अमळनेरात पर्यावरण संवर्धनाचा जल्लोष, अंबर्षी टेकडीला आले यात्रेचे स्वरूप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 9, 2018 12:42 AM2018-07-09T00:42:51+5:302018-07-09T00:43:37+5:30

ओमच्या गजरात मिनिटात लावली ११११ झाडे

Celebration of environmental protection, Nature of Yatra in Ambacheri hill | अमळनेरात पर्यावरण संवर्धनाचा जल्लोष, अंबर्षी टेकडीला आले यात्रेचे स्वरूप

अमळनेरात पर्यावरण संवर्धनाचा जल्लोष, अंबर्षी टेकडीला आले यात्रेचे स्वरूप

Next





अमळनेर, जि.जळगाव : तहसीलदार प्रदीप पाटील यांच्या संकल्पनेतून महसूल विभाग व अंबर्शी टेकडी गृपतर्फे ८ रोजी सकाळी ११ वाजून ११ मिनिटांनी अवघ्या एका मिनिटात एक हजार १११ झाडे लावण्यात आली. पर्यावरण संवर्धनासाठी विविध घटक एकत्र आल्याने अंबर्षी टेकडीला एखाद्या यात्रेचे स्वरूप आले होते.
शासनाच्या १३ कोटी वृक्ष लागवड उपक्रमांतर्गत एकत्र भरपूर झाडे लावण्यासाठी तहसीलदार प्रदीप पाटील यांनी अंबर्षी टेकडी गृपच्या सहकार्याने एका मिनिटात ११११ झाडे लावण्याची संकल्पना मांडली. त्यासाठी अमळनेर पालिका, सामाजिक वनीकरण, प्रादेशिक वनविभाग, मंगळग्रह संस्था, सानेगुरुजी शाळा, डी.आर.कन्याशाळा, आर्मी स्कूल, एनसीसी, एनएसएस, मारवड विकास मंच, माझं गाव माझं अमळनेर, पोलीस पाटील संघटना, जवखेडा विकास मंच, तलाठी संघटना, महिला मंच, खाशि मंडळ, अर्बन बँक, पाडळसरे संघर्ष समिती, लोकमान्य विद्यालय, ताडेपुरा आश्रमशाळा, सानेगुरुजी स्पर्धा परीक्षा केंद्र, गायत्री परिवार, ओमशांती परिवार, आयएमए, भूमी अभिलेख, लायन्स क्लब, रोटरी क्लब, अमळनेर विकास प्रतिष्ठान यांनी एकाच वेळी झाडे लावली ‘ओम’च्या मंत्रोच्चारात एका मिनिटात एकाच वेळी झाडे लावलीत.
आर्थिक सहकार्य
माजी आमदार साहेबराव पाटील व नगराध्यक्षा पुष्पलता पाटील यांनी ११ हजार १११ रुपये, जवखेडा सरपंच सुभाष पाटील यांनी एक हजार १११, नगावचे माजी सरपंच बापू कोळी यांनी एक हजार रुपये मदत केली, तर जवखेडा विकास मंच व विशाल शर्मा यांनी उपस्थित विद्यार्थी व संघटना यांनी उपहाराचा खर्च दिला.
या वेळी आयकर अपर उपायुक्त संदीप साळुंखे, माजी आमदार साहेबराव पाटील, माजी आमदार डॉ.बी.एस.पाटील, नगराध्यक्षा पुष्पलता पाटील, प्रांताधिकारी संजय गायकवाड, तहसीलदार प्रदीप पाटील, माजी प्राचार्य डॉ.ए.जी.सराफ, डॉ.एस.आर.चौधरी, पोलीस निरीक्षक अनिल बडगुजर, पोलीस निरीक्षक गिरीश पाटील, डॉ.अनिल शिंदे, सामाजिक वनीकरणचे संतोष बोरसे व शहरातील सर्व स्तरातील संघटना व पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.


समाजातील सर्वच घटक एकत्र आल्याने आज अंबर्षी टेकडीला एखाद्या यात्रेचे स्वरूप आले होते. झाडे लावल्यानंतर शालेय विद्यार्थ्यांनी जल्लोष केला.

Web Title: Celebration of environmental protection, Nature of Yatra in Ambacheri hill

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.