जामनेर, जि.जळगाव : नगरपालिकेच्या माध्यमातून रक्षाबंधन सणाचे औचित्य साधत सोनबर्डी या प्रेक्षणीय स्थळी ४०० झाडांचे रोपण रविवारी सकाळी रक्षाबंधनाच्या दिवशी नगराध्यक्षा साधना महाजन यांच्या हस्ते करण्यात आले.वड, पिवळा, गुलमोहर, कदम, मोरगनी, ंिनंब, रेनड्री या जातीच्या दहा ते बारा फुटांपेक्षा जास्त उंचीच्या झाडांची लागवड करून त्यांना भाऊ मानत नगराध्यक्षा साधना महाजन यांनी पूजा करून राखी बांधली. ज्याप्रमाणे भाऊ बहिणीची सुरक्षा करतो त्याचप्रमाणे आम्हीही झाडांची सुरक्षा करून त्यांच्या वाढीसाठी प्रयत्न करणार असल्याचे या वेळी साधना महाजन यांनी सांगितले.या वेळी मुख्याधिकारी राहुल पाटील, नगरसेविका संध्या पाटील, शीतल सोनवणे, मंगला माळी, उल्हास पाटील, सुहास पाटील, रमेश हिरे, रवी महाजन, प्रशांत महाजन, खलील खान, फारूक मनियार आदी उपस्थित होते.
जामनेर येथे वृक्षांना राख्या बांधून रक्षाबंधन सण साजरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2018 17:08 IST