शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

न्हावी येथे निबंध स्पर्धा व वृक्षारोपण करून पत्रकार दिन साजरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 6, 2021 15:56 IST

न्हावी येथे निबंध स्पर्धा व वृक्षारोपण करून पत्रकार दिन साजरा करण्यात आला.

न्हावी, ता.यावल : शिक्षण प्रसारक मंडळ संचलित भारत विद्यालयाच्या प्राथमिक शाळेत पत्रकार दिनानिमित्त शाळेत  निबंध स्पर्धा घेण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे चेअरमन पी.एच.महाजन होते.  विद्यार्थ्यांना आचार्य जांभेकर यांच्या जीवनाविषयी माहिती सांगून पत्रकार हा लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ आहे, पत्रकारिता हे निष्ठेने आचरण्याचे व्रत आहे. पत्रकारितेसमोर इलेक्ट्रॉनिक मीडियाची आव्हाने उभी ठाकली असून, बदलत्या काळानुरुप टेक्नोसॅव्ही, कौशल्ययुक्त पत्रकार हवे आहेत. मोबाईल हा भरवशाचा ‘सखा’  बनला आहे. लोककल्याणाचे काम पत्रकार करीत असतात, त्यांनी विश्‍वासाला तडा जाऊ देता कामा नये ,असे सांगितले. चेअरमन महाजन यांनी पत्रकार कसा असावा? याबद्दल माहिती विशद करुन समाजाला दिशा व एक संदेश देण्याचे काम करीत असल्याचे प्रतिपादन केले.  यावेळी निबंध स्पर्धा स्पर्धा घेण्यात आली. यात दोन गट पाडण्यात आले होते. प्रथम गट पाचवी ते सातवी आणि  व दुसरा गट आठवी ते दहावी असे गट होते. यात विद्यार्थ्यांना रोख बक्षिसे देण्यात आली. कार्यक्रमास रवींद्र कोलते, संजय बारी, संतोष बारी, पी.के. चौधरी व   संचालक वामन नेहते, डॉ.के.जी.पाटील, शिक्षक, मुख्याध्यापक तिलोत्तमा चौधरी, कांचन राणे हजर  होते. तसेच न्हावी येथिल ग्रामपंचायतीत पत्रकार दिनानिमित्त दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेला सरपंच भारती चौधरी यांनी पुष्पहार अर्पण करुन वृक्षारोपण करण्यात आले. याप्रसंगी ग्रामपंचायत सदस्य उमेश बेंडाळे, रवींद्र तायडे,  ग्रामविकास अधिकारी ज्ञानेश्वर जयंकर व कर्मचारी उपस्थित होते. 

टॅग्स :SchoolशाळाBhusawalभुसावळ