शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

एलसीबीच्या खुर्चीसाठी सावध पवित्रा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 24, 2018 13:33 IST

स्थानिक गुन्हे शाखेचे (एलसीबी) निरीक्षक सुनील कुराडे बदलीच्या ठिकाणी जाण्यासाठी कार्यमुक्त झाले आहेत. त्यांच्याजागी नवीन अधिका-याचा शोध सुरु आहे. अनेक जण या खुर्चीसाठी रांगेत असले तरी त्यासाठी अधिका-यांकडून सावध पवित्रा घेतला जात आहे.

ठळक मुद्देविश्लेषण अनेक अधिकारी नाखुश आयजी, एसपींचा धसका

सुनील पाटीलजळगाव : स्थानिक गुन्हे शाखेचे (एलसीबी) निरीक्षक सुनील कुराडे बदलीच्या ठिकाणी जाण्यासाठी कार्यमुक्त झाले आहेत. त्यांच्याजागी नवीन अधिका-याचा शोध सुरु आहे. अनेक जण या खुर्चीसाठी रांगेत असले तरी त्यासाठी अधिका-यांकडून सावध पवित्रा घेतला जात आहे. एलसीबीचे निरीक्षक म्हणजे पोलीस अधीक्षकांचा आत्माच मानला जातो.मात्र सद्यस्थिती पाहता या पदाचे टेंडर भरायला कोणी फारसे उत्सुक नाहीत. नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ.छेरिंग दोरजे व स्थानिक पातळीवर जिल्हा पोलीस अधीक्षक दत्तात्रय शिंदे दोन्ही अधिकारी पोलीस नियमावली, शिस्तीला प्राधान्य देण्यासह अवैध धंद्याच्या विरोधात आहेत.  वारंवार सूचना देऊनही अवैध धंदे सुरुच ठेवल्यामुळे शिंदे यांनी तीन पोलीस निरीक्षकांना पोलीस ठाण्याच्या प्रभारी पदावरुन काढून अकार्यकारी (साईड पोस्टींग) पदावर नियुक्ती दिली. तसेच अवैध धंदे चालकांच्या संपर्कात असलेल्या ७६ कर्मचा-यांनाही मुख्यालयात जमा केले. त्यामुळे आता स्थानिक गुन्हे शाखेत मनापासून यायला कोणी अधिकारी तयार होत नसल्याची चर्चा पोलीस दलात आहे. स्थानिक गुन्हे शाखेचे मुळ काम गुन्हे उघडकीस आणण्याचे आहे. मात्र ते मुळ काम सोडून इतर कामातच अधिक रस घेतला जात असल्याने पोलीस अधीक्षकांनी या शाखेतील कर्मचाºयांनाही एक महिन्यासाठी मुख्यालयात जमा केले. स्थानिक गुन्हे शाखेत वर्णी लागावी यासाठी अधिका-यांना मोठी कसरत करावी लागते. अगदी नेत्यांची मर्जी सांभाळण्यासापासून तर मोठ्या रकमेचे टेंडरही भरावे लागते. इतके सारे करुनही टेंडरचा खर्चच निघणार नसेल तर मग का म्हणून त्या खुर्चीवर बसायचे, असे मत काही अधिका-यांनी तयार केले आहे.आगामी लोकसभा, विधानसभा निवडणुकीत काही अधिकारी जिल्ह्याच्या बाहेर बदलून जाणार आहे. त्यामुळे दोन वर्ष कालावधी जिल्ह्यात बाकी असणारा  अधिकारीच यासाठी प्रयत्नशील आहे.एरव्ही या पदासाठी प्रत्येकवेळी जोरदार स्पर्धा असते, ही वेळ मात्र त्याला अपवाद ठरली आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीJalgaonजळगाव