या हल्ल्यात दिलीप सपकाळे यांच्या पोटाच्या दोन्ही बाजूला व छातीजवळ एक अशा तीन जखमा झाल्या तर विक्कीच्या छातीजवळ एक जखम झाली आहे.घटनेनंतर दोघांनाही तत्काळ शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात हलविण्यात आले. तेथे वैद्यकीय अधिकारी डॉ. उदय कुरकुरे व त्यांच्या सहकाऱ्यांनी उपचार केले.तरुण पसारघटना घडल्यानंतर हल्लेखोर तरुणाने तेथून पळ काढला. या तरुणाचे पूर्ण नाव देखील जखमींना समजू शकले नाही. तसेच हा तरुण का शिवीगाळ करीत होता याचेही कारण समजू शकले नाही. दिलीप सपकाळे हे रोजंदारीने काम करतात तर विक्की हा इयत्ता दहावीमध्ये शिक्षण घेत आहे.कुटुंबीयांचा आक्रोशजखमींना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात हलविल्यानंतर तेथे जखमींच्या कुटुंबीयांना धाव घेतली. या ठिकाणी जखमींच्या चिंतेने नातेवाईकांनी आक्रोश केला. या ठिकाणी जखमींच्या नातेवाईकांसह परिसरातील नागरिकांची मोठी गर्दी झाली होती.

टॅग्स :Jalgaonजळगाव