शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
3
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
4
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
5
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
6
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
7
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
8
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
9
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
10
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
11
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
12
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
13
मैत्रिणीचे लग्न आटोपून घरी येताना अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, ९ जणांना अटक
14
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
15
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
16
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
17
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
18
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
19
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे

अत्याचार प्रकरणी शालक, मेहुण्यास अटक

By admin | Updated: January 3, 2017 17:16 IST

अकलूद ता़यावल शिवारात मित्रासोबत फिरायला आलेल्या अल्पवयीन तरुणीवर बंदुकीच्या धाकावर अत्याचार केल्याप्रकरणी नात्याने शालक, मेहुणा असलेल्या दोघा आरोपींच्या

ऑनलाइन  लोकमतभुसावळ, दि. 3 - अकलूद ता़यावल शिवारात मित्रासोबत फिरायला आलेल्या अल्पवयीन तरुणीवर बंदुकीच्या धाकावर अत्याचार केल्याप्रकरणी नात्याने शालक, मेहुणा असलेल्या दोघा आरोपींच्या मुसक्या जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने आवळल्या़ किरण वसंत कोळी (अकलूद, ता़यावल) व वासुदेव नारायण तायडे (रायपूर, ता़रावेर) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत. कोळी याचा वासुदेव तायडे हा नात्याने मेहुणा आहे़१ रोजी सायंकाळी सहा वाजता भुसावळ येथील तरुणी आपल्या मित्रासोबत फिरायला आली असताना आरोपींनी बंदुकीचा धाक दाखवून अत्याचार केला होता़ आरोपींनी मोबाईलसह रोकड हिसकावल्याप्रकरणी फैजपूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता़ जिल्हा पोलीस अधीक्षक जालिंदर सुपेकर, अपर पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे निरीक्षक राजेशसिंह चंदेल, सहाय्यक पोलीस निरीक्षक धारबडे, नारायण सोनवणे, मनोहर देशमुख, रमेश चौधरी, मिलिंद सोनवणे, रवींद्र एसग़ायकवाड, योगेश पाटील, रामकृष्ण पाटील, दिलीप येवले, सतीश हाळणोर, अशोक चौधरी, चंद्रकांत पाटील, विजय पाटील, दिनेश बडगुजर, नरेंद्र वारूळे, सुशील पाटील, जयंत चौधरी, इद्रीस पठाण, बबन तडवी आदींच्या पथकाने ही कारवाई केली़ आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली आहे़,असे पोलिसांनी सांगितले.  गुन्हे शाखेच्या पथकाने आरोपींच्या ताब्यातून लांबवलेल्या मोबाईलसह एअरगनदेखील जप्त केली आहे. स्थानिक गुन्हे शाखेने आरोपींच्या मुसक्या आवळल्यानंतर त्यांना मंगळवारी दुपारी फैजपूर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले़ आरोपींना बुधवारी न्यायालयात हजर केले जाणार आहे़ तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सार्थक नेहेते करीत आहेत.अटकेतील आरोपींनी यापूर्वी या भागात अनेक तरुण-तरुणींना गंडवले असल्याची शक्यता आहे मात्र पोलीस कोठडीतील तपासात ही बाब उघड होईल, असे पोलीस सूत्रांनी सांगितले.